शेती तयार होणाऱ्या मालावर प्रक्रिया करून तो बाजारपेठेत विकून चांगला नफा मिळवण्याची संधी प्रक्रिया उद्योगांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना उपलब्ध होऊ शकते. या लघु उद्योगांसाठी बँकांकडून देखील कर्ज दिले जाते शासनाच्या विविध योजना आहेत.
अशा शासनाच्या योजना समजावून घेऊन व बाजारपेठेत मोठ्या वस्तूंना मागणी जास्त आहे हे लक्षात घेऊन उद्योगांची उभारणी करणे गरजेचे आहे. शेतात तयार होणारी फळे, भाज्या तसेच अन्नधान्य यांवर प्रक्रिया करून त्यापासून विविध प्रकारचे पौष्टिक पदार्थ तयार केले जातात व या उत्पादनांना सध्या चांगली मागणी आहे.
लघु उद्योगातील संधी
जर देशाचा विचार केला तर संपूर्ण अर्थव्यवस्थेमध्ये लघुउद्योगांची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. जर भारताच्या एकूण निर्यातीचा विचार केला तर लघुउद्योगांच्या 33 टक्के योगदान आहे. लघु उद्योग आणि मोठ्या प्रमाणातील उद्योगांमधील एक फरक म्हणजे गुंतवणुकीची एकूण किंमत, रोजगाराची निर्मिती आणि रोख पैशाचा प्रवाह लघु उद्योग म्हणजे दहा लाख रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूक असलेले आणि दोन कोटी रुपयांपेक्षा कमी गुंतवणूक असलेल्या उद्योगांचा समावेश यामध्ये होतो. जर असे लघुउद्योग उत्पादक क्षेत्रात असतील तर किमान गुंतवणूक 25 लाख आणि जास्तीत जास्त पाच कोटींची गुंतवणूक यामध्ये असू शकते.
लघु प्रक्रिया उद्योगासाठी कर्ज
लघुउद्योग स्थापन करण्यासाठी दहा लाखापेक्षा जास्त चा खर्च येतो त्यामुळे कर्ज घेण्याची गरज पडू शकते.त्यामुळे खाली दिलेली प्रक्रिया लघु उद्योग कर्ज घेण्यासाठी महत्त्वाचे आहे.
1-सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे बँकेत खाते उघडणे आवश्यक आहे.
2- आपली व्यवसायाची योजना अशा पद्धतीच्या असावी की आपण आपल्या सोबतच अधिक लोकांना रोजगार देऊ शकू किंवा आपल्या उद्योगाच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध होईल असा व्यवसाय बँकेकडून कर्ज मिळवण्यासाठी महत्त्वाचा आहे.
3- आपण व्यवसाय साठी जे कर्ज घेणार आहोत ते कोणत्या योजनेच्या माध्यमातून घेत आहोत हे ठरवायचे आहे. साठी शासनाच्या विविध प्रकारच्या योजना आहे.
4- आपली कर्जाची गरज किती आहे त्यानुसार कर्ज देणारी योजनेची निवड करावी.
5- आपल्याला कर्ज जा बँकेतून घ्यायचे आहे तेथे संपर्क साधून घेत असलेल्या कर्जाची संपूर्ण प्रक्रिया माहीत करून घ्यावी व त्या बँकेच्या कर्जाची फॉर्म भरावेत.
6- आपण ज्या व्यवसायासाठी कर्ज घेणार आहोत त्या व्यवसायाचा नफा किंवा तोटा याबद्दल बँक आपल्याकडून संपूर्ण स्वरूपाची माहिती घेते. कारण यामागे बँकेचा उद्देश असतो की देत असलेले पैसे आपल्या व्यवसायातून परत मिळतील कि नाही याची खात्री बँक करत असते.
7- कर्ज घेताना आपल्याला आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदार कार्ड किंवा पासपोर्ट यापैकी एखादी ओळखपत्र आवश्यक असते.
8- अनुसूचित जाती/ जमाती, ओबीसी व जनरल कॅटेगरी असाल तर त्यासंबंधीचे प्रमाणपत्र देखील द्यावे लागते.
9- जर तुम्ही तुमच्या चालू व्यवसाय साठी कर्ज घेत असाल तर दोन वर्षापासून चा आयकर आणि वीजबिल इत्यादी तीन वर्षाचे संपूर्ण कागदपत्रे जोडावी लागतात.
लघु उद्योगांसाठी काही महत्त्वाच्या कर्ज योजना
- प्रधानमंत्री मुद्रा योजना
- पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम
- प्रधानमंत्री रोजगार योजना
- लघु आणि मध्यम उद्योजकांना क्रेडिट गॅरंटी फंड योजना
- क्रेडिट निगडित भांडवली अनुदान योजना
Share your comments