जे शेतकरी पशुपालन व्यवसाय करतात त्यांच्या घरात दुध हे खूप मोठ्या प्रमाणात असते. मूलतः दूध व्यवसाय हा शेतकऱ्यांच्या प्रगतीचा एक मोठा आधार आहे. आपल्याकडे दूध व्यवसाय हा परंपरागत रीतीने आहे त्या स्वरूपात चालत आलेला आहे. दूध हे एक पूर्णान्न असून शरीरासाठी खूप उपयुक्त आहे. या लेखात आपण नासलेल्या दुधापासून कोणाचे प्रक्रियायुक्त पदार्थ तयार करता येतात हे पाहू.
नासलेल्या दुधापासून तयार करता येणारे प्रक्रियायुक्त पदार्थ
1- छन्ना- दुधामध्ये आम्ल मिसळून दुधाचे विघटन करून त्यामधील पाणी काढून त्यापासून घनपदार्थ मिळवला जातो त्याला छन्ना असे म्हणतात. दूध नासावे यासाठी लॅक्टिक आम्ल किंवा सायट्रिक आम्ल वापरतात.
यामध्ये 70 टक्क्यांपेक्षा जास्त पाणी नसते तर शुष्क छन्नामध्ये पन्नास टक्क्यांपेक्षा कमी स्निग्धांश नसते.गाईचे, म्हशीचे किंवा मिश्रित चार टक्के स्निग्धांश असलेले दूध काढून घ्यावे व त्या दुधाला 80 ते 82 अंश सेल्सिअस पर्यंत तापवावे.
याचा तापमानाला एक ते दोन टक्के सायट्रिक आम्लाचे द्रावण दुधात ओतत असताना दूध उलथणीच्या साह्याने हळुवारपणे हलवावे. दूध नासण्याची क्रिया एक ते दहा मिनिटात होणे आवश्यक आहे.
त्यानंतर नासलेल्या दुधातील घनपदार्थ मलमल कापडात बांधून त्याचे पाणी निथळण्यासाठी खुंटीला टांगून ठेवावे. पाणी सोडल्यानंतर शेवटी छन्ना तयार होतो.
नक्की वाचा:नका घेऊ टेंशन!कांद्यावर 'ही' प्रक्रिया केली ना तर कमवाल बक्कळ नफा,वाचा सविस्तर माहिती
2- रसगुल्ला- छन्ना उत्तम प्रतीचा मळताना त्याला तेल सुटू नये म्हणून भांडे थंड पाण्याच्या ट्रेमध्ये ठेवून मळावा. जर आवश्यकता वाटली तर मळत असताना त्याला भेगा पडू नयेत म्हणून त्यामध्ये मैदा चार ते पाच टक्के मिसळावा.
नंतर पाच ते दहा ग्रॅम एवढ्या वजनाचे गोळे तयार करावेत. गोळे तयार करताना प्रत्येक गोळ्यांमध्ये एक विलायची दाना घालावा.
तयार झालेली गोळी हळुवारपणे साखरेच्या पाकात सोडावे व त्यानंतर भांडे झाकून गोळे वीस मिनिटे शिजवावेत.गोळे शिजवत असताना पाकात बुडतील याची काळजी घ्यावी तसेच शिजवल्यावर ते मोठे होतात त्यामुळे आकारमान वाढल्यानंतर ते व्यवस्थित मावतील एवढीच जागा असावी.
त्यानंतर रसगुल्ले बाहेर काढून त्यावर सुवासिक गुलाबाचे द्रव्य फवारावे व नंतर रसगुल्ले साखरेच्या पाकात ठेवून पॉलिथिन पिशवीत सीलबंद करावे.
नक्की वाचा:नका घेऊ टेंशन!कांद्यावर 'ही' प्रक्रिया केली ना तर कमवाल बक्कळ नफा,वाचा सविस्तर माहिती
Share your comments