आपल्यापैकी बर्याच जणांना स्वतःचा उद्योग व्यवसाय उभा करण्याची तीव्र इच्छा असते.परंतु कुठलीही गोष्ट करताना पैसा हा लागतोच.कोणत्याही व्यवसायाची कल्पना जरी डोक्यात आली तरी सगळ्यात आगोदर विचार येतो तो भांडवलाचा आणि येथेच डोक्यात आलेली कल्पना थांबते.
व्यवसायासाठी भांडवल उभे करण्यासाठीचे विविध पर्याय आहेत.या लेखात आपणएखादा व्यवसाय उभा करण्यासाठी हातात पैसा नसतानाही या पर्यायाद्वारे व्यवसाय उभारू शकतो.या लेखात त्याबद्दल माहिती घेऊ.
क्राउड फंडिंग हा आहे चांगला पर्याय
जसे आपण गणेशोत्सव, नवरात्री सारख्या सणामध्ये लोकवर्गणी गोळा करतो.यामध्ये जितके जमतील तितके पैसे प्रत्येक जण वर्गणी म्हणून देतो. त्या जमा झालेल्या वर्गणी च्या माध्यमातून आपण आपला सण साजरा करतो.ही संकल्पना उद्योग व्यवसायउभारणी साठी लागणारी गुंतवणूक उभी करण्यासाठी उपयोगात आणली जाते यालाच क्राउडफंडिंग असे म्हणतात.
उदाहरणच द्यायचे झाले तर एखादा व्यवसाय उभा करायचा आहे व त्याला तीन लाख रुपये गुंतवणुकीची गरज आहे तर अशावेळी पारंपारिक रित्या एकाच गुंतवणूकदारांकडून सर्व रक्कम घेतली जाते. त्या बदल्यात संबंधित गुंतवणूकदाराला ठराविक टक्के भागीदारी दिली जाते. परंतु क्राउड फंडिंग या पर्यायांमध्ये साठ लोकांकडून जरी पाच हजार रुपये घेतले तरीतीन लाख रुपये फंड जमा होतो आणि ही जमा केलेली रक्कम अगदी लहान असल्याने ते देणे देखील शक्य असते. अशा पद्धतीने अगदी छोट्या-छोट्या गुंतवणुकीतून जो व्यवसाय उभा राहतो त्याला लोकवर्गणीतून उभा केलेला व्यवसाय म्हणजे क्राउड फंडिंग असे म्हणतात.
क्राउड फंडिंग चे दोन प्रकार असतात….
- पहिला म्हणजे इक्विटी बेस
- दुसरा म्हणजे रिवार्ड बेस्ड
इक्विटी बेस्ड क्राउड फंडिंग
म्हणजे ज्या व्यवसायासाठी क्राउडफंडिंग केले आहे त्या व्यवसायाचे ठराविक मालकी प्रत्येक गुंतवणूकदाराला मिळते.
रिवार्ड बेस्ड क्राउड फंडिंग
यामध्ये प्रत्येकाने जितके पैसे गुंतवले आहेत त्या किंमतीचे किंवा त्याहूनही अधिक लाभ संबंधित गुंतवणूकदाराला दिले जातात.
आपल्याकडे अजून क्राउड फंडिंग हीसंकल्पना व्यवसाय मध्ये अजून अभी देवडी रुजू झाली नाहीये.येणाऱ्या काळामध्ये अनेक उद्योजक विना गुंतवणूक आपला व्यवसाय सहजरित्या सुरु करू शकतात.
Share your comments