1. कृषी व्यवसाय

चिंच प्रक्रिया व मूल्यवर्धन

चिंच म्हणाले कि सर्वांच्या तोंडाला पाणी येते ? भारत हा सर्वात जास्त उत्पादन घेण्यामध्ये जगात पहिला क्रमांक लागते. भारतातील विस्तृत प्रदेशात चिंच वृक्ष आढळतात. उष्ण आणि समशीतोष्ण मैदानी अशा दोन्ही प्रदेशात चिंचेची झाडे दिसतात. दक्षिण भारतात खेडोपाड्यात ही झाडे विपुल प्रमाणात असतात. चिंच सामान्य शेतकऱ्यांचा मोठा आधार आहे. तो बहुउपयोगी व मूल्यवान वृक्ष आहे. त्याच्या प्रत्येक भागाचा उपयोग होतो. मुख्यत: त्याच्या फळांपासून चांगले उत्त्पन्न मिळते.

KJ Staff
KJ Staff


चिंच म्हणाले कि सर्वांच्या तोंडाला पाणी येते ? भारत हा सर्वात जास्त उत्पादन घेण्यामध्ये जगात पहिला क्रमांक लागते. भारतातील विस्तृत प्रदेशात चिंच वृक्ष आढळतात. उष्ण आणि समशीतोष्ण मैदानी अशा दोन्ही प्रदेशात चिंचेची झाडे दिसतात. दक्षिण भारतात खेडोपाड्यात ही झाडे विपुल प्रमाणात असतात. चिंच सामान्य शेतकऱ्यांचा मोठा आधार आहे. तो बहुउपयोगी व मूल्यवान वृक्ष आहे. त्याच्या प्रत्येक भागाचा उपयोग होतो. मुख्यत: त्याच्या फळांपासून चांगले उत्त्पन्न मिळते.

चिंच मुल्यवर्धन

चिंचेत 55% भाग गराने व्यापलेला असतो. त्यातील 14% भाग चिंचोके असतात, 11% कवच व रेषा (फायबर) असतात. चिंचेत आंबट-गोड रसायन असते. चिंचांची उत्तम चटणी बनवतात. सॉस व सरबत बनवतात. युरोप, अमेरिकेत चिंचेतील आंबट रसायन वापरून उत्तम आरोग्यदायी पेय बनवितात. कैरीच्या पन्ह्याप्रमाणे चिंचेपासून पन्हे बनवतात. चटकदार भेळ, पाणीपुरी यांसाठी चिंचेचे पाणी वापरतात. याशिवाय अनेक खाद्यापादार्थंत चिंचेचा वापर करण्यात येतो. तांब्या-पितळेची भांडी स्वच्छ करण्यासाठी चिंच वापरतात, चिंचेमधील एसिड मुळे भांडी लख्ख व स्वच्छ निघतात. अनेक औषधात चिंचांचा उपयोग करतात. चिंचेची पावडर बनवतात. तिचा उपयोग गोळ्या, बिस्किटे व चॉकलेटमध्ये करतात. भारतात रोजच्या आहारात चिंचेचा वापर केला जातो. चिंचगुळाची आमटी, चिंचेचे सार, चिंचेची चटणी, चिंचेचा कोळ, अर्क इत्यादी अनेक रूपांत चिंच वापरली जाते. अलीकडे चिंचेपासून पावडरही तयार करतात. दक्षिण भारतात चिंच विपुल प्रमाणात दिसतात. उत्पन्नासाठी शेतीच्या बांधावर चिंचेची झाडे उगवत असतात.

चिंचेच्या 100 ग्रॅम खाण्यायोग्य भागातील अन्नघटकांचे प्रमाण:

  • पाणी- 21.0%,
  • शर्करा (कार्बोहायड्रेट्स)- 67.4%
  • प्रथिने (प्रोटीन्स)- 3.0%
  • स्निग्धांश (फॅट्स)- 0.1%
  • खनिजे- 3.0%
  • तंतुमय पदार्थ- 5.6%
  • कॅल्शियम- 0.17%
  • स्फुरद- 0.2%
  • लोह- 0.9%
  • क जीवनसत्व 3 मि.ग्रॅम
  • उष्मांक (कॅलरी)- 283
  • चिंचेच्या वाळलेल्या गरामध्ये 7.2%
  • पोटॅसिक बायटार्टरेट, 9.1%
  • टार्टरिक एसिड आणि 2.2%
  • सायट्रिक एसिड तसेच अल्प प्रमाणात
  • मॅलिक एसिड इत्यादी.

चिंचेचे वाण:

योगेश्वरी (गोड चिंच), अजिंठा (गोड), MAU-263, थायलंड व महाराष्ट्रात मराठवाडा कृषी विद्यापीठाने 'प्रतिष्ठान' नावाची चिंचेची जात निवड पद्धतीने शोधून काढली आहे.

फळांची साठवण आणि पिकविण्याच्या पद्धती:

चिंचेच्या फळांची काढणी चिंचेची फळे झाडावर पक्व झाल्यावर केली जाते. त्यामुळे फळे पिकविण्याच्या स्वतंत्र पद्धती नाहीत. चिंचेच्या फळांची काढणी केल्यानंतर टरफले, चिंचोके आणि शिरा काढून उरलेला गर वाळविता. काही वेळा टरफलासह चिंच उन्हात 7-8 दिवस वाळवितात आणि नंतर गर वेगळा करतात. असा वाळविलेला चिंचेचा गर कोणतीही प्रक्रिया न करता तसाच साठविला जातो.

प्रक्रिया पदार्थ: सर्वसाधारणपणे चिंच फळात गर 30%, बी 40% कवच किंवा टरफल 30% असतात.

चिंच प्रक्रिया:

चिंचा पूर्ण पिकल्यावर त्या झाडावरून काढून व गोळा करून पोत्यांत भरतात. नंतर त्याचेवरील टरफल काढून गरांतील चिंचोके काढून टाकतात. या चिंच गरात मीठ मिसळून त्याचे लहान-लहान गोळे करून पासून सिरप, रसाचा अर्क, रस व थंडपेय इत्यादीही प्रक्रियांपासून पदार्थ तयार करता येतात. चिंचेच्या गरापासून चिंच पावडर तयार करण्याची पद्धत सी.एफ.टी.आर.आय. म्हैसूर या संस्थेने विकसित केलेली आहे. विक्रीसाठी बाजारात पाठविले जातात. परंतु चिंचे पासून सिरप, रसाचा अर्क, रस व थंडपेय इत्यादीही प्रक्रियांपासून पदार्थ तयार करता येतात. चिंचेच्या गरापासून चिंचापावडर तयार करण्याची पद्धत सी.एफ.टी.आर.आय. म्हैसूर या संस्थेने विकसित केलेली आहे.

1. सिरप:

पूर्ण पिकलेल्या चिंचाचे हाताने टरफल काढणे. बियासह गर रात्रभर गरम पाण्यात ठेवणे. त्यामुळे बीपासून गर अगल होण्यास मदत होते. लायनर फिल्टरमधून गाळून घेणे. गरम पाण्याने धुणे. गर व पाणी 1:2 याप्रमाणे मिसळावे. पातळ मिश्रण सेंट्रिफ्युज करणे. तयार झालेल्या गरांपासून नेहमीच्या पद्धतीप्रमाणे सिरप तयार करता येते. तयार झालेल्या सिरपमध्ये खालील प्रमाणे घटक पदार्थ असावेत. गर 20 ते 24 टक्के, एकूण विद्राव्य घटक 56.30%, रीड्युसिंग शुगर- 43.80%, एकूण साखर 56.5%, आम्लता- 1.11% चिंच गराचा उपयोग जॅम-जेली आईस्क्रिम व थंड पेय इत्यादी पदार्थामध्ये करता येतो.

2. रस 

गरामध्ये निर्लोपीन 12 ते 15 टक्के मिसळणे. हे द्रावण 60 ते 100 सें.ग्रे. तापमानाला 10 ते 15 दिवस ठेवणे. तळाशी साचलेला साका ढवळणार नाही अशा बेताने वरील द्रावण एका भांड्यातून दुसऱ्या भांड्यात ओतणे. एसबेस्टॉंसचा उपयोग करून निर्वात (vacuum) मध्ये गाळून घेणे. ह्या द्रावणाची आम्लता 75 ते 80 व ब्रीक्स 18% स्थिर करणे, 80 ते 75 डी. सें.ग्रे. तापमानाला 5 मिनिटे निर्जंतुकीकरण करणे. त्यानंतर आपणास मिळतो तो चिंचेचा रस.

3. रसापासून अर्क (Concentrate)

रसापासून चांगल्या प्रतीचे अर्कसुद्धा करता येते. त्याकरिता रस निर्वात बाष्पीत्राच्या (Vacuum Evaporators) सहाय्याने टी.एस.एस. 65 ते 68 डी. ब्रिक्स येईपर्यंत आटवून करावा. अशा तीव्र रसास अर्क संबोधले जाते. या तयार झालेल्या अर्कास चिंचेचा सुंगध व वास येईल याची काळजी घ्यावी. हा अर्क पुढे सरबत, सिरप तयार करणेसाठी सुद्धा वापरता येईल.
चिंच अर्कातील घटक पदार्थ: घटक पदार्थ प्रमाण एकूण टारटारीक आम्ल 13%, प्रति रूपांतील साखर 50% (Invert Sugar), पेक्टिन 2%, प्रथिने 3%, पेशीयुक्त पदार्थ- Cellulose Material 2%, पाणी 30%.

4. शितपेय तयार करणे

साहित्य (1 लिटरसाठी): अर्क- 100 मिली, साखर- 131 ग्रॅम, सायट्रिक आम्ल- 0.8 ग्रॅम, पाणी- 782.2 मिली, सोडियम बेण्झोयेट- 0.15 ग्रॅम.

कृती: शितपेय तयार करणेकरिता चिंचगर 9 ते 12% घेऊन त्याचा ब्रीक्स 21.5 डी. स्थिर करावा. नंतर तयार झालेले मिश्रण 85% सें.ग्रे. तापमानाला 20 ते 25 मिनिटापर्यंत निर्जंतुक करून थंड करून अगोदर निर्जंतुक केलेल्या काचेच्या बाटल्यांत किंवा कॅनमध्ये भरून ते 29.4 डी. सें.ग्रे. तापमानाला साठवावे. अशा प्रकारे तयार केलेले पेय एक वर्षापर्यंत चांगल्या स्थितीत राहते. अशाप्रकारे दुर्लक्षित परंतु उपयुक्त अशा चिंच फळापासून अनेक प्रकारचे चवदार मधुर पदार्थ तयार करता येतात.

औषधी गुणधर्म:

  • चिंच भूक वाढविण्यासाठी मदत करते.
  • चिंच श्रम, भ्रम व ग्लानी दूर करतात.
  • चिंचेची कोवळी पाने तशीच खाण्यासाठी किंवा भाजी तयार करण्यासाठी वापरतात. त्यामध्ये लोह, फॉस्फरस, क्‍लोरिन, तांबे व गंधक ही खनिजे आहेत.
  • चिंच पाने सूज दूर करण्यासाठी उपयुक्त आहे.
  • वात व पित्तशामक आहेत.
  • उष्माघातात चिंच सरबत किंवा पन्हे हितकारक आहे.

शिंदे एस. टी, पटांगरे सुवर्णा व पवार. व्ही. एस
एम टेक (फूड टेक), अन्न तंत्र महाविद्यालय 
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी- ४३१४०२
9172721301

English Summary: Tamarind Processing and value addition Published on: 21 April 2019, 02:25 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters