भारतात महागाई दिवसेंदिवस वाढतच आहे, आणि त्यामुळे फक्त नोकरी करून उदरनिर्वाह भागवणे मोठ्या जिकरीचे ठरत आहे. त्यामुळे व्यवसाय करणे ही काळाची गरज बनत चालली आहे अनेक लोक व्यवसाय करण्याचे स्वप्न बघता पण योग्य ती कल्पना सुचत नसल्याने ते व्यवसाय सुरू करू शकत नाही. म्हणूनच आज कृषी जागरण आपल्या वाचक मित्रांसाठी एक भन्नाट व्यवसायाची कल्पना घेऊन हजर झाले आहे. आज आपण ज्या व्यवसायाची माहिती जाणून घेणार आहोत तो आहे टोमॅटो सॉस मेकिंग. टोमॅटो सॉसची मागणी ही दिवसेंदिवस वाढतच आहे, म्हणून या चा व्यवसाय करून चांगले मोठी कमाई केली जाऊ शकते.
टोमॅटो स्वास ची मागणी ही हॉटेल्समध्ये मोठ्या प्रमाणात असते. टोमॅटो सॉस अनेक पदार्थ बनवण्यासाठी केला जातो याचा उपयोग विशेषता चायनीज पदार्थ बनवण्यात मोठ्या प्रमाणात केला जातो, याची मागणी लहान खेड्यापासून ते मोठमोठाल्या मेट्रो सिटी मध्ये मोठ्या प्रमाणात असते या व्यवसायात मोठा स्कोप आहे. चला तर मग मित्रांनो जाणून घेऊया टोमॅटो सॉस मेकिंग बिझनेस कसा केला जाऊ शकतो.
कसा सुरु करणार टोमॅटो सॉस मेकिंग बिझनेस
टोमॅटो सॉस मेकिंग बिजनेस आपण आपल्या राहत्या घरात देखील सुरू करू शकता. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी आपणास किमान आठ लाख रुपयांची भांडवल आवश्यक आहे. जर आपल्याकडे एवढी मोठी रक्कम अवेलेबल असेल तर आपण यासाठी लोन सुद्धा घेऊ शकता. परंतु आपणास किमान दोन लाख रुपये यासाठी इन्वेस्ट करावे लागतील बाकीचे सहा लाख रुपये आपण पंतप्रधान मुद्रा लोन या योजनेद्वारे प्राप्त करू शकता. या व्यवसायासाठी सरकारद्वारे ट्रेनिंग सुद्धा दिली जाते, हा व्यवसाय सुरू करण्यासाठी आपण सरकारकडून मदत घेऊ शकता.
टोमॅटो सॉस मेकिंग बिझनेस सुरू करण्यासाठी किती बजेट लागेल
टोमॅटो सॉस मेकिंग बिझनेस सुरू करण्यासाठी आपणास आठ लाख रुपयापर्यंत इन्व्हेस्टमेंट करावी लागेल. याच्यात बिजनेस साठी आवश्यक उपकरणे साहित्य कच्चा माल यांचा समावेश आहे. या बिझनेस साठी लागणाऱ्या उपकरणांवर कमीत कमी दोन लाख रुपये मोजावे लागतील. टोमॅटो सॉस मेकिंग साठी लागणाऱ्या टोमॅटोसाठी, कामगारांचे पेमेंट, पॅकिंग, गाळ्याचे भाडे, ट्रान्सपोर्ट इत्यादीसाठी सुमारे सहा लाख रुपये लागणे अपेक्षित आहे.
कसा बनतो टोमॅटो सॉस
टोमॅटो सॉस बनवण्यासाठी सर्वात आधी टोमॅटोचे बारीक बारीक तुकडे केले जातात व त्याला गरम पाण्यात उकळले जाते. यानंतर उकळलेले टोमॅटोचे पल्प बनवले जाते व त्यामधून बिया आणि फायबर वेगळे केले जाते. आता याच्यात आद्रक, लसुन, लवंग, काळी मिरी, मीठ, साखर, व्हिनेगर, इत्यादी मिसळले जाते. याच्यात प्रिझर्वेटिव्ह सुद्धा मिसळले जाते जेणेकरून टोमॅटो सॉस दीर्घकाळ टिकेल. या पद्धतीने टोमॅटो सॉस हा बनवला जातो.
किती होणार या व्यवसायातून कमाई
पंतप्रधान मुद्रा योजना यांच्या प्रोजेक्ट नुसार व्यवसाय आठ लाख रुपयात सुरू करता येतो आणि वार्षिक 29 लाख रुपयांचा टर्न ओव्हर या व्यवसायातून प्राप्त होतो. वार्षिक 24 लाख रुपये व्यवसायासाठी खर्च होतो आणि पाच लाख रुपये निव्वळ नफा या व्यवसायातून कमावला जाऊ शकतो. या पद्धतीने महिन्याला 40 हजार रुपये या व्यवसायातून कमाई होते.
Share your comments