बटाटा प्रक्रिया उद्योग हा एक शेतकरी किंवा शेतकरी गट सहजपणे सुरू करू शकतात असा व्यवसाय आहे. आपल्याला माहीतच आहे की बटाट्यापासून चिप्स, वेफर्स म्हणून चांगल्या प्रकारे शेतकरी नफा कमावू शकतात. त्यासाठी काही यंत्राची आवश्यकता असते. याबद्दलची तपशीलवार माहिती या लेखात आपण घ घेऊ.
जर बाजाराचा विचार केला तर चिप्स, वेफर्स बनविणारे आणि कंपन्या सध्या आहेत. परंतु शेतकऱ्यांनी स्वादिष्ट चिप्स, वेफर्स बनवले तर स्थानिक पातळीवरील बाजारपेठ सहज अभ्यास करणे शक्य होईल. त्यासाठी आपल्याला स्थानिक पातळीवर बटाटा उत्पादन आणि त्यावर प्रक्रिया उद्योगाची उभारणी करणे आवश्यक आहे.
जर या उद्योगांसाठीच्या भांडवलाचा विचार केला तर छोट्या स्तरावर हा उद्योग सुरू करण्यासाठी कमीत कमी एक ते दीड लाख रुपयांपर्यंत खर्च अपेक्षित असतो. चिप्स चे दोन प्रकार असतात तळलेले चिप्स आणि दुसरे भाजलेले चिप्स. त्यांचे चवीनुसार साधे चिप्स, खारवलेले चिप्स, मसालेदार चिप्स अशा तीन प्रकारात वर्गीकरण करता येते. आपण तयार केलेली चिप्स हे स्थानिक बाजारात, किरकोळ विक्रेते, साकळी विक्रेते, मॉल किंवा ऑनलाइन रिटेल स्टोअर मार्फत हे तयार केलेल्या चिप्स आपण विकू शकतो. या उद्योगामध्ये जर व्यवस्थित विक्रीचे नियोजन केले तर शेतकऱ्यांना बटाट्यापासून लाखोंची कमाई करता येऊ शकते.
या उद्योगासाठी लागणारी प्रमुख यंत्रे
- साल काढण्याचे यंत्र: चिप्स तयार करण्यासाठी अगोदर बटाटे स्वच्छ धुऊन त्यांची साल काढावी लागते. हे साल काढण्यासाठी बाजारात विविध यंत्र उपलब्ध आहेत. या यंत्राच्या तळाशी गोलाकार सक्ती असते. ही शक्ती बटाटा वरून फिरून साल निघून वेगळी होते. या चकतीचा व्यास 14 इंच, जाडी 0.5 इंच असते. साल काढलेले बटाटे आपोआप पुढे सरकवले जातात. या यंत्रात सिंगल फेज वर चालणारी 1 एचपी क्षमतेचे मोटर असते. यंत्राचे वजन साधारणतः 55 किलो आहे. या यंत्राद्वारे एका वेळेस दहा किलो बटाटाची साल काढली जाते. यंत्राची किंमत सोळा हजार पासून पुढे आहे.
- बटाटा कापण्याचे यंत्र: साल काढलेले बटाट्यापासून छोटे छोटे गोलाकार काप काढण्यासाठी हे यंत्र उपयुक्त आहे या यंत्रात सिंगल फेज मोटर वापरलेली असते. एका तासाला साधारण 200 किलो बटाट्याची काप केले जातात. याची किंमत वीस हजार पुढे आहे.
- ड्रायर: बटाट्याचे चिप्स दीर्घकाळ टिकण्यासाठी त्यातील पाणी काढणे आवश्यक असते. म्हणजे ते वाळवणे गरजेचे आहे. त्यासाठी ड्रायरचा उपयोग केला जातो. हे यंत्र बटाट्याच्या काप मधील पाणी शोषून घेते. हे शोषलेले पाणी आतील गोलाकार भांड्यात साठवले जाते. दर काही टप्प्यानंतर हे भांडे काढून त्यातील पाणी काढून टाकावे. एका वेळेला दहा किलोच्या कापचे पाणी काढता येते.या यंत्रामध्ये 2 एचपी ची सिंगल फेज मोटर चा वापर केलेला असतो. सुमारे 26 हजार पासून पुढे यंत्राची किंमत असते.
- तळण यंत्र: वाळविलेले चिप्स या यंत्राद्वारे तळले जातात. तेल गरम करण्यासोबतच हे तेल सातत्याने फिरते ठेवले जाते. त्यामुळे तेल खराब होत नाही. त्याच प्रमाणे तळाशी जमा होणारा चिप्सचा मलदा काढून टाकला जातो. यंत्र पूर्णपणे ऑटोमॅटिक सिस्टम वर चालते. एका तासाला सुमारे 20 ते 25 किलो चिप्स तोडले जातात. याची किंमत जवळपास पन्नास हजारांच्या पुढे आहे
स्त्रोत – कृषी रंग
Share your comments