भाजीपाला आणि फळे हे त्यांच्या काढणीनंतर जास्त काळ टिकत नाही. त्यामुळे बऱ्याचदा भाजीपाल्याच्या बाबतीत विचार केला तर काढणी केल्यानंतर लगेच बाजारपेठेत विक्रीसाठी पाठवणे गरजेचे असते. त्यामुळे बऱ्याचदा बाजारपेठेत भाव कमी जरी असला तरी भाजीपाला किंवा फळे खराब होण्याची भीती असल्यामुळे शेतकरी आहे त्या भावात विकून मोकळे होतात. परंतु त्या दृष्टीने शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसण्याची शक्यता जास्त असते.
एवढेच नाही तर विशिष्ट हंगामात काही भाजीपाल्यांचे आणि फळांचे उत्पादन होते व नेमके त्याच वेळी सगळ्या भाजीपाला बाजारपेठेत झाल्याने आवक जास्त वाढते व दर पडतात त्यामुळे देखील शेतकऱ्यांचे खूप नुकसान होते. त्यामुळे या लेखात आपण भाजीपाला व फळे जास्त काळ टिकावे यासाठी काही पद्धती आहेत त्यांचा वापर करून भाजीपाला आणि फळे जास्त काळ साठवता येतात व हवे तेव्हा विकता येतात.
फळे व भाजीपाला जास्त काळ टिकावा यासाठी या आहेत उपयोगी पद्धती
1- सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे फळे व भाजीपाला जास्त काळ टिकावा यासाठी त्यामध्ये असलेल्या पाण्याचा अंश कमी करणे खूप गरजेचे असते. हा अंश कमी करण्यासाठी तुम्ही सूर्यप्रकाशात किंवा वाळवणी यंत्रात भाजीपाला व फळे वाळवणे फार महत्त्वाचे असते.
2- या पद्धतीत फळ भाज्यांमधील जे काही विद्राव्य घटक असतात त्यांचे प्रमाण कृत्रिम रीत्या वाढवले जाते व यासाठी साखरेचा वापर केला जातो. याच पद्धतीचा वापर करून जेली, मुरांबा इत्यादी पदार्थांमधे 70 टक्क्यांपर्यंत एकूण विद्राव्य घटकांचे प्रमाण ठेवले जाते.
3-फळे व भाजीपाला जास्त उष्णता देऊन त्यांची टिकवण क्षमता वाढवता येईल.याबाबतीत उदाहरण द्यायचे झाले तर फळांच्या फोडी,रस इत्यादी डब्यात किंवा बाटल्यांमध्ये हवाबंद करून त्या उकळत्या पाण्यात 30 मिनिटे बुडवून ठेवणे किंवा भाजीपाला असेल
तर 100 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमानाचा म्हणजेच पाण्याचा वाफेचा उपयोग करून टिकवणे. याचे उदाहरण द्यायचं झालं तर मटार हवाबंद करून टिकवणे हे या पद्धतीचे उदाहरण आहे.
नक्की वाचा:ऊस सेंद्रिय सॉईल मल्टीप्लायर तंत्रज्ञानाने रिझल्ट ऊसाची कांडी भरीव टन उत्पादनात वाढ
4- मिठाचा वापर करून कच्ची फळे किंवा काही प्रकारच्या फळांचे आयुष्यमान वाढवता येते. उदाहरणार्थ कच्ची आंब्याच्या फोडी 15 ते 20 टक्के मिठाच्या द्रावणात साठवता येतात तसेच कोकम रसात 15 ते 20 टक्के मीठ वापरून तयार होणारा कोकम आगळ हा पदार्थ चांगला टिकवून ठेवता येतो.
5- तापमान अतिशय कमी केले तर फळे व भाज्या जास्त काळ टिकण्यास मदत होते. उदाहरणार्थ फ्रीजिंग, डीप फ्रीजिंग आणि क्रायोजनिक फ्रीजिंग या पद्धतीने टिकाऊ फ्रोजन फळे व भाज्या तयार करता येतात.
6- आंबवण्याची क्रियांमुळे फळांच्या मूळ घटकात आमूलाग्र बदल होतो. या क्रियेने फळे आणि भाज्या वेगवेगळ्या स्वरूपात टिकवण्यासाठी मदत होते.
7- तसेच क्ष-किरणे आणि गॅमा किरणे यांचा काळजीपूर्वक करावी प्रमाणात वापर करून देखील फळे, भाजीपाला तसेच काही पदार्थ टिकवून ठेवता येतात.
नक्की वाचा:पावसाची आकडेवारी शेतकऱ्यांसाठी का झाली बंद; राज्य सरकारचा असा का निर्णय?
Share your comments