व्यवसाय म्हटले म्हणजे लागणारा पैसा आणि त्यातून मिळणारे उत्पन्न यांचा ताळमेळ साधणे खूप गरजेचे असते. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे व्यवसाय स्थापन करण्याच्या अगोदर आपल्या व्यवसायाच्या माध्यमातून उत्पादित होणाऱ्या आम्हाला असणारी बाजारपेठ या गोष्टी खूप महत्वाच्या असतात. व्यवसाय करताना कायम वर्षभर मागणी असणाऱ्या व्यवसायाची निवड आणि कमीत कमी भांडवल अशा पद्धतीने व्यवसायाची निवड केली तर खूपच फायद्याचे ठरेल.
या लेखामध्ये आपण अशाच एका महत्त्वाच्या व्यवसाय विषयी माहिती घेणार आहोत तो अगदी 20 ते 25 हजार रुपयांमध्ये सुरू करता येऊ शकतो.
पोहा मॅन्युफॅक्चरिंग युनिट
आपल्याला जर कोणी नुसते सकाळचा नाष्टा असे जरी म्हटले तरी आपल्या समोर चटकन नजरेसमोर येते पोहे. आता पण पोह्याचा विचार केला तर ते एक पौष्टिक तर आहेच परंतु पचायला देखील सोपे आहे आणि प्रत्येक घरात मागणी असणारा हा पदार्थ असून या माध्यमातून जर तुम्ही पोहा मॅन्युफॅक्चरिंग युनिट उभारला तर तुमचा व्यवसाय खूप चांगल्या पद्धतीने चालू शकतो.
जर आपण पोहा उद्योगाच्या बाबतीत खादी आणि ग्रामोद्योग आयोगाच्या प्रोजेक्ट रिपोर्टचा विचार केला तर पोहा मॅन्युफॅक्चरिंग युनिटची किंमत साधारणतः दोन लाख 43 हजार रुपये आहे. परंतु त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला 90 टक्क्यांपर्यंत कर्जाची सुविधा उपलब्ध होऊ शकते.
याचा अर्थ तुम्ही तुमचे स्वतःचे पंचवीस हजार रुपये या व्यवसायात टाकून आणि बाकीचे कर्ज अशा पद्धतीने हा व्यवसाय सुरू करू शकता.
लागणारे आवश्यक गोष्टी
हा व्यवसाय तुम्हाला सुरू करण्यासाठी पाचशे चौरस फूट जागेची गरज भासते. तसेच पोहे मशीन, पॅकिंग मशीन तसेच भट्टी आणि इतर लहान लहान गोष्टी आवश्यक असतात.
जर आपण खादी आणि ग्रामोद्योग आयोगाच्या अहवालाचा विचार केला तर त्यानुसार सुरुवातीला थोडासा कच्चामाल आणून हळूहळू सुरुवात करावी व नंतर अनुभव जसा जसा येत जाईल व मार्केट वाढेल त्या पद्धतीने व्यवसायात वाढ करणे गरजेचे आहे.
कर्जाची सुविधा
खादी आणि ग्रामोद्योग आयोगाच्या अहवालाचा विचार केला तर खादी आणि ग्रामोद्योग रोजगार योजनेच्या माध्यमातून कर्जासाठी अर्ज केला तर तुम्हाला 90 टक्के कर्ज मिळू शकते.
एकंदरीत नफ्याचे गणित
तुम्हाला प्रकल्प सुरू केल्यानंतर कच्चामाल लागतो. यासाठी तुम्हाला सहा लाख रुपये खर्च येणार आहे.तसेच यासोबत तुम्हाला अतिरिक्त 50 हजार रुपये खर्च करावे लागतात.
एवढ्या भांडवलावर तुम्ही एक हजार क्विंटल पोहे तयार करू शकतात व याचा उत्पादन खर्च आठ लाख 60 हजार रुपये येऊ शकतो. ते एक हजार क्विंटल पोहे तुम्ही दहा लाख रुपयांना विकले तरी तुम्ही जवळपास एक लाख 40 हजार रुपयांपर्यंत नफा मिळवू शकतात.
Share your comments