कोणी स्वप्नात सुद्धा विचार करू शकत नाही की नारळाच्या करवंट्याला सुद्धा बाजारात प्रचंड मागणी आहे आणि याचे भाव सुद्धा प्रचंड आहेत भाव ऐकून तुम्हाला सुद्धा विश्वास बसणार नाही.
नारळाच्या करवंट्यांची बाजारात एवढी का मागणी आहे? त्याचे उपयोग नक्की कशासाठी होतात याचा प्रश्न तुम्हाला पडलाच असेल. गेल्या काही दिवसांमध्ये नारळाच्या करवंट्यांला 7500 ते 8000 रुपये प्रति टन एवढा भाव होता परंतु गेल्या काही दिवसांपासून नारळाच्या करवंट्यांचा भाव हा दुप्पट झाला आहे आणि याचा भाव हा 14500 ते 15000 रुपये इथर्यंत पोहचला आहे.
कधी कोणी स्वप्नात सुद्धा विचार केला नसेल की याचा उपयोग मोठ्या प्रमाणात आणि वेगवेळ्या ठिकाणी सुद्धा होत असेल. ॲक्टिव्हेटेड कार्बनची ची मागणी मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे नारळाच्या करवंटीचा भाव हा मोठ्या प्रमाणात वाढला आहे. तसेच खोबऱ्याचे दर वाढलेले नसताना सुद्धा कर्नाटक राज्यात नारळ उत्पादक शेतकरी निर्धास्त आहेत, कारण या नारळाच्या करवंटीमुळे त्यांना आर्थिक आधार मिळाला आहे.
नारळाच्या करवंटीचा चा वापर वेगवेगळ्या कामासाठी केला जातो यामधे याचा वापर हस्तव्यवसाय, अगरबत्ती आणि जैविक खतांच्या निर्मितीसाठी मोठ्या प्रमाणात केला जातो याचबरबरीने अलिकडील काळात सोने आणि चांदी वितळवण्यासाठी आणि शुद्धीकरणासाठी ॲक्टिव्हेटेड कार्बनचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. त्यामुळे नारळाच्या नारळाच्या करवंटीचा उपयोग मोठ्या प्रमाणात वाढला आहे. नारळ उत्पादनात भारत हा 34 व्या क्रमांकी आहे. प्रत्येक वर्षी भरतातातून नारळ विक्री मधून 3227 कोटी रुपयांची कमाई केली होती त्याचबरोबर मागील वर्षी 2294 कोटी रुपयांची निर्यात झाली होती. त्याचबरोबरीने आता नारळाच्या करवंटी पासून सुद्धा बक्कळ पैसा मिळत आहे.
सोन्याच्या किमतीत सतत होणारी वाढ, अधिकच्या व्यवसायासाठी सोन्याच्या खाणींचा घेतला जाणारा शोध या मुळे जगभरात ॲक्टिव्हेटेड कार्बनची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे येणाऱ्या काही दिवसात ॲक्टिव्हेटेड कार्बनचा व्यापार वाढणार आहे असे विधान केले आहे शिवाय भारतातील ॲक्टिव्हेटेड कार्बनलाही प्रचंड प्रमाणात मागणी असल्यामुळे याचा फायदा नारळ उत्पादक शेतकरी वर्गाला मोठ्या प्रमाणात होणार आहे.
Share your comments