डाळींबाचे मधुर चव, यांचा आकर्षक नैसर्गिक लाल रंग आणि त्याचे औषधी गुणधर्म यामुळे त्याला बाजारात खूप मागणी आहे. डाळिंबामध्ये लोह,फास्फोरस, कॅल्शियम हे खनिज मोठ्या प्रमाणात असतात. डाळींबाचे दाणे, साल, फुले आरोग्यासाठी लाभदायक आहेत.
डाळिंबामध्ये जीवनसत्व अ,जीवनसत्त्व सीआणि फॉलिक ऍसिड भरपूर प्रमाणात असते. या लेखात आपण डाळिंबापासून बनणारे काही प्रक्रियायुक्त पदार्थांची माहिती घेऊ.
डाळिंबापासून बनणारे प्रक्रियायुक्त पदार्थ
अनारदाना-
- चांगले पिकलेले डाळिंबाचे फळ अनारदाना बनवण्यासाठी वापरले जातात. यामध्ये फळांमधील दाणे काढून उन्हात किंवा ड्रायरमध्ये वाळवले जातात. वाळलेल्या या दाण्यामध्ये 5 ते 15 टक्के आम्लं,एक ते सतरा टक्के साखर आणि तंतुमय पदार्थ असतात.
- पदार्थ शिजवताना आंबवण्यासाठी चिंच किंवा आमसुलाचे ऐवजी याचा वापर केला जातो.
डाळिंबाचा रस
- डाळिंब फळे स्वच्छ धुऊन त्याचे साल काढून त्यातील बिया वेगळ्या कराव्यात.नंतर बियांना मिक्सर किंवा फ्रूट ज्यूसर मधून काढून घ्यावी. हा रस 80 ते 82 अंश सेल्सिअस तापमानाला गरम करून घ्यावा.त्यानंतर थंड करून 24 तासांसाठी तसाच राहू द्यावा, जेणेकरून त्यातील बारीक कणतळाला जातील व पारदर्शक रस मिळेल.
- रस गाळून घेऊन तो जास्त काळ टिकून राहण्यासाठी त्यामध्ये 600 पीपीएम सोडिअम बेन्झोएट मिसळावे.त्यानंतर स्वच्छ,निर्जंतुकीकरण केलेल्या बाटलीमध्ये रस भरावा. रसामध्ये सर्वसाधारणतः 16 टक्के एकूण विद्राव्य घन पदार्थ,0.35 टक्के आंबटपणा नियंत्रण ठेवावा
- डाळिंबामध्ये आकर्षक रंग व गोडी असल्यामुळे रसाला चांगली मागणी आहे.डाळिंबाचा रस आता इतर फळांचा रस मिसळून स्वादिष्ट पेय तयार करता येते.
प्रक्रियायुक्त पदार्थ
- डाळिंबाच्या दाण्यापासून 70 ते 80 टक्के रस निघतो.डाळिंबापासून अनेक उत्तम,चवदार पौष्टिक पदार्थ तयार करता येतात.
- फळांपासून जॅम, सरबत आणि अनारदाना यासारख्यांनी पदार्थ तयार करता येतात.फळे व प्रक्रियायुक्त पदार्थांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात मागणी आहे.
- डाळिंबापासून रस, कार्बोनेटेड शीतपेय, अनारदाना,जेली, सिरप, दंतमंजन, अनार गोळी असे अनेक पदार्थ तयार करता येतात. या प्रक्रियायुक्त पदार्थांना बाजारपेठेत चांगली मागणी आहे.
Share your comments