1. कृषी व्यवसाय

फणस प्रक्रिया उद्योगातील रोजगाराच्या संधी

सर्वच फळांमध्ये सर्वात मोठे फळ म्हणून फणस आपल्याला माहित आहे. महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टीत अधिक प्रमाणात पिकते.महाराष्ट्र व्यतिरिक्त अरुणाचल प्रदेश,दक्षिण भारतातील कर्नाटक, केरळ व तामिळनाडू या राज्यांमध्ये अधिक प्रमाणात फनस पिकते. अनेक पोषक घटकांनी युक्त पण वजनाला जास्त, कापायला अवघड व हाताळायला जिकिरीचे म्हणून ठराविक भागातच असलेली या फळाची उपलब्धता असेहेफळ आहे.फणसाचे एक फळ सुमारे साडेतीन किलो ते दहा किलो वजनाचे असते. फणस हे फळ अनेक पोषणमूल्यं युक्त आहे. पिकलेल्या फणसाची मध्ये सुमारे 63 ते 70 टक्के जलांश असतो.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
jackfruit processing

jackfruit processing

सर्वच फळांमध्ये  सर्वात मोठे फळ म्हणून फणस आपल्याला माहित आहे. महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टीत अधिक प्रमाणात पिकते.महाराष्ट्र व्यतिरिक्त अरुणाचल प्रदेश,दक्षिण भारतातील कर्नाटक,  केरळ व तामिळनाडू या राज्यांमध्ये अधिक प्रमाणात फनस पिकते. अनेक पोषक घटकांनी युक्त पण वजनाला जास्त, कापायला अवघड व हाताळायला जिकिरीचे  म्हणून ठराविक भागातच असलेली या फळाची उपलब्धता असेहेफळ आहे.फणसाचे एक फळ सुमारे साडेतीन किलो ते दहा किलो वजनाचे असते. फणस  हे फळ अनेक पोषणमूल्यं युक्त आहे. पिकलेल्या फणसाची मध्ये सुमारे 63 ते 70 टक्के जलांश असतो.

 पोषणमूल्यांच्या दृष्टीने 10.5 टक्के ते 13.5 टक्के प्रथिने, 22 ते 25 टक्के कर्बोदके त्यातील सुमारे चौदा टक्के पर्यंत शर्करा असून फणसातअत्यंत कमी म्हणजे 0.09 टक्के ते 0.12 टक्के स्निग्धांश असते. या लेखात आपण उपयुक्त अश्या फणसाचे विविध प्रक्रियायुक्त पदार्थ पाहणार आहोत.

 फणसाचे विविध प्रक्रियायुक्त पदार्थ

  • फणसआरटीएस:

साहित्य- फणसाचा गर 500 ग्रॅम,साखर 274 ग्राम, पाणी 2560 मिली, इसेन्स 2,3 ड्रॉप्स, गवार गम 0.25 ग्रॅम

 प्रक्रिया:

  • पिकलेल्या फणसाचा गर काढून त्याचा पल्प 500 ग्राम घेणे.
  • 2560 ग्रॅम  पाणी घेऊन त्यात 247 ग्रॅम साखर घेऊन विरघळून घ्यावे.
  • या साखरेच्या पाकात फणसाचा पल्प एकत्रित करावा आणि व्यवस्थित ढवळून घ्यावे.
  • या गरम मिश्रणात सायट्रिक ऍसिड, इसेन्स आणि गवारगम पूर्णपणे मिक्स करावे.
  • या मिश्रणाचा टीएसएस हा दहा आल्यावरउकळले बंद करून बाटलीत गरम असतानाच भरावे.
  • फणसाचे मफिन्स:

साहित्य- फणसाचा पल्प 200 ग्रॅम, मैदा 250 ग्रॅम,  मिल्क पावडर 100 ग्राम, बेकिंग पावडर 3.75 ग्रॅम, बेकिंग सोडा 3.75 गेम, बटर 50 ग्रॅम,  फणस इसेन्स 3 ड्रॉप्स

 प्रक्रिया:

1-मैदा चाळणीने चाळून घ्यावा नंतर त्यात बेकिंग पावडर आणि सोडा टाकून पुन्हा चाळून घ्यावे.

2-दुसऱ्या पात्रात बटर, फणसाचा पल्प, मिल्क पावडर, फणसाचा इसेन्स एकत्र करून ब्लेंडर ने ब्लेंड करून घ्यावे.

  • याब्लेंडकेलेल्यामिश्रणातमैदाटाकूनपुन्हाब्लेंडरनेएकत्रकरावे.
  • मफिन्स पात्रांना बटर आणि मैदानेग्रीसिंग करावे.
  • ग्रीस केलेल्यामफीनपात्रांमध्ये तीन चतुर्थांश भाग हे मिश्रण भरावे.
  • हे बेकिंग ओव्हनमध्ये 180 अंश  सेल्सिअस तापमानाला ठेवून 20 मिनिटासाठी बेक करावे.
  • बेक केलेले मफिंस  वीस ते पंचवीस मिनिटांसाठी गार करावे आणि खाण्यासाठी फणस मफिन्स तयार होतात.

 कच्च्या फणसाचे लोणचे:

 साहित्य: कच्च्या फणसाच्या गराच्या फोडी 250 ग्रॅम,तेल 115 ग्रॅम,  बडीशेप 6.25ग्रॅम, मेथी बी 3.75 ग्रॅम,काश्मिरी मिरची पावडर 6.25ग्रॅम, बेडगी मिरची पावडर 2.5ग्राम,हिंग अडीच ग्रॅम,मोहरी डाळ 12.5 ग्रॅम, लवंग 1.25 ग्रॅम,मसाला वेलची 1.25 ग्रॅम, काळी मिरी 1.25 ग्रॅम, मीठ 30 ग्रॅम

 प्रक्रिया:

  • मोहरी डाळ कढईत भाजून घेऊन गार करून मिक्सरच्या साह्याने जाडसर भरड करावी.
  • लवंग,मोठी वेलची, बडिशोप, मेथी बी वेगवेगळे भाजून घेऊन गार करावे.
  • या भाजलेल्या मसाल्याची जाड भरड करावी.
  • एका खोल भांड्यात कच्च्या फणसाच्या गराच्या फोडी घ्याव्यात.त्यात मीठ आणि भाजलेल्या मोहरी, डाळीचे भरड,काश्मिरी मिरची पावडर,बेडगी मिरची पावडर आणि मसाल्यांची भरड एकत्र करावे.
  • या मिश्रणात तापवून कोमट केलेले तेल मिश्रित करावे.
  • या सर्व मिश्रणाला बऱ्याच वेळा ढवळून काचेच्या बरणीत भरावे.

4- कच्च्या फणसाच्या खाकरा:

 साहित्य- कच्च्या फणसाच्या गराचा पल्प 100 ग्रॅम,  मैदा 75 ग्रॅम, गव्हाचे पीठ 75 ग्रॅम, तीळ दीड ग्रॅम,  धने पावडर 3.75 ग्रॅम, आमचूर पावडर  3.75 ग्रॅम,लाल मिरची पावडर 2.25ग्रॅम,मीठ  तीन ग्रॅम,तेल साडेसात ग्राम

 

प्रक्रिया:

  • 100 ग्रॅमकच्च्याफणसाच्यापल्पमध्येमैदा,गव्हाचे पीठ,तेल,मीठ,धने पावडर,आमचूर पावडर,लाल मिरची पावडर, तीळएकत्र करून कणिक मळून घ्यावी.
  • या मळलेल्या कणकेच्या गोळ्यावर ओला सुती कापड ठेवून पंधरा ते वीस मिनिटासाठी तसेच ठेवावे.
  • या कणिकेच्या गोळ्याचे 40 ते 45 ग्रॅम वजनाचे छोटे गोळे करावे.
  • एक एक गोळा पातळ लाटून घेऊन गरम तव्यावर दोन्ही बाजूनी खरपूस शेकून घ्यावी.
  • गार करून ये तयार  खाकरा हवाबंद पाकिटात सील करावे.

 

प्रा. (सौ.)एस. एन. चौधरी

के.के.वाघ अन्नतंत्रज्ञान महाविद्यालय, नासिक

 

 

English Summary: the processing of jackfruit Published on: 29 August 2021, 02:52 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters