1. कृषी व्यवसाय

पौष्टिक मखानापासून प्रक्रियायुक्त पदार्थ निर्मिती

सर्वत्र उपलब्ध असणारे, तलाव, तले अशा दलदलीच्या क्षेत्रात उगवणारे मखाना हे पोषणतत्वाने भरपूर असे एक जलीय उत्पादन आहे. मखाना जगामध्ये गोर्गोन नट ड्रायफ्रुट म्हणून ओळखले जाते. मखना मध्ये पोषकतत्वे असल्याकारणाने आरोग्यासाठी लाभदायक आहे, यामध्ये प्रथिने, कार्बोदके, खनिजे असल्याने प्रत्येक वयोगटातील व्यक्तीसाठी फायदेकारक आहे.

KJ Staff
KJ Staff


सर्वत्र उपलब्ध असणारे, तलाव, तले अशा दलदलीच्या क्षेत्रात उगवणारे मखाना हे पोषणतत्वाने भरपूर असे एक जलीय उत्पादन आहे. मखाना जगामध्ये गोर्गोन नट ड्रायफ्रुट म्हणून ओळखले जाते. मखना मध्ये पोषकतत्वे असल्याकारणाने आरोग्यासाठी लाभदायक आहे, यामध्ये प्रथिने, कार्बोदके, खनिजे असल्याने प्रत्येक वयोगटातील व्यक्तीसाठी फायदेकारक आहे.

कमळाची पुष्पथाली आणि बिया याचा वापर खाण्यासाठी करण्यात येतो. कमळाच्या गड्ड्याचा वापर भाजून, तळून किंवा लोणच्यासाठी करण्यात येतो. कमळाला गोल किंवा अंडाकार संत्र्या एवढे फळ येतात. या फळात १० ते २० कवचयुक्त काळ्या बिया असतात. या बियांना भाजून याचा उपयोग गोड पदार्थ, नमकीन, खीर, बर्फी, चिक्की, लाह्या, भाज्यामध्ये केला जातो.

मखानातील गुणतत्वे 

मखाना मध्ये प्रती १०० ग्रॅम कॅलरीज ३५०, कार्बोदके ६५, प्रथिने १८, फॅट १.९-२.१ तसेच २० मि.ग्रॅ. कॅल्शियम, ९० मि.ग्रॅ. फॉस्फरस आणि १.४ मि.ग्रॅ आयर्न, बी १ जीवनसत्वे, पोलीफेनोल, ए‌‍न्टी ऑक्सिडंट्स, पोटॅशिअम, मॅग्नेशिअम असतात यामुळे हृदय, किडनी, डायबेटीजसाठी फायदेकारक आहे. शरीरातील कोलेरेस्टॉल, रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी तसेच स्त्रियांसाठी मखना उपयुक्त आहे कमळाच्या गड्ड्यामध्ये रिबोफ्लाविन, निआसीन, सी आणि ई जीवनसत्वे असते.

मखानापासून पदार्थ

  • मखाना स्नॅक्स/लह्या
    लाह्या/मखाना तयार करण्यासाठी बिया मातीच्या किंवा बीडाच्या कढईमध्ये भाजल्या जातात. दोन तीन दिवस सामान्य तापमानाला ठेऊन पुन्हा २५० ते ३३०°c पर्यंत भाजल्या जातात. लाह्या किंवा स्नॅक्स हे वेगवेगळे मसाले वापरून अनेक प्रकारे बनवता येते. यासाठी मखाना लाह्या कढईमध्ये तेल टाकून भाजून घ्याव्यात. यामध्ये जीरा पावडर, काळे मीठ, आमचूर, मिरची पावडर टाकून भाजून चविष्ट स्नॅक्स बनवता येते. 

  • बर्फी
    मखानाची बर्फी तयार करण्यासाठी मखना कढईमध्ये तेल किंवा तूप टाकून भाजून त्याची पावडर करून घ्यावी. मखना पावडर ७० ग्रॅम, खोबरा खीस ३० ग्रॅम आणि ड्रायफ्रूट बटर टाकून भाजून घ्यावे. नंतर यामध्ये ६० ग्रॅम साखर टाकून मिश्रण घट्ट होईपर्यंत हलवत राहावे. मिश्रण घटत झाले कि ते तूप लावलेल्या ताटामध्ये पसरवून त्याच्या वड्या पाडाव्यात. 

  • मखाना पावडर
    कढईमध्ये मखना बटर टाकून भाजून घ्यावा. त्याला मिक्सर वाटे बारीक करून घ्यावे. हे पावडर भाज्या, सुप, लाडू, दुधामध्ये वापरता येते.

  • खीर
    खीर बनवण्यासाठी मखना तूप टाकून भाजून घ्यावा. गॅसवर दुधामध्ये साखर टाकून विरघळून घ्यावी. त्यामध्ये ड्राय फ्रुट पावडर आणि मखाना टाकून ५-१० मिनिटे उकळून घ्यावी. 

  • चिक्की
    चिक्कीसाठी मखना भाजून घ्यावा आणि त्याचे बारीक तुकडे करून घ्यावेत. कढईमध्ये ५० ग्रॅम गूळाचा एकतरी पाक बनवून त्यात १०० ग्रॅम बारीक केलेला मखाना टाकून एकजीव करुन घ्यावे. हे मिश्रण बटर लावलेल्या प्लेट मध्ये पसरवून घ्यावे आणि काप पाडावेत. चिक्कीचे कप हवा बंद करून साठवून ठेवावी. अशाप्रकारे पौष्टिक चिक्की बनविण्यासाठी यामध्ये शेंगदाणे, राजगिरा, जवस वापरता येते.

लेखक:
सुजाता अनिरुद्ध सोळंके
७०३००८१९६२
शीतल हरीश व्यास सोळंके
९४२००९५२०५
(फूड सायन्स विभाग, जयसिंगपूर कॉलेज, जयसिंगपूर)

English Summary: Production of processed foods from nutritious makhana Published on: 03 April 2020, 07:00 IST

Like this article?

Hey! I am KJ Staff. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters