सीताफळ हे आपल्या सगळ्यांना माहिती असणारे फळ आहे. सीताफळ हे कोरडवाहू फळ पिकातील महत्वाचे फळ असूनत्याचा उत्पादनाचा हंगाम हा सप्टेंबर ते नोव्हेंबर पर्यंत असतो.हे फळ एक नाशवंत फळ असून ते जास्त दिवस पिकत नाही किंवा साठवता येत नाही
त्यामुळे ते पक्व झाल्यानंतर त्यावरप्रक्रिया करून त्यातील गर वेगळा करूनत्याची साठवणूक केल्यासत्याच्या पासून वेगवेगळ्या प्रकारचे प्रक्रियायुक्त पदार्थ बनवता येतात.त्यामुळे वर्षभर सीताफळाचा आस्वाद आपल्याला घेता येऊ शकतो.या प्रक्रिया उद्योगाच्या माध्यमातून सिताफळा पासून सिताफळाचे गराची पावडर,मिल्क शेक,श्रीखंड,सीताफळ आईस्क्रीम,टॉफी, जॅमसरबत इत्यादी पदार्थ तयार करता येतात.या लेखात आपण सीता फळावर प्रक्रिया करून मिल्क शेक आणि श्रीखंड कसे बनवतात याबद्दल माहिती घेऊ.
सिताफळा पासून बनवता येथे श्रीखंड आणि मिल्क शेक…
मिल्कशेक बनवण्याची पद्धत
1-यासाठी सर्वप्रथम गाईचे किंवा म्हशीचे दूध स्वच्छ गाळून घ्यावे.
2- त्यानंतर त्या दुधास सातशे सेंटीग्रेड तापमानास 15 मिनिटे गरम करावे.
- त्यामध्ये 0.40 हक्के सोडियम एलजीनेट मिसळून त्यात दहा टक्के साखर आणि 10% गर किंवा पावडर मिसळून हे मिश्रण चांगले गाळून घ्यावे.
4-त्यानंतर सातशे सेल्सिअस तापमानास तीस मिनिटे गरम करावे.
5- परत ते दोनशे अंश सेल्सिअस ते 400 अंश सेल्सिअस तापमानाला सात मिनिटेथंड करून मिक्सरमध्ये घुसळून घ्यावे.
सिताफळ श्रीखंड
1-यासाठी प्रथम पिकलेली निरोगी सिताफळ स्वच्छ धुऊन घ्यावेत व त्यांचा गर काढावा.
2- त्यानंतर त्यात 100 ग्रॅम गर, 500 ग्राम साखर व 400 ग्राम चक्का मिसळून मिश्रण चांगले एकजीव करुन घ्यावे.
3-नंतर त्यामध्ये काजू,बदाम,पिस्तायांचे बारीक तुकडे करून टाकावेत व ते मिश्रण फ्रीजमध्ये ठेवून थंड होण्यासाठी ठेवावे.
Share your comments