1. कृषी प्रक्रिया

Agri Bussiness idea: बेरोजगार युवकांसाठी या आहेत चांगल्या कृषीआधारीत उद्योग संधी

Bussiness idea

Bussiness idea

जर तुमच्या मनात कृषी क्षेत्रात एखादा व्यवसाय सुरू करण्याची कल्पना असेल तर हा लेख निश्चितच तुमच्यासाठी महत्त्वाचा आणि फायदेशीर आहे. या लेखात आपण खुशीची संबंधित काही उद्योगांचा विचार करणार आहोत चे कमी खर्चात आणि चांगला नफा मिळवून देणारे आहेत.

 कृषी-आधारित उद्योग कल्पना

1- गांडूळ खते व सेंद्रिय खत उत्पादन- गांडूळ खत सेंद्रिय खताचे उत्पादन आजकाल घरगुती व्यवसाय बनला आहे. या उद्योगासाठी खूप नाममात्र प्रमाणात गुंतवणूक करावी लागते आणि त्यासाठी लागणारी जमिनीची आवश्यकता देखील कमी असते. जर तुम्ही या व्यवसायाचे सखोल माहिती आणि उत्पादन प्रक्रिया तसेच विपणन याबद्दल माहिती घेतली तर हा व्यवसाय तुम्ही चांगल्या रीतीने सुरू करून चांगला नफा मिळू शकतात.

2- कृषी फार्म- जर तुमच्याकडे जमीन असेल आणि ती शेती करण्यासाठी योग्य असेल तर तुम्ही वेगवेगळ्या कल्पनांच्या माध्यमातून शेती देखील सुरू करू शकतात. यामध्ये तुम्ही स्थानिक वस्तू उत्पादित करून त्या स्थानिक बाजारपेठेत विकू शकतात. तसेच दुर्गम भागात वितरण साकळी द्वारे देखील उत्पादनांचे पूर्तता करता येऊ शकते.

3- सेंद्रिय फार्म ग्रीन हाऊस- सध्या सेंद्रिय शेतीकडे आणि सेंद्रिय उत्पादनांकडे भरपूर प्रमाणात कल वाढताना दिसत आहे. यासाठीचा ग्रीन हाऊस व्यवसाय केला तर त्यामध्ये वाढ होण्याची शक्यता आणि तो यशस्वी होण्याची शक्यता अधिक आहे.

अलीकडच्या काळात सेंद्रिय पद्धतीने उत्पादित शेती उत्पादनांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. सेंद्रिय शेतीचा ग्रीन हाऊस व्यवसाय सामान्यता लहान, कुटुंब स्तरावर चालवलेल्या शेतात केला जातो. परंतु आत्ता सेंद्रिय पद्धतीने पिकवलेल्या खाद्यपदार्थांची मागणी वाढत असल्याने  लोक सेंद्रिय शेतीसाठी जमिनीमध्ये गुंतवणूक करीत आहेत.

4- कुकूटपालन व्यवसाय-सध्या मार्केटमध्ये चिकनची मागणी मोठ्या प्रमाणात आहे. जगभरात कोंबडीपालन तीन दशकापासून परसातील तसेच शेतीच्या स्थितीपासून तंत्र व्यवसाय उद्योगात रूपांतर झाले आहे. कुक्कुटपालन ही शेती व शेती व्यवसायातील वेगाने विकसित होणारे क्षेत्र आहे.

5- मशरूम शेती- मशरूम शेती अलीकडे फार वेगाने आणि झपाट्याने प्रगती करीत आहे.

कमी भांडवल गुंतवून मशरूम शेती आपल्याला कमी वेळात मोठा नफा मिळवून देऊ शकते. तसेच यासाठी फार कमी जागेची आवश्यकता असते.

6- फिश फार्मिंग- मासे पालन हा व्यवसाय वर्षाच्या कोणत्याही हंगामात आणि कोणत्याही वेळेत चांगला नफा मिळवून देणारा व्यवसाय आहे.

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters