1. कृषी प्रक्रिया

चिकूतील काढणी पश्चात प्रक्रिया

KJ Staff
KJ Staff


चिकूची लागवड आपल्या राज्यात मोठ्या प्रमाणात होते, बहुदा बारमाही मिळू शकणारे चिकू हे सर्वांचे आवडते फळ आहे. चिकूच्या फळाचे आयुष्य फार कमी असते ते लवकर खरब होत असल्यामुळे दूरच्या आणि मोठ्या बाजारपेठेत पाठवताना त्या फळांची परिपक्वतेची लक्षणे ओळखून त्यांची शास्त्रोक्त काढणी करणे काढणीनंतर फळांची प्रतवारी करून त्यांचे पॅकिंग करणे या गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत. शीतगृहातील चिकूची साठवण आणि चिकूच्या फळाचे आयुष्य वाढविण्यासाठी करण्यात आलेल्या निरनिराळ्या प्रयोगाची माहिती चिकू उत्पादक शेतकऱ्यांना माहिती असणे आवश्यक आहे.

चिकूच्या फळांची पक्वता आणि काढणी

 • चिकूच्या फळांची परिपक्वतेची लक्षणे ओळखणे तसे अवघड जाते, कारण झाडावर फुले सतत आणि अनियमित येत असतात. त्यामुळे झाडावर एकाच वेळी सर्व फळे पक्वतेच्या अवस्थेत पहावयास मिळत नाहीत.
 • परिपक्व झाल्यानंतर फळांची काढणी उशिरा केली तर अशी फळे २-३ दिवसातच मऊ पडतात आणि वाहतुकी मधे लवकरच खराब होतात, त्यामुळे चिकूच्या फळांची अगदी योग्य वेळा काढणी कारण फार महत्वाच ठरते.

चिकूची प्रतवारी आणि पॅकिंग

चिकूच्या काढणीनंतर आकारानुसार मोठे, मध्यम, लहान, वर्गात फळांची प्रतवारी करावी. फळे नंतर कॅरेट किंवा पोत्यामध्ये पॅक करुन विक्रीसाठी पाठवावीत. कॅरेटमध्ये किंवा पोत्यामधे पॅक करताना आच्छादन म्हणून वाळलेल्या गावातच वापर करावा.

चिकूच्या शीतगृहातील साठवण

परिपक्व परंतु न पिकलेले चिकू ३ ते ५ अंश सेल्सिअस तापमानाला आणि ८५-९० आर्द्रतेला ८ आठवड्यांपर्यंत चांगल्या स्थितीत राहतात. पिकलेली फळे ० ते २ अंश सेल्सिअस तापमानाला आणि ८५ ते ९० आद्रतेला साठवली असता २ आठवाड्यापर्यंत ती टिकतात.  

चिकूवरील काढणी नंतरचे इतर प्रक्रिया

 • काढणी नंतर चिकूची फळे पिकविण्यासाठी पोत्यात भरून ठेवावीत किवा उबदार ठिकाणी ठेवावीत. चिकूची परिपक्व फळे इथ्रेलच्या ५,००० पी.पी.एम च्या द्रावणात बुडवून काढली असता ती २ दिवसात पिकतात.
 • चिकूच्या फाळांना ३ ते ९ % मेणाच्या द्रावणामध्ये बुडवून काढले असता त्यांचे आयुष्य वाढते.
 • चिकूच्या फळावर गॅमा किरणांची प्रक्रिया केली असलेली फळे दीर्घकाळ टिकतात.

चिकू प्रक्रिया

चिकू हे जरी पौष्टीक, स्वादिष्ट व मधुर फळ असले तरी ते अल्पायुषी आहे. बाजारात या फळांचा खप न झाल्यास त्यांचे नुकसान होते. म्हणून त्यांच्यावर प्रक्रिया करून त्यांची नासडी होऊ नये आणि त्याचा आस्वाद वर्षभर घेण्यात यावा म्हणून त्यावर प्रक्रिया करून त्यांचे आयुष्य वाढवले जाते आणि त्यांच्यावर प्रक्रिया करून त्यांचे वेगवेगळे पदार्थ सुद्धा बनविले जातात. जसे की चिकूचा रस, लोणचे, मुरंबा, सरबत, सिरप, चटणी, जॅम, बर्फी, चिकू पावडर इत्यादी.

चिकूचा रसाची कृती:

 • परिपक्व फळांची निवड करणे.
 • फळे स्वच्छ पाण्यात धुणे.
 • स्टीलच्या सुरीने काप पाडणे.
 • अनावश्यक भाग काढून टाकणे (देठ, कीड लागलेला)
 • बी वेगळी करणे.
 • जुसरमध्ये लगदा करणे.
 • लागद्याला पेक्टीनोज एन्झाइमची प्रक्रिया देणे (०.२ % पेक्टीनोज, कालावधी २ तास)
 • सेंट्रीफ्युज करणे.
 • रस बॉटलमध्ये पॅक करणे.

चिकूची बर्फी

चिकूपासून रस कडून राहिलेल्या लगद्यापासून चिकू बर्फी हा पदार्थ तयार करता येतो बर्फी तयार करण्यासाठी एक किलो गरामध्ये एक किलो साखर, ५० ग्राम मक्याचे पीठ व १२० ग्राम वितळून घेतलेले वनस्पती तूप मिसळून शिजवावे. मिश्रणाचा ब्रिक्स ७०० आल्यावर त्यात २ ग्राम मीठ व २ ग्राम सायट्रिक आम्ल टाकावे. शिजवण्याची क्रिया ८२० ते ८३० ब्रिक्स येईपर्यंत चालू ठेवावी. नंतर हे मिश्रण अगोगर वनस्पती तूप किंवा तूप लावलेल्या ट्रेमध्ये किंवा परातीत ओतावे व १ सेंमी. थर येईपर्यंत ते एकसारखे पसरावे. थंड झाल्यानंतर सुरीने योग्य आकारमानाचे कप पाडावेत. बर्फी ड्रायरमध्ये किंवा पंख्याखाली सुकवून प्लास्टिक पिशवीत पॅक करून साठवावी.

जॅम

पिकलेल्या चिकूच्या गरापासून चांगल्या प्रतीचा जॅम तयार करता येतो. याकरिता चिकूचा गर १ किलो, साखर १ किलो व सायट्रिक आम्ल २ ग्राम हे घटकपदार्थ वापरावेत. सर्व घटकपदार्थ एकत्र मिसळून ठरावीक घट्टपणा येईपर्यंत शिजवावेत. शिजवताना मिश्रण पळीने हलवावे. शिजलेले मिश्रण गरम असतानाच निर्जतूक केलेल्या बाटल्यांत भरावे व त्या थंड जागी साठवणूकीकारिता ठेवाव्यात.

मुरंबा

चिकूचा मुरंबा मध्यम पिकलेल्या चिकूपासून करता येतो. नंतर मध्यम पिकलेल्या चिकू फळांची स्टीलच्या चाकूने साल काढावी चिकूच्या फोडी १ किलो, साखर १ किलो, मीठ १० ग्रम, सायट्रिक आम्ल २ ग्राम व व्हिनेगार २५ मिली. वापरून मुरंबा करता येतो. सर्वप्रथम मध्यम पिकलेली चिकू फळे निवडून ती स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यावीत. फळांच्या उभ्या फोडी करून त्यात वरील सर्व पदार्थ मिसळून ते मिश्रण ६८० ते ६९० ब्रिक्स येईपर्यंत शिजवावे. तयार झालेला मुरंबा नंतर गरम असतानाच निर्जंतुक केलेल्या कलेच्या बाटल्यांत भराव आणि बाटल्या हवाबंद करून कोरड्या व थंड जागी साठवाव्यात.

चिकूची पावडर किंवा भुकटी

परिपक्व चिकूच्या कडक वाळलेल्या फोडी मिक्सरमधे किंवा ग्राईंडरमधे दळून त्याची पावडर तयार करा. हि भुकटी १ मि.मी छीद्राच्या स्टीलच्या चाळणीतून चाळून प्लास्टिक पिशवीमध्ये हवाबंद करता येते. चिकू पावडर पासून चिकू मिल्कशेक हे स्वादिष्ट पेय करता येते.

लेखक:
शशिकिरण तुकाराम हिंगाडे
(सहाय्यक प्राध्यापक, आदित्य अन्नतंत्र महाविद्यालय, बीड)
९८८१२२२१०२                       
बालाजी शाहूराज मेटे
(सहाय्यक प्राध्यापक, के.एस.के. अन्नतंत्र महाविद्यालयबीड)
९५२७८५३१५३

Like this article?

Hey! I am KJ Staff. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters