मित्रांनो देशात वाढती बेरोजगारी एक चिंतेचा विषय बनत चालली आहे. कोरोना काळात तर अनेक लोकांचे रोजगार गेलेत आणि त्यामुळे अजूनच बेरोजगारी वाढली. त्यामुळे व्यवसाय करण्याशिवाय हि बेरोजगारी कमी होणार नाही. व्यवसाय हि काळाची गरज बनत चालली आहे. अनेक तरुण हे व्यवसाय करू पाहतात पण त्यांना पुरेशी माहिती नसल्याने आणि पुरेसं भांडवल नसल्याने त्यांना व्यवसाय सुरु करता येत नाही म्हणून आज कृषी जागरण खास आपल्या वाचक मित्रांसाठी एक कमी खर्चात सुरु होणाऱ्या व्यवसायाविषयीं माहिती घेऊन आले आहे. मित्रांनो आम्ही आज आपणास लोणचे बनवण्याचा व्यवसायाविषयीं माहिती सांगणार आहोत चला तर मग वेळ न दवडता जाणुन घेऊया ह्या बिजनेसविषयी सविस्तर.
मित्रांनो बेरोजगार युवक युवती तसेच अनेक नौकरी करणारे नौकरदार अतिरिक्त इनकम म्हणून व्यवसाय शोधत असतात. म्हणुन अशा युवकांना मार्गदर्शन म्हणुन आज आम्ही पिकल बिजनेस विषयी माहिती सांगणार आहोत. मित्रांनो लोणचे हे भारतीय पक्वानातील एक महत्वाचा भाग आहे. आपल्याकडे तोंडाला चव यावी म्हणुन लोणचे हे जवळपास दरदिवशी खाल्ले जाणारे पकवान आहे. म्हणुन याची मागणी हि खुप लक्षणीय आहे, त्यामुळे ह्या बिजनेसमधून कमाई होण्याचे चान्सेस हे जास्त आहेत. मित्रांनो पिकल मेकिंग बिजनेस हा कमी भांडवलात आणि घरातूनच सुरु करता येणारा एक उत्तम व्यवसाय आहे. मित्रांनो सुरवातीला घरातून सुरवात करून आपण हा बिजनेस वाढवू देखील शकता. चला तर मग जाणून घेऊया ह्या बिजनेसचे संपूर्ण गणित.
दहा हजारात सुरु करा पिकल मेकिंग बिजनेस
मित्रांनो जर आपणही कमी पैशात व्यवसाय सुरु करण्याच्या विचारात असाल तर पिकल मेकिंग बिजनेस आपल्यासाठी एक परफेक्ट सोलुशन असेल. मित्रांनो हा बिजनेस आपण केवळ आणि केवळ दहा हजारात सुरु करू शकता. आणि ह्या बिजनेसमधून आपण 20 ते 30 हजारापर्यंत कमाई देखील करू शकता. मित्रांनो ह्या बिजनेस मधून होणारी कमाई हि आपल्या एरिया नुसार, मागणीनुसार, प्रॉडक्ट्सच्या क्वालिटीनुसार, पॅकिंगनुसार वेगवेगळी म्हणजे कमी किंवा जास्त देखील असू शकते. मित्रांनो आपण आपला तयार माल हा ऑनलाईन तसेच जवळच्या होलसेल, रिटेल इत्यादी ठिकाणी विकु शकतात.
बिजनेससाठी किती जागा लागेल
मित्रांनो पिकल मेकिंग बिजनेस सुरु करण्यासाठी आपल्याकडे जवळपास 1000² फूट जागा हि असायला हवी. आपण यासाठी जागा भाड्याने देखील घेऊ शकता. मित्रांनो भाड्यासाठी अतिरिक्त पैसा हा लागेल. लोणचे तयार करण्यासाठी मोकळ्या जागेची आपणास आवश्यकता लागेल. लोणचे पॅक करण्यासाठी, तसेच स्टोर करण्यासाठी जागा हि ऐसपैस हवी. मित्रांनो लोणचे हे बनवताना स्वच्छता असायला हवी जेणेकरून लोणचे हे जास्त काळ टिकेल आणि त्याची क्वालिटी हि चांगली राहील.
बिजनेससाठी कोणते लायसन्स लागेल
मित्रांनो पिकल मेकिंग व्यवसायासाठी परवाना म्हणजेच लायसन्स हे जरुरीचे आहे. मित्रांनो जर आपल्याला हा व्यवसाय सुरू करायचा असेल तर आपल्याला भारत सरकारच्या अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (FSSAI) कडून लायसन्स हे प्राप्त करावे लागेल. मित्रांनो व्यवसाय सुरु करण्याआधी लायसन्स संबंधी सर्व प्रक्रिया हि पूर्ण करून घ्यावी जेणेकरून आपल्याला नंतर कुठल्याच समस्यला तोंड द्यावे लागणार नाही. आपण लायसन्स काढण्यासाठी ऑनलाइन देखील अर्ज करू शकता. यासाठी आपण भारत सरकारच्या fssai च्या अधिकृत साईटवर जाऊन अँप्लाय करू शकता.
Share your comments