कांदा हे पीक आपल्याला माहितीच आहे. कांद्याच्या भावा बद्दल नेहमीच अनियमितता असते. शेतकऱ्यांचे खूपच नुकसान होते. अन्य कुठल्याही शेतीमालापेक्षा कांद्याच्या भावात जास्त प्रमाणात चढ-उतार पाहायला मिळतो.
त्यामुळे कष्टाने पिकवलेला कांदा अशाचा असा बाजारात न विकता त्यावर प्रक्रिया करून तयार प्रक्रियायुक्त पदार्थ विकले तर चांगला नफा कमावता येऊ शकतो. परंतु त्यासाठी जिद्द आणि एक व्यावसायिक दृष्टिकोन असणे महत्त्वाचे आहे. तसा आता उन्हाळा सुरू असल्यामुळे बरेच लोक घरी बसून ऑनलाइन पद्धतीने असो की अजून दुसऱ्या चांगला पैसा कमावतात. व्यवसायाच्या बाबतीत म्हणायचे झाले तर स्वयंपाक घराशी निगडित असलेल्या वस्तूंचा व्यवसाय केला तर असे व्यवसाय चांगले चालतात. आपल्याला माहित आहेच की कांद्याचे किंमत जर वाढली तर सर्वसामान्य लोकांना कांदा विकत घेणे मुश्कील होते व कायद्याशी संबंधित सगळ्या उत्पादनाची किमती देखील बाजारपेठेत वाढतात. जर आपण भारतीय बाजारपेठेचा विचार केला तर कांद्याची पेस्टला बाजारपेठेत खूप मागणी आहे. म्हणून या पार्श्वभूमीवर जर कांद्याची पेस्ट बनवून ती विकण्याचा व्यवसाय सुरू केला तर एक चांगला नफा या माध्यमातून मिळू शकतो.
कांद्याची पेस्ट बनवण्यासाठी लागणारी गुंतवणूक
तुम्ही कांद्याची पेस्ट बनवण्याचा व्यवसाय हा तुमच्या आर्थिक क्षमतेनुसार सुरू करू शकतात. तसे पाहायला गेले तर खादी ग्रामोद्योग आयोगाने कांदा पेस्ट उद्योगाचा एक प्रोजेक्ट रिपोर्ट तयार केला आहे. या रिपोर्टनुसार तर विचार केला तर कांद्याची पेस्ट बनवण्याचा व्यवसाय तुम्ही चार लाख 19 हजार रुपयांमध्ये सुरू करू शकता. तसेच हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला केंद्र सरकारच्या मुद्रा योजनेचा देखील लाभ मिळतो. हा उद्योग सुरू करण्यासाठी तुम्हाला काही यंत्रसामुग्रीची आवश्यकता असते.फ्राइंग पॅन, ऑटोक्लेव स्टीम कुकर, डिझेल भट्टी, स्टरलायझशन टँक, छोटे भांडे, मग, कप इत्यादी साहित्य लागते व या साहित्याला एक लाख ते एक लाख 75 हजार रुपये खर्च येतो. जर आपण खादी ग्राम उद्योगाच्या प्रकल्प अहवालाचा विचार केला तर एका वर्षांमध्ये 193 क्विंटल कांद्याची पेस्ट चे उत्पादन या अहवालानुसार करता येऊ शकते. जर तीन हजार रुपये प्रति क्विंटल दराने पेस्ट ची विक्री झाली तर बाजारामध्ये पाच लाख 79 हजार रुपयापर्यंत या पेस्ट ची किंमत बनते.
कांदा पेस्ट व्यवसायातून नफा
जर तुम्ही व्यवस्थित पद्धतीने आणि नियोजनाने कांद्याच्या पेस्ट चे मार्केटिंग बाजारपेठेत विकण्यापर्यंत व्यवस्थित प्लॅनिंग केली तर एका वर्षात जवळजवळ साडेसात लाख रुपयांपर्यंतची पेस्टचे विक्री करता येऊ शकते. यामध्ये तुमचा एकूण गुंतवणूक एक लाख 75 हजार रुपयांपर्यंत होईल आणि नफा एक लाख 48 हजार रुपयापर्यंत होणे शक्य.
महत्वाच्या बातम्या
नक्की वाचा:शेतकऱ्यांसाठीही भोंगा वाजवा!! भोंग्याच्या वादात हिंदुस्थान मानव पक्षाची उडी
नक्की वाचा:शेतकऱ्यांनो या फुलाला परदेशातही मोठी मागणी आहे, कमी खर्चात मिळवा मोठा नफा..
Share your comments