जेव्हा कोरोना लॉकडाऊन च्या दरम्यान सगळे व्यवहार ठप्प होते. या सगळ्या वातावरणामध्ये शेतकऱ्यांना त्यांच्या शेतातील शेतमाल वाहतुकीच्या साधनांअभावीबाजारपेठेत विक्री करण्यासाठी खूप समस्या निर्माण झाल्या होत्या त्यामुळे खूप मोठे नुकसान सहन करावे लागले होते.
वाहतुकीच्या साधनांअभावी शेतमालाचे फार मोठे नुकसान होऊन शेतकऱ्यांना आर्थिक फटका सहन करावा लागला होता. अशावेळी या परिस्थितीत अनेक खाजगी कंपन्यांनी पुढे येत शेतकऱ्यांना मदतीचा हात दिला होता. बऱ्याच कंपन्यांनी ऑनलाइन विक्रीच्या माध्यमातून शेतकर्यांनी पिकलेले फळ आणि भाजीपाला लोकांपर्यंत पोहोच करण्यासाठी मदत केले होती. परंतु आता हेच ऑनलाइन व्यवसायाची कल्पना शेतकऱ्यांसाठी वरदान ठरू पाहत आहे. या लेखात आपण आज नेमका हा ऑनलाईन व्यवसाय कसा चालतो? आणि शेतकऱ्यांना याचा फायदा कसा मिळत आहे याबद्दल माहिती करून घेऊ. या ऑनलाईन प्लेटफार्म च्या मदतीने बरेच शेतकरी त्यांनी पिकवलेला शेतमाल विकून चांगला नफा मिळवत आहे.
काही ऑनलाईन महत्त्वाच्या साईट
1- बिग बास्केट- आपल्याला ही ऑनलाइन साईट माहिती आहे किंवा अगोदर या साईड बद्दल ऐकले देखील असेल. या ऑनलाईन साइटच्या माध्यमातून ग्राहकांना घरी बसून भाजीपाला, फळे, दूध इत्यादी गोष्टी ऑर्डर केल्यानंतर घरपोच डिलिव्हरी बॉय च्या माध्यमातून घरपोहोच केल्या जातात.
परंतु हे साईट ग्राहकांपर्यंत जो काही शेतमाल पोहोच करते तो शेतमाल शेतकऱ्यांकडून विकत घेते. मग या पार्श्वभूमीवर तुम्ही सुद्धा तुम्ही पिकवलेला शेतमाल बिग बास्केट ऑनलाइन साइटवर जाऊन रजिस्टर करू शकता. त्यानंतर या साईटच्या माध्यमातून तो खरेदी केला जाऊन तुम्ही तो अगदी आरामातविक्री करू शकतात. अगदी घरी बसून तुम्ही चांगला नफा मिळवू शकतात.
2- इन्स्टा मार्ट- आपल्याला बर्याच जणांना स्विगी हे नाव माहिती आहे. हे ऑनलाईन साईट लोकांना घरी बसून खाद्यपदार्थ डिलिव्हरी करण्याचे काम करते. परंतु दैनंदिन गरजेच्या वस्तूंची ऑनलाईन मागणी लक्षात घेता स्विगीने इन्स्टा मार्ट म्हणून एक सर्व्हिस सुरू केली आहे. या साईटच्या माध्यमातून तुम्ही भाजीपाला, फळे इत्यादी घरी बसून ऑर्डर करू शकतात. शेतकऱ्यांनी स्वतःला या साईट सोबत जोडले तर या माध्यमातून शेतात पिकवलेला शेतमाल या साइटच्या माध्यमातून विक्री करता येऊ शकतो. यासाठी शेतकऱ्यांना स्वतःला या साईटवर रजिस्टर करणे गरजेचे आहे.
3- ब्लींकिट/ ग्रोफेर्स- या साईटचा दावा आहे की ग्राहकांना लागणाऱ्या आवश्यक वस्तू व ऑर्डर दिल्यानंतर आठ ते दहा मिनिटांमध्ये होम डिलिव्हरी केली जाते. त्यामुळे या ऑनलाइन साईटची लोकप्रियता खूपच वाढत आहे. त्यामुळे बरेच लोक या साईटच्या माध्यमातून घरबसल्या फळे आणि भाजीपाला ऑर्डरकरायला जास्त पसंती देतात.
त्यामुळे शेतकरी या साइटवर स्वतःचे रजिस्ट्रेशन करून पिकवलेला भाजीपाला आणि फळे या साइटवर विकू शकता तो चांगला नफा मिळू शकतो.
या ऑनलाईन व्यवसायाचा फायदा कसा घ्यावा?
1- सगळ्यात आगोदर तुम्हाला ठरवावे लागेल कि तुम्हाला कोणत्या साईट द्वारे तुम्ही पिकवलेले फळे आणि भाजीपाला विकायचा आहे.
2- तुम्ही एका पेक्षा जास्त ऑनलाईन साईटवर सुद्धा पिकलेले फळे आणि भाजीपाला विकू शकतात.
3- त्यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईल मध्ये एक ऑनलाईन ॲप डाऊनलोड करावे लागेल.
4- त्यानंतर तुम्हाला संबंधित साइटवर विक्रेत्याच्या रूपात रजिस्ट्रेशन करावे लागेल.
5- नंतर तुम्हाला तुमचे कोणते उत्पादन विकायचे आहे ते या साइटवर अपलोड करावी लागेल.
6- त्यानंतर शेवटी शेतमाल ग्राहकांकडून खरेदी केला गेला त्यानुसार कंपनीचा डिलिव्हरी बॉय तुमच्या घरी येऊन तुमचा शेतमाल घेऊन जाईल.
महत्वाच्या बातम्या
नक्की वाचा:एका शेतकऱ्याचे महत्त्वाचे संशोधन. शेतकऱ्याला उघडावी लागली फॅक्टरी!
नक्की वाचा:शेतकऱ्यांनो या फुलाला परदेशातही मोठी मागणी आहे, कमी खर्चात मिळवा मोठा नफा..
Share your comments