1. कृषी प्रक्रिया

कमी गुंतवणुकीत सुरू करा पपया फ्रुटीचा व्यवसाय; कमवा बक्कळ पैसा

KJ Staff
KJ Staff


अनेक युवकांना नवीन व्यवसाय करायाची इच्छा असते. पण कोणता व्यवसाय करावा हे त्यांना कळत नाही.  त्यामुळे ते अनेक लोकांचा सल्ला घेतात आणि कुठला तरी व्यवसाय सुरु करतात आणि त्यात नुकसान सोसत राहतात.  आज आम्ही तुम्हाला अशाच एका व्यवसायाविषयीची कल्पना देणार आहोत. या व्यवसायातून तुम्ही आपला स्वताचा ब्रँड बनवू शकतात.   कच्चा पपई वर प्रक्रिया करून टुटी फ्रुटी बनवली जाते.  हा एक चांगला लघु उद्योग किंवा गृह उद्योग होऊ शकतो. कमी गुंतवणूक कमी गुंतवणूकमध्ये चांगला नफा मिळवून देण्याची ताकत या उद्योगात आहे.

   टुटी फ्रुटी म्हणजे काय

 कच्चा पपईवर प्रक्रिया करून टुटी फ्रुटी बनवली जाते. यामध्ये प्रामुख्याने पपईच्या तुकड्यावर साखर आणि कृत्रिम रंगाची प्रक्रिया केली जाते.

   टूटी फ्रूटीचा वापर

मसाला पान मुखवास आईस्क्रीम बेकरी उत्पादने इत्यादींमध्ये टूटीफ्रूटी चा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो.

     बाजारपेठेतील मागणी

 जर आपण आपल्या आजूबाजूच्या पान शॉपचा जरी  विचार केला तरी आपल्याला टूटी फ्रूटीच्या वापराबाबत कल्पना येईल. आईस्क्रीम उद्योग,  बेकरी उद्योग अशा सगळ्या उद्योगांमध्ये टूटीफ्रूटीचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो.  वरती उल्लेख केलेल्या सगळ्या उत्पादनांची मागणी ही दिवसेंदिवस वाढत जाणारी आहे,  त्यामुळे पर्यायाने टूटीफ्रूटीचा वापर आणि मागणी यांच्यात प्रचंड प्रमाणात वाढ होणार आहे.

 टूटीफ्रूटी बनवण्यासाठी लागणारा कच्चा माल

 •   कच्ची पपई
 •  साखर
 •  कृत्रिम रंग
 •  सायट्रिक ऍसिड
 •  मीठ आणि पॅकिंगसाठी लागणाऱ्या प्लास्टिक पिशवी
 •  टुटी फ्रुटी बनवण्यासाठी लागणारी यंत्रसामग्री
 • साल काढण्यासाठी लागणारे यंत्र
 • पपईचे लहान तुकडे करण्यासाठी लागणारी क्युबिंग मशीन
 • पन्नास लिटर क्षमतेचा बॉयलर
 •  कॅटल( शिजवण्याची यंत्र)
 • ड्रायर( वाळवणी यंत्र)
 • वजन काटा
 •  पॅकिंग मशीन

     प्रक्रिया पद्धत

 • तुटी फुटी तयार करण्यासाठी ताइवान  ७८६  या जातीची कच्ची पपई वापरतात.
 • टुटी फ्रुटी तयार करताना अगोदर कच्च्या पपईची साल काढून घ्यावी लागते, त्यानंतर पपईचे तुकडे करून ते १८ टक्के मिठाच्या द्रावणात २१  दिवस भिजत ठेवले जातात.
 • त्यानंतर तुकडे बाहेर काढून ते स्वच्छ पाण्याने धुऊन घेउन त्याचे क्युबिंग मशीनद्वारे लहान तुकडे करतात.
 •  या प्रक्रियेनंतर पपईचे पपईचे तुकडे कॅटल मशीनमध्ये वाफेच्या सहाय्याने शिजवले जातात.
 • शिजवून घेतलेले पपईचे तुकडे तीस टक्के साखरेच्या व तीन टक्के सायट्रिक ऍसिडच्या पाण्यात २४ तास ठेवले जातात.
 •  पपईचे तुकडे साखरेच्या पाण्यातून बाहेर काढून पुन्हा केटेल मशीनमध्ये शिजवले जातात. व त्यामध्ये कृत्रिम रंगाचा वापर केला जातो.
 •  त्यानंतर ते वाळवणे यंत्राद्वारे वाळवून उत्तमरीत्या पॅकिंग केले जातात.


यंत्रसामग्री साठी लागणारा खर्च

 • युनिट उभारण्यासाठी तर स्वतःची जागा राहिली तर उत्तम.
 •  तर  ज्या - त्या परिसरानुसार किंमतीने जागा भाड्याने किंवा विकत घ्यावी लागते.
 • पीलिंग मशीन( साल काढणी यंत्र) – १ लाख १००० रुपये
 •  क्युबिंग मशीन( लहान तुकडे करणारे यंत्र) १,१०००० रुपये
 • स्वयंचलित बॉयलर २,२५०००
 • वाळवणी यंत्र  ६००००  रुपये
 • वजन काटा आणि पॅकिंग मशीन = २० ०००  रुपये

दरम्यान राष्ट्रीय फलोत्पादन योजनेअंतर्गत प्रक्रिया उद्योगासाठी 50 टक्के अनुदान उपलब्ध आहे. हा प्रक्रिया उद्योग व्यवस्थित नियोजन करून आणि तंत्रज्ञानाचा व्यवस्थित अभ्यास करून केला तर भविष्यात शेतकऱ्यांसाठी फायद्याचा उद्योग होऊ शकतो. मनू शेतकऱ्यांनी अजून या उद्योगाविषयी सखोल माहिती घेऊन आपल्या स्वतःचा उद्योग चालू करण्याच्या दिशेने पाऊल टाकावे व आपली आर्थिक उन्नती च्या दिशेने मार्गक्रमण करण्यास काही हरकत नाही.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters