रोजगाराच्या शोधात अनेकांनी गावे सोडून शहरांकडे स्थलांतर केले.जेणेकरून त्याला चांगली नोकरी मिळेल.नोकऱ्यांचे प्रमाण फारच कमी झाल्यानेआणि नोकरी मिळाली तरी तीआपला उदरनिर्वाह चांगल्या पद्धतीने चालेल अशी मिळेल याची काही शाश्वती नाही
त्यामुळे एखाद्या छोट्याशा व्यवसायात उतरणे कधीही चांगले.या लेखात आपण अशाच एकाव्यवसाय बद्दल माहिती जाणून घेणार आहोत,ज्याची सुरुवात तुम्ही अगदी कमी भांडवल गुंतवणुकीतूनया गावातून सहज करू शकतात. या लेखात आपण या व्यवसायाची माहिती घेऊ.
मिनी फ्लावर मिल( पिठाची गिरणी)
पिठाच्या गिरणीचा व्यवसाय हा एक छोटासा व्यवसाय आहे. पिठाच्या गिरणीच्या व्यवसायाला ग्रामीण भागामध्ये चांगली संधी असून हा व्यवसाय सुरू करण्यासाठी सरकार आर्थिक मदतही करते.
यासाठी सरकारने अनेक योजना आखल्या आहेत. या योजनांची मदत घेऊन तुम्ही हा व्यवसाय अगदी सहजरीत्या सुरू करू शकतात आणि स्वतःचा रोजगार उभा करू शकतात.
नक्की वाचा:पुणतांबामध्ये इतिहासाची पुनरावृत्ती होणार; आता शेतकरी घडवणार इतिहास
पिठाच्या गिरणी साठी जागा
आजच्या सुरू करण्यासाठी योग्य जागा निवडणे खूप महत्त्वाचे आहे.साठी तुम्ही जागा निवडताना जिथे खूप गर्दी,एखादी मोठी बाजारपेठ आहे अशा ठिकाणी उघडू शकतात.गावात मोकळी जागा जिथे शेती जास्त आहे.ग्रामीण भागामध्ये हा व्यवसाय खूप मोठ्या प्रमाणात चालतो.
कारण ग्रामीण भागामध्ये दुकानांवरच्या रेडीमेड पिठाचा वापर कोणीच करत नाही. आपल्याकडे असलेले धान्य दळून त्याचाच वापर स्वयंपाक केला जातो.
पिठाच्या गिरणीचा परवाना
जर तुम्हाला हा व्यवसाय लहान प्रमाणात करायचा असेल तर तुम्हाला या व्यवसायासाठीकुठल्याही प्रकारचा परवाना किंवा नोंदणीची गरज नाही.परंतु जर तुम्हाला मोठ्या प्रमाणावर हा व्यवसाय करायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला परवाना आणि नोंदणी करावी लागेल.
तुमच्या जवळच्या अन्न विभागात सहज बनवले जाईल.तुम्ही महानगरपालिका,नगरपालिका इत्यादींकडून व्यापार परवाना देखिल मिळू शकतात जर तुम्ही शहरी भागात हा व्यवसाय करत असाल तर.
नक्की वाचा:येत्या 2 दिवसात महाराष्ट्रात मान्सूनचे जोरदार आगमन,हवामान विभागाचा अंदाज
पिठाच्या गिरणीचा खर्च
हा व्यवसाय बाजारपेठेमध्ये प्रामुख्याने ग्रामीण भागात अतिशय वेगाने वाढणारा व्यवसाय आहे. यासाठी तुम्हाला मशीन आणि इतर व्यवसायिक आवश्यक गोष्टींसाठी सुरुवातीला सुमारे कमीत कमी 50 हजार ते जास्तीत जास्त एक लाख रुपये खर्च करावे लागतात. एकदा जर तुम्ही हा व्यवसाय सुरू केला तर तुम्हालाभविष्यात खर्च करायची जास्त गरज राहत नाही फक्त सर्वात चांगली कमाई या माध्यमातून करू शकतात.
नक्की वाचा:मराठमोळ्या शेतकऱ्यांनी करून दाखवले; आता चाळीतील खराब कांद्याची चिंता मिटली
Share your comments