चिकूची लागवड आपल्या राज्यात मोठ्या प्रमाणात होते. बहुदा बारमाही मिळू शकणारे चिकू हे सर्वांचे आवडते फळ आहे. चिकूच्या फळाचे आयुष्य फार कमी असते ते लवकर खराब होत असल्यामुळे दूरच्या आणि मोठ्या बाजारपेठेत पाठवताना त्या फळांची परिपक्वतेची लक्षणे ओळखून त्यांची शास्त्रोक्त काढणी करणे तसेच काढणीनंतर फळांची प्रतवारी करून त्यांचे पॅकिंग करणे या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. या लेखात आपण चिकू या फळपिकावर कोणत्या पद्धतीने प्रक्रिया केली जाते याबद्दल माहिती घेऊ.
चिकू प्रक्रिया:
चिकू हे फळ जरी पौष्टिक, स्वादिष्ट व मधुर असले तरी ते अल्पायुषी आहे. बाजारात या फळांचा खप न झाल्यास त्यांचे नुकसान होते. म्हणून त्यांच्यावर प्रक्रिया करून त्यांची नासाडी होऊ नये आणि त्यांचा आस्वाद वर्षभर घेण्यात यावा म्हणून त्यावर प्रक्रिया करून त्यांचे आयुष्य वाढवले जाते. चिकू पासून आपण चिकू चा रस, लोणचे, मुरंबा, सरबत, सिरफ, चटणी, बर्फी, चिकू पावडर इत्यादी बनवू शकतो.
- चिकू चा रस:
- यासाठी परिपक्व फळांची निवड करणे आवश्यक असते.
- फळे अगोदर स्वच्छ पाण्यात धुऊन घ्यावेत.
- स्टीलच्या सुरीने काप पाडून घ्यावेत.
- देट, कीड लागलेला भाग इत्यादी अनावश्यक भाग काढून टाकावा.
- फळातील बी वेगळे करावे.
- ज्यूसर मध्ये लगदा करावा.
- - लगद्या ला पेक्टिनोझ एंजाइम ची प्रक्रिया करावी.
- नंतर सेंट्रीफ्यूज करावे.
- तयार रस बॉटलमध्ये पॅक करावा.
- चिकू ची बर्फी:
चिकू पासून रस काढून राहिलेल्या लगद्यापासून चिकु बर्फी हा पदार्थ तयार करता येतो. चिकु बर्फी तयार करण्यासाठी एक किलो घरांमध्ये एक किलो साखर, 50 ग्रॅम मक्याचे पीठ व 120 ग्रॅम वितळून घेतलेले वनस्पती तूप मिसळून शिजवावे. मिश्रणाचा ब्रिक्स 700 आल्यावर त्यात दोन ग्रॅम मीठ व दोन ग्रॅम सायट्रिक आम्ल टाकावे. शिजवण्याची क्रिया 820 ते 830 ब्रिक्स पर्यंत चालू ठेवावे. नंतर हे मिश्रण अगोदर वनस्पती तूप किंवा तूप लावलेल्या ट्रेमध्ये किंवा परातीत ओतावे व एक सेंटीमीटर थर येई पर्यंत ते एकसारखे पसरवावे. थंड झाल्यानंतर सुरीने योग्य आकारमानाचे काप पाडावेत. बर्फी ड्रायरमध्ये किंवा पंख्याखाली सुकवून प्लास्टिक पिशवीत पॅक करून साठवावे.
- जॅम:
पिकलेल्या चिकूच्या गरापासून चांगल्या प्रतीचा जॅम तयार करता येतो. याकरिता चिकूचा गर एक किलो, साखर एक किलो सायट्रिक आम्ल दोन ग्रॅम हे घटक पदार्थ वापरावेत. सर्व घटक पदार्थ एकत्र मिसळून ठराविक घट्टपणा येईपर्यंत शिजवावेत. शिजवताना मिश्रण पळीने हलवावे. शिजलेले मिश्रण गरम असतानाच निर्जंतुक केलेल्या बाटल्यांत भरावे व त्या थंड जागी साठवून की करिता ठेवाव्यात.
- मुरंबा :
चिकूचा मुरंबा मध्यम पिकलेल्या चिकूपासून करता येतो. नंतर मध्यम पिकलेल्या चिकू फळांची स्टीलच्या चाकूने साल काढावी. चिकूच्या फोडी एक किलो, साखर एक किलो, मीठ दहा ग्रॅम, सायट्रिक आम्ल दोन ग्रॅम व विनेगार 25 मिली वापरून मुरंबा करतात. सर्वप्रथम मध्यम पिकलेली चिकू फळे निवडून ती स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यावीत. फळांच्या उभ्या फोडी करून त्यात वरील सर्व पदार्थ मिसळून ते मिश्रण 680 ते सहाशे नव्वद ब्रिक्स पर्यंत शिजवावे. तयार झालेला मुरंबा नंतर गरम असतानाच निर्जंतुक केलेल्या कलेच्या बाटल्यांत भरावा आणि बाटल्या हवाबंद करून कोरड्या व थंड जागी ठेवाव्यात.
- चिकूचे पावडर किंवा भुकटी:
परिपक्व चिकूच्या कडक वाळलेल्या फोडी मिक्सरमध्ये किंवा ग्राइंडर मध्ये दळून त्याची पावडर तयार करा. ही भुकटी एक मीमी छिद्राच्या स्टीलच्या चाळणीतुन चाळुन प्लास्टिक पिशवी मध्ये हवा बंद करता येते. चिक्कू पावडर पासुन चिक्कू मिल्कशेक हे स्वादिष्ट पेय करता येते.
Share your comments