MFOI 2024 Road Show
  1. कृषी व्यवसाय

President Draupadi Murmu: कांद्याच्या दरासाठी थेट राष्ट्रपतींकडे साकडे, देणार 1 टन कांदा भेट

शेतकरी आपल्या शेतात नवनवीन प्रयोग करून उत्पादन काढण्याचा प्रयत्न करत असतात. परंतु सध्या शेतकऱ्यांना आपल्या कांद्यांची उत्पादन खर्चापेक्षा कमी दरानं विक्री करावी लागत आहे, त्यामुळे यावर तोडगा काढण्यासाठी शेतकरी थेट राष्ट्रपती द्रौपदी मुर्म यांची भेट घेणार आहेत.

President Draupadi Murmu

President Draupadi Murmu

शेतकरी (farmers) आपल्या शेतात नवनवीन प्रयोग करून उत्पादन काढण्याचा प्रयत्न करत असतात. परंतु सध्या शेतकऱ्यांना आपल्या कांद्यांची उत्पादन खर्चापेक्षा कमी दरानं विक्री करावी लागत आहे, त्यामुळे यावर तोडगा काढण्यासाठी शेतकरी थेट राष्ट्रपती द्रौपदी मुर्म यांची भेट घेणार आहेत.

सरकारने कांदा प्रश्नावर कायमस्वरुपी तोडगा काढावा यासाठी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना नवनिर्वाचित राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (President Draupadi Murmu) यांची दिल्लीत भेट घेणार आहे. माहितीनुसार यावेळी कांदा उत्पादक संघटनेकडून त्यांना 1 टन कांदाही भेट देण्यात येणार आहे.

ही माहिती महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिघोळे यांनी दिली आहे. कृषीप्रधान (Agrarian) अशी ओळख असलेल्या देशामध्ये कांद्याला सततचा मातीमोल भाव मिळतो, त्यामुळे शेतकऱ्यांचे कोट्यवधीचे आर्थिक नुकसान होत असते.

हे ही वाचा 
Rice farming: अरे व्वा; आता भात लागवड होणार आणखी सोप्पी, यंत्रामुळे शेतकऱ्यांना दिलासा

ज्या वेळेस कांद्याचे थोडेफार दर वाढतात त्यावेळेस कांदा निर्यात बंदी करणे, परदेशी कांदा आयात करणे साठा मर्यादा घालून देणे तसेच व्यापाऱ्यावरती धाडी टाकने अशा विविध भानगडी करुन केंद्र सरकारकडून कांद्याचे बाजार भाव पाडण्याचे काम केले जाते.

भाववाढ झाल्यानंतर तत्काळ विविध प्रकारचे निर्बंध घालणारे केंद्र सरकार कांद्याचे भाव कमी झाल्यानंतर मात्र शेतकऱ्यांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत आहे. गेल्या 7 महिन्यापासून कांद्याला सतत उत्पादन खर्चापेक्षा कमी दर मिळत असून शेतकऱ्यांनी साठवणूक केलेल्या उन्हाळी कांद्याला सरासरी 9 ते 10 रुपये प्रति किलो इतका कमी दर मिळत आहे.

हे ही वाचा 
Eknath Shinde: चक्क एकनाथ शिंदेंनीच केला मोदींचा निर्णय रद्द; आवास योजनेला दिली स्थगिती

सरकारने देशाचे स्वतंत्र कांदा धोरण ठरवावे

केंद्र सरकारने (Central Govt) जागतिक पातळीवर भारतीय कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कांद्याची नियमित बाजारपेठ मिळवून द्यावी, तसेच देशांतर्गत कांद्याचे कमीत कमी दर निश्चित करुन द्यावेत, जेणेकरुन शेतकऱ्यांना शास्वत नफा होईल असे मत महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक (Maharashtra state onion producer) शेतकरी संघटनेनं व्यक्त केलं आहे.

केंद्र सरकारने देशाचे स्वतंत्र कांदा धोरण (Onion policy) ठरवावे याबाबत राष्ट्रपती द्रोपती मुर्मु यांनी केंद्र सरकारला सूचना कराव्यात या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली एक शिष्टमंडळ दिल्लीमध्ये राष्ट्रपती श्रीमती यांची भेट घेणार आहेत.

महत्वाच्या बातम्या 
Animal Husbandry: सावधान! जनावरांमध्ये वेगाने पसरतोय लम्पी स्किन डिसीज, अशी घ्या काळजी
animal husbandry: सावधान! जनावरांमध्ये वेगाने पसरतोय लम्पी स्किन डिसीज, अशी घ्या काळजी
२१०० किलो मटन, तेवढेच चिकण, १२०० किलोचे मासे, १३ हजार अंडी, भाजप आमदाराची आखाड पार्टी जोरात..
Rice farming: भारीच की; शेतकऱ्यांना भात लागवड यंत्रावर मिळतंय 50 टक्के अनुदान; करा आजच अर्ज

English Summary: President Draupadi Murmu Onion Growers Association 1 ton Onion Published on: 26 July 2022, 06:05 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters