1. कृषी व्यवसाय

बाजरी मूल्यवर्धनातून वाढवा नफा

बाजरीच्या पिठाचा वापर इतर पिठात मिसळून तयार केलेल्या पदार्थाचा कुरकुरीतपणा तसेच पौष्टिकता वाढण्यास मदत होते. तयार होणाऱ्या पदार्थाचे मूल्यवर्धन देखील होऊन ते पौष्टिक बनतात.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
millet crop

millet crop

 बाजरीच्या पिठाचा वापर इतर पिठात मिसळून तयार केलेल्या पदार्थाचा कुरकुरीतपणा तसेच पौष्टिकता वाढण्यास मदत होते. तयार होणाऱ्या पदार्थाचे मूल्यवर्धन देखील होऊन ते पौष्टिक बनतात.

आपल्या आहारात विविधता आणल्यास शरीराचे योग्य प्रकारे पोषण होते. ऊर्जा, प्रथिने, कर्बोदके,खनिज द्रव्य व जीवनसत्त्वे योग्य प्रमाणात शरीराला  मिळाल्यास शरीर निरोगी राहते. मानवी शरीरास सर्वात जास्त ऊर्जा व कर्बोदके तृणधान्य पासून मिळतात. बाजरी अतिशय स्वस्त व पौष्टिक अन्नधान्य आहे. यात भरपूर प्रमाणात पोषकतत्वे आहेत.

  • आयुर्वेद शास्त्राप्रमाणे बाजरी ही उष्ण गुणांनी युक्त मानली जाते. म्हणून आहारात बाजरीचा वापर थंडीच्या काळात जास्त प्रमाणात करणे फायदेशीर ठरते.
  • बाजरी उत्तम ऊर्जास्त्रोत असून विविध प्रकारची खनिज द्रव्ये, जीवनसत्वे व लोहाने समृद्ध आहे.
  • बाजरीच्या सेवनाने रक्तातील शर्करा वाढीचा दर इतर तृणधान्यांच्या मानाने कमी आहे. त्यामुळे मधुमेही व्यक्तीच्या आहारात नियमित बाजरीचा वापर करावा.
  • बाजरीच्या सेवनाने हृदयविकार व पित्ताशयाचे विकार देखील कमी होतात. बाजरी लोह समृद्ध असल्यामुळे बाजरीचा सेवनानेरक्तक्षयास प्रतिबंध करण्यास मदत होते. यामुळे किशोरवयीन मुली, गर्भवती मातांच्या आहारात बाजरीच्या उपयोग करणे फायदेशीर ठरते.
  • हिवाळ्यात बाजरीची भाकरी, लोणी,वांग्याची भाजी किंवा भरीत, उन्हाळ्यात बाजरी च्या खारोड्या पापड्याशेंगदाणे व कांदा तसेच नाश्त्याला गरम खिचडी खाण्याची प्रथा आहे. बाजरीच्या पिठाचा वापर इतर पिठात मिसळून केल्यास तयार केलेल्या पदार्थांचा कुरकुरीतपणा तसेच पौष्टिक पणा वाढण्यास मदत होते. तयार होणाऱ्या पदार्थाचे मूल्यवर्धन देखील होऊन ते पौष्टिक बनतात.
  • बाजारातील पोषकतत्वे
    • पोषकतत्वे प्रमाण ( प्रति 100 ग्रॅम )
    • प्रथिने 6 ग्रॅम.
    • स्निग्ध पदार्थ5.0 ग्रॅम.
    • इतर खनिजे – 2.3 ग्रॅम.
    • कर्बोदके -67.5ग्रॅम.
    • ऊर्जा - 361 ग्रॅम.
    • कॅल्शियम - 42 मि.ग्रॅम.
    • फास्फोरस - 296 मि.ग्रॅम.
    • लोह – 8.0 मि.ग्रॅम.
    • कॅरोटीन 332 म्युजी
    • पोटॅशियम 370 मि.ग्रॅम.
    • जस्त 5 मि.ग्रॅम.
    • मॅग्नेशियम 106 मि.ग्रॅम
    • तंतुमय पदार्थ 3 टक्के.
  • बाजरीचे मूल्यवर्धन
  • प्राथमिक प्रक्रिया:-या टप्प्यात पहिल्यांदा कच्चामाल साफ केला जातो. त्यानंतर बाजरी चाळुन धुऊन स्वच्छ वाळवली जाते. त्यानंतर प्रतवारी करून विक्री पाठवली जाते.
  • प्राथमिक प्रक्रियेसाठी यंत्रे
    • डीस्टोनर :- या यंत्राने धान्यातील खडे, कचरा काढून धान्य साफ केले जाते.
    • डीहलर :-या यंत्राने धान्याचे टरफल काढले जाते. धान्याला पॉलिश केले जाते.
    • दुय्यम प्रक्रिया :-

 प्राथमिक प्रक्रिया झाल्यानंतर बाजरी अण्णा म्हणून वापरण्यात येण्यासाठी त्यावर दुय्यम प्रक्रिया करतात. यांपासून पीठ,भरडा, सुजी, रवा यांसारख्या पदार्थांची निर्मिती केली जाते.

  • प्रक्रियेसाठी ची यंत्रे
  • पल्वलायझर यंत्र:- या यंत्राचा वापर करून धान्यापासून पीठ, भरडा, रवा तयार केला जातो.
  • फ्लोअर शिफ्टर :-हे यंत्र धान्याचे पीठ व रवा वेगळे करण्यासाठी वापरले जाते.
  • तिसरी प्रक्रिया
  • तिसऱ्या टप्प्यात दुय्यम प्रक्रियेतून तयार झालेल्या बाजरी पासून विविध पदार्थ जसे की भाकरी, खारोड्या, पापड्या,खिचडी, चिवडा, लाया, शंकरपाळे निर्मिती केली जाते.
  • बाजरीचे पीठ व इतर पिठात मिसळून अनेक मूल्यवर्धित पदार्थ बनविले जातात. परभणी येथील गृह विज्ञान महाविद्यालयाने बाजरीचे विविध पदार्थ तयार केले आहेत.
English Summary: millet processing is give more profit to farmer and fanancial growth Published on: 21 February 2022, 09:41 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters