दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या वतीने बारामतीमध्ये कृषिक कृषी तंत्रज्ञान सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. यामुळे आता यामध्ये अनेक नवनवीन प्रयोग बघायला मिळणार आहेत. यावर्षी कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने ९ ते १३ फेब्रुवारी दरम्यान कृषिक-कृषी तंत्रज्ञान सप्ताह आयोजित केला जाणार आहे. दरवर्षी यामधून अनेकांना मोठा फायदा होतो. शेतीसंबंधीत अनेक नवीन प्रयोग, आधुनिक उपकरणे देखील यामध्ये दाखवली जाणार आहेत. सध्या शेतकऱ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. यामुळे यामधून शेती नेमकी कशी करायची यासंबंधी याबाबत माहिती दिली जाणार आहे.
यामध्ये राज्यातील पर्यावरण, उच्चशिक्षण आणि शेती या खात्याशी निगडित मंत्रीमहोदय या प्रदर्शनाची पाहणी करणार आहेत. ज्या माध्यमातून राज्याच्या नव्या कृषी धोरणाचा पर्याय आखता येणार आहे. यामधून शेतकरी तोट्यातून फायद्यात आला पाहिजे, यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. या सप्ताहामध्ये शेतकऱ्यांना होमिओपॅथीचा कृषी क्षेत्रात प्रभावी वापर करून उत्तम प्रकारची शेती करता येते याचे जिवंत प्रात्यक्षिक पाहता येईल. एम्ब्रिओ ट्रान्सप्लांट पद्धत वापरून वासरांची निर्मिती व पशुरोग निदान सुविधा या सप्ताहात पाहता येईल. याचा शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.
यामध्ये विकेल ते पिकेल, एक जिल्हा एक पीक अशी यापूर्वी न पाहिलेली अनेक शेती व शेतीपूरक व्यवसायाची प्रयोगांची पाहणी येथे करता येणार आहे. तसेच लघुउद्योग, मशिनरी प्रक्रिया मार्गदर्शन मिळणार आहे. जर्मनी, चीन, नेदरलांड थायलंड जपान देशांमध्ये वापरले जाणारे खत व्यवस्थापनाचे तंत्रज्ञान देखील पाहता येईल. त्याचबरोबर अत्यंत कमी खत मात्रेमध्ये अधिकाधिक उत्पादन घेण्याचा यशस्वी प्रयोग देखील पाहता येणार आहेत. यामुळे येथील तंत्रज्ञान राज्यातील शेतकऱ्यांसाठी भविष्यात फायदेशीर ठरणार आहेत.
तसेच यामध्ये भाजीपाला, पिकांचे जिवंत प्रात्यक्षिक पाहता येईल. आरोग्यदायी भरडधान्य, फुलांच्या विविध जाती व लागवड तंत्रज्ञान, मधुमक्षिका पालन, जैविक खते, PROM उत्पादन व इतर बरेच काही या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. एकाच पिकावर इतरही फळे किंवा भाज्या आपल्याला बघायला मिळणार आहेत. यामुळे शेतकरी आपल्या शेतात असे प्रयोग देखील करू शकणार आहेत. याठिकाणी याचे सगळे मार्गदर्शन केले जाणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे, अशी माहिती ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे प्रमुख राजेंद्र पवार यांनी दिली.
Share your comments