सध्या सर्व भागात ऊसतोड चालू आहे जे की उसाचे फड रिकामे झाले की शेतकरी पाचट पेटवून देतो आणि खोडवा उसाची तयारी लगेच चालू करतो परंतु पाचट न पेटवता तुम्ही ते जमिनीत कुजवले तर जमिनीचे आरोग्य सुधारते यामुळे उत्पादनही चांगल्या प्रकारे निघते. पाचट कुजवल्या नंतर पर्यावरणाचे संवर्धन तर होणार आहेत त्याच बरोबर जमिनीची सुपीकता सुद्धा वाढणार आहे.
पाण्याची बचत अन् तणनियंत्रणही...
उसाची जर पाचट जाळली तर जमिनीसाठी जे की उपयुक्त घटक लागतात ते नष्ट होतात तसेच धुरामुळे वातावरण सुद्धा प्रदूषित होते आणि जर या पाचटची कुटी करून जर तुम्ही जमिनीत कुजवली तर जमिनीची पोत सुधारते. उन्हाळ्यात पाण्याचे जे बाष्पीभवन होते ते सुद्धा यामुळे रोखले जाते त्यामुळे पाण्याची बचतही होते. पाचट कुजवल्याने उसामध्ये पुन्हा तण ही लवकर येत नाही. जमिनीची सुपीकता वाढवण्यासाठी गांडूळ खत सुद्धा वापरले जाते.
असे करा पाचटाचा वापर...
उसाची तोडणी केल्यानंतर जी पाचट राहते ती जाळून तसेच फेकून न देता ज्या क्षेत्रावर उसाची लागवड करणार आहे त्या ठिकाणी पसरावे. मशीनच्याद्वारे पाचट ची कुटी करून ती कुजवण्यासाठी त्यावर युरिया आणि सल्फेट फॉस्फेट खत टाकून पाणी द्यावे. हे सर्व झाल्यानंतर छोट्या ट्रॅक्टर च्या साहाय्याने रोटाव्हेटर फिरवल्याने पाचट जमिनीत चांगल्या प्रकारे मिसळते तसेच उसाला मातीची भर देणे गरजेचे आहे.
पाचट कुजवण्याचे हे आहेत फायदे...
एक हेक्टर जमिनीतून कमीत कमी ८ ते १० टन तर पाचट मिळतेच जे की या पाचटीमधून ०.५ टक्के नत्र, ०.२ टक्के स्फूरद, १ टक्का पालाश तर ३२ ते ४० टक्के सेंद्रिय अर्ब मिळते म्हणजेच पाचटीमधून ४० किलो नत्र तसेच २०-३० टक्के स्फुरद आणि ७५ - १०० किलो पालाश मिळते. हे घटक भेटल्याने जमिनीची पोत तर सुधारते तसेच उत्पादन ही चांगल्या प्रकारे निघते. उसाची पाचट जाळल्याने वातावरणाचे प्रदूषण तर होते त्यापेक्षा न जाळता कुजवली तर जमिनीची सुपीकता वाढवते आणि याचा फायदा शेतकऱ्यांना होतो.
Share your comments