समाजामध्ये बरेच व्यक्ती अशा आहेत की ते नोकरी करताना अतिरिक्त आर्थिक उत्पन्नाचा स्त्रोत म्हणून एखादा चांगला व्यवसायाच्या शोधात असतात. बरेच जण चांगला व्यवसाय नोकरी सांभाळून करतात व आर्थिक प्रगती देखील साधतात. असाच एका चांगल्या व्यवसायाची माहिती आपण या लेखात येणार असून तुम्ही नोकरी सांभाळून हा व्यवसाय चांगला आर्थिक नफा मिळवू शकतात.
टोफू अर्थात सोयापनीरचा व्यवसाय
सणासुदीच्या काळात बाजारात सोयापनीरची मागणी झपाट्याने वाढत आहे. हा व्यवसाय व्यवस्थित नियोजनाने केल्यास अतिरिक्त कष्ट करण्याची गरज भासत नाही. जर तुमची तीन ते चार लाख रुपये भांडवल गुंतवणूक करण्याची तयारी असेल तर तुम्ही या माध्यमातून व्यवस्थित नियोजन करून दरमहा लाखो रुपये कमवू शकतात.
तुम्हाला जर हा व्यवसाय सुरू करायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला एक बॉयलर,जार, सेपरेटर आणि एक लहान फ्रीझर लागते. या सगळ्या गोष्टींसाठी तुमचा दोन लाख रुपये खर्च येतो.
टोफू अर्थात सोया पनीर कसे तयार करतात?
सोया पनीर तयार करण्यासाठी तुम्हाला प्रथम सोयाबीन बारीक करून 1:7 या प्रमाणात पाण्यात चांगले उकळावे लागेल. त्यानंतर एक तास बॉयलर आणि ग्राइंडर ची प्रक्रिया केल्यानंतर यामध्ये चार ते पाच लिटर दूध मिसळावे लागेल.
ही प्रक्रिया केल्यानंतर दूध हे दह्यासारखे होईल. त्यानंतर तुम्ही त्यात उरलेले पाणी काढून टाकावे. त्यानंतर हे असेच सुमारे एक तास राहू द्या आणि मग तुम्हाला सुमारे तीन किलो सोयापनीर या माध्यमातून मिळेल. या प्रक्रियेच्या माध्यमातून तुम्हाला दररोज 30 ते 35 किलो टोफू म्हणजेच सोया पनीर मिळू शकते.
यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही सोया पनीर तयार करतात तेव्हा सोया पनीर तयार झाल्यानंतर काही पदार्थ उरतात म्हणजेच आपण त्याला टोफु केक असे देखील म्हणतात. या केक पासून तुम्ही तर अनेक उत्पादने तयार करू शकतात. या केकसह तुम्ही बिस्कीट आणि इतर खाद्यपदार्थ तयार करू शकतात.
या व्यवसायातून मिळणारा नफा
वरील प्रक्रियेनुसार तुम्ही सोया पनीर तयार केले तर तुम्हाला दररोज 30 ते 35 किलो सोया पनीर मिळते. या माध्यमातून तुम्ही दरमहा एक लाख रुपये कमवू शकतात.
कारण बाजारपेठेत या उत्पादनांना खूप मागणी आहे. जसे की सोया दूध, सोया पनीर इत्यादी उत्पादने खूप महाग विकली जातात. कारण ही उत्पादने मानवी आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत. त्यामुळे बरेच डॉक्टर टोफू म्हणजेच सोया पनीर खाण्याचा सल्ला देतात.
नक्की वाचा:Bussiness Tips: भरपूर मागणी असणारा व्यवसाय आणि कमी गुंतवणूक,कमाई मात्र प्रतिमाह लाखात
Share your comments