1. आरोग्य सल्ला

अननस आणि मानवी आरोग्य

अननस हे बाहेरुन कडक परंतु आतुन रसरशीत फळ असते. याची आंबट-गोड चव सर्वांनाच खुप पसंत आहे. अननस असे खाण्याऐवजी याचा ज्यूस काढून प्यायले जाते. फ्रूट सॅलाडमध्येही याचा उपयोग केला जातो. अननस फक्त चव नाही तर आरोग्यासाठी देखील खुप फायदेशीर आहे. एक अननस अनेक आजार दूर करते.

KJ Staff
KJ Staff


अननस हे बाहेरुन कडक परंतु आतुन रसरशीत फळ असते. याची आंबट-गोड चव सर्वांनाच खुप पसंत आहे. अननस असे खाण्याऐवजी याचा ज्यूस काढून प्यायले जाते. फ्रूट सॅलाडमध्येही याचा उपयोग केला जातो. अननस फक्त चव नाही तर आरोग्यासाठी देखील खुप फायदेशीर आहे. एक अननस अनेक आजार दूर करते. जाणुन घेऊ अननसच्या 7 मोठ्या फायद्यांविषयी.

अननस (प्रती 100 ग्रॅम) मध्ये उपस्थित पोषक घटक:

  • ऊर्जा: 50 किलो कॅलरीज
  • फायबर: 1.4 ग्रॅम, प्रथिने: 0.54 ग्रॅम
  • कार्बोहायड्रेट: 13.12 ग्रॅम
  • साखर: 9.85 ग्रॅम
  • पोटॅशियम: 109 मिलीग्रॅम
  • मॅगनीझ: 0.927 मिलीग्रॅम
  • कॅल्शियम: 13 मिली
  • फॉस्फोरस: 8 मिलीग्रॅम
  • व्हिटॅमिन सी: 47.8 मिलीग्रॅम
  1. इम्यूनिटी वाढवते
    अननसमध्ये ब्रोमेलेन नावाचे एक तत्त्व असते. ज्यामध्ये अँटी-इनफ्लेमेटरी आणि फायब्रीनोलिटिक तत्त्व असते. हे तत्त्व इम्यून सिस्टम मजबूत करण्याचे काम करते याव्यतिरिक्त अननसमध्ये व्हिटॅमिन सी उच्च प्रमाणात असते. जे इम्यून सिस्टमला वाढवून इंफेक्शन पासुन लढण्याची क्षमता प्रदान करते.

  2. हाडांची मजबूती
    अननस आपल्या हाडांसाठी खुप चांगले असते. कारण यामध्ये मॅगनीज असते. मॅगनीज एक असे पोषकतत्व आहे जे हाडांच्या विकासामध्ये महत्त्वाची भूमिका निभावते. याव्यतिरिक्त ब्रोमेलेनचे अँटी इन्फ्लेमटरी तत्त्व अर्थराइटिस सारख्या गंभीर समस्या दूर करण्याचे काम करते.

  3. डायबीटीजसाठी चांगले
    गोड फळ असले तरी अननसमध्ये ग्लाइसेमिक इंडेक्स आणि कॅलरी खुप कमी असतात. म्हणजेच डायबीटीजचे रुग्ण कसलीच काळजी न करता हे फळ खाऊ शकता.

  4. हृद्य रोगपासुन वाचवते
    अननसमध्ये असे अँटीऑक्सीडेंट्स असतात जे फ्री रॅडिकल्सला स्वच्छ करुन बॅड कोलेस्ट्रॉलचे ऑक्सीडेशन होण्यापासुन वाचवतात आणि हृदय रोगांची शक्यत कमी करतात. अननसमध्ये असलेले ब्रोमेलेन धमन्यामधील रक्त जमा होणे आणि सूज येण्यापासुन थांबवते. यामुळे हृदयाच्या आजारांची भिती कमी होते.

  5. पचनक्रिया चांगली राहते
    अननस फायबरचा चांगला स्त्रोत आहे. फायबर पचन क्रियेला चांगले ठेवते आणि आतड्यांना निरोगी ठेवते. यामध्ये उपलब्ध ब्रोमेलेन पोटाच्या एसिडला नियंत्रणात ठेवते. ज्यामुळे एसिडिटी देखील होत नाही.

  6. ग्लोइंग स्किन (चमकदार त्वचा)
    अननसाचे अँटीऑक्सीडेंटस एजिंगचे लक्षण म्हणजेच सुरकूत्यांपासुन दूर ठेवते. याव्यतिरिक्त व्हिटॅमिन सी त्वचेचा ग्लो वाढवते आणि स्किनला निरोगी ठेवते.

  7. कँसरची शक्यता कमी
    अनेक स्टडीज मध्ये समोर आले आहे की, अननस खाल्ल्याने कँसरची भिती दूर होऊ शकते. कारण यामध्ये कँसरपासुन बचाव करणारे तत्त्व उपलब्ध असतात. एका संशोधनात सांगितले गेले की, अननसमध्ये उपलब्ध ब्रोमेलेन तुम्हाला कोलोरेक्टल कँसर पासुन वाचवते.

शारीरिक कमजोरीसाठी घरगुती उपाय: अननस शरीर, मेंदू आणि हृदयाला तरोताजा करतो आणि शीतलता देतो.

  • 150 मिली अननस रस घ्या.
  • त्यात अर्धा लिंबाचा रस घालावा.
  • अननसचे हे सरबत दिवसातून एक वेळा प्यावे.
    यामुळे शरीराची दुर्बलता कमी होऊन मन आणि हृदय फार मजबूत होतात.

अपचन झाले असल्यास घरगुती उपाय: अननस आपल्या पाचन व्यवस्थेसाठी अमृतासारखे काम करते.

  • 75 मिली अननसाचे रस घ्या.
  • त्यात 75 मि.ली. सफरचंदाचे रस, 1/4 चमचे आले रस आणि 15 ग्रॅम मध चांगले मिक्स करावे.
  • दिवसातील कोणत्याही वेळी, 1 वेळा हे मिश्रण घ्यावे.
    यामुळे, अन्नाचे सामान्य पचन होते व अपचनाची समस्या समाप्त होते.

शरीरावरील फोड्यांसाठी घरगुती उपाय: फोड्यांसाठी अननस खूप फायदेशीर आहे.

  • अननसाचे तुकडे बारीक करून घट्ट पेस्ट बनवा.
  • अननसाची ही पेस्ट 4-5 तास फोडयांवर लावून ठेवा आणि नंतर ते पाण्याने धुवावे.
  • 1 पेला अननसाचा रस देखील प्या.
    दररोज असे केल्याने, बरेच फायदे होतात आणि काही दिवसांत शरीरावर फोड देखील चांगले होतात.

पोटातील वेदने साठी घरगुती उपाय: पोटासंबंधित अनेक रोगांमध्ये अननस लाभ प्रदान करते

  • अननसाचे 100 ग्रॅम काप घ्या.
  • यात 1/2 चमचा कूटलेले जीरे, 1 चिमटी मिरपूड पावडर आणि चवीपुरते मीठ घाला.
    या सर्व गोष्टी ताबडतोब खाऊन घ्याव्यात. पोटात दुखत असल्यास आपल्यास त्वरीत आराम मिळेल.

किडनी स्टोन्ससाठी घरगुती उपाय: किडनी स्टोन्ससाठी अननस देखील अतिशय फायदेशीर आहे.

  • कमीतकमी 1 ते 2 महिने दररोज 1 वेळा अननसाच्या रसाचा 1 ग्लास प्यावा.
    याच्यामुळे, मूत्रपिंडातील दगड हळूहळू लहान होतात आणि नंतर ते मूत्रामार्गे बाहेर पडतात.निसर्गाने दिलेल्या हे आश्चर्यकारक फळ अननस, संबंधित आजारांवर वरदाना सारखेच आहे व आरोग्यसाठी लाभदायक आहे. म्हणूनच सर्व प्रकारच्या फळांमध्ये अननसला विशेष स्थान आणि महत्त्व आहे. केवळ चवीने नव्हे तर घरच्या उपायांसाठी देखील त्याचे महत्त्व अधिक वाढते. म्हणून, निरोगी राहण्यासाठी रोज अननस आहारातून घ्यावे.

पटांगरे सुवर्णा व शिंदे एस.टी.
(पदव्युत्तर पदवी पदवीधारक)
डॉ. व्ही. एस. पवार 
(सहयोगी प्राध्यापक, अन्न तंत्र महाविद्यालय) 
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी

English Summary: Pineapple and Human Health Published on: 30 March 2019, 04:21 IST

Like this article?

Hey! I am KJ Staff. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters