आपण पाहतो की लहान मुलांसाठी किंवा मोठ्यांसाठी लवकरात लवकर स्नॅक्स तयार हवे असतील तर अनेक जण नूडल्स ची निवड करतात.
कारण ते पाच मिनिटात तयार होते तसेच जास्त खर्चिक नसल्यामुळे नूडल्स मार्केट खूप मोठे आहे कारण प्रत्येक घरात नूडल्स चा वापर केला जातो. आता आपण पाहणार आहोत नूडल्स कसे बनवले जातात.
- नूडल्स मेकिंग व्यवसाय कसा सुरु करावा :- नूडल्स बनवण्यासाठी आपल्याला लहान साइज रवा लागतो. त्याचबरोबर नूडल्स बनवण्यासाठी मशीन ची गरज आहे पहिल्यांदा तुम्हाला तो रवा स्वच्छ चाळणीतून चाळून घ्यायचा आहे जेणेकरून त्यात कुठलाही कचरा व इतर गोष्टी राहणार नाहीत त्याच बरोबर पाणी टाकून तुम्हाला त्याचे पीठ बनवायचे आहे वही तयार झाल्यानंतर तुम्हाला नूडल्स बनवणे मशीन मध्ये तुम्हाला ते टाकायचे आहे त्यानंतर ते आटोमॅटिक बनवले जातात.
तुम्हाला मार्केटमध्ये या मशिन उपलब्ध होतात त्यासाठी साधारण तुम्हाला 30 हजार ते 50 हजारापर्यंत खर्च येतो व रवा हा 20 रुपये 30 रुपये किलो मिळू शकतो. अशा पद्धतीने जवळपास सत्तर-ऐंशी हजारात स्वतः नूडल्स व्यवसाय चालू करू शकता
जर तुमची स्वतःची जागा असेल तर तुम्ही तुमच्या घरी सुद्धा बनवून त्याची पॅकिंग करून तुमचा स्वतःचा ब्रॅण्ड तयार करून विकू शकता नूडल्स कुठे विकाल किंवा त्याची मार्केट कुठे मिळेल तर किराणा दुकान व मोठे होलसेल मोठे दुकान यामध्ये तुम्ही तुमचे नूडल्स विकू शकता तसेच वेगळे हॉटेल्स ला पण तुम्ही ते प्रोव्हाइड करू शकता अशा पद्धतीने तुम्ही ऑर्डर मिळू शकता.
नूडल्स व्यवसाय करत असताना तुम्हाला कॉलिटी वर भर द्यावा लागेल कारण बाजारात अगोदरच खूप चांगल्या प्रकारचे ब्रँड आपले ठाण मांडलेले आहेत जर त्यापेक्षा उत्कृष्ट कॉलिटी दिल्या तर तुमचा व्यवसाय खूप पैसा मिळवून देऊ शकतो तुम्हाला त्यासोबत मसाल्याचे लहान पॅकेट पण बनवावे लागतील.
व्यवसाय चालू करण्यासाठी तुम्हाला फुड लायसन ची गरज लागते कारण खाद्यपदार्थ संबंधित कुठलाही व्यवसाय करायचा झाला तर फूड लायसन्स गरजेचे असते
त्याशिवाय त्यात तुम्ही व्यवसाय चालू करू शकत नाही फूड लायसन्स काढल्यानंतर तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही. तुम्ही यातून एक लाख रुपये पर्यंत कमवू शकता
नक्की वाचा:होय ताक म्हणजे आपल्यासाठी अमृत, जाणून घ्या आश्चर्यचकित व्हाल
2-नूडल्स मेकिंग व्यवसाय थोडक्यात माहिती :-
- एकूण भांडवल – 1 लाख
- लागणारा कच्चामाल (इतर गोष्टी) – रवा
- मिळण्याचे ठिकाण – मार्केटमधून
- मशिनरी – नूडल्स मेकिंग मशीन
- मशिनरी किंमत – 30 ते 50 हजार
- मनुष्यबळ -1 ते 2
- विक्री कशी कराल (ग्राहक कसे मिळवाल) – किराणा दुकान, होलसेल व्यापारी, हॉटेल्स.
( संदर्भ - उद्योग आयडिया)
Share your comments