डाळिंब हे फळपीक महाराष्ट्र मध्ये सगळीकडे लावली जाते. डाळिंबामध्ये असलेल्या औषधी आणि माणसाच्या आरोग्यासाठी असणारे गुणधर्म लक्षात घेतल्यास डाळिंबाचे झाड,फांद्या, पाने, फुले व फळे आदी भागांचा औषधी गुणधर्मामुळे या फळासअनन्यसाधारण महत्त्व आहे.
डाळिंबापासून वेगवेगळ्या प्रकारचे बाय प्रॉडक्ट बनवता येतात. या लेखात आपण डाळिंबावर प्रक्रिया करून तयार होणारे बाय प्रोडक्स बद्दल माहिती घेणार आहोत.
डाळिंब प्रक्रिया उद्योगातून तयार होणारे बायप्रॉडक्ट
- डाळिंबाचारस- डाळिंबाचा रसाला मार्केटमध्ये चांगली मागणी आहे.
- अनारदाना- आंबट चव असलेल्या डाळिंब फळातील दाणे सुकवून तयार केलेल्या पदार्थास अणारदाणा असे म्हणतात. आधार धान्याच्या आहारातील समावेशामुळे जीवनसत्व क, तंतुमय पदार्थ, लोह व पोटॅशियम सारखी पोषक तत्वे मिळतात.
- सरबत- फळांपासून काढलेल्या नैसर्गिक रसामध्ये साखर, सायट्रिक आम्ल व पाणी मिसळून तयार केलेल्या पदार्थाला सरबत असे म्हणतात. हंगामा व्यतिरिक्त फळे उपलब्ध करण्यासाठी ही वेगवेगळ्या स्वरूपात साठवता येतात.
- स्क्वॅश- फळांच्या गर युक्त रसामध्ये गोडी आणण्यासाठी साखर मिसळून तयार केलेल्या पदार्थास स्क्वॅश असे म्हणतात. चांगली चव यावी म्हणून साखर व आमल यांचे योग्य प्रमाण राखले जाते.स्क्वॅश वापरण्यापूर्वी पाण्यात योग्य प्रमाणात मिसळून पिण्यासाठी वापरतात.
- सिरप- सिरपमध्ये रसाचे प्रमाण चाळीस टक्के असते. साखरेचे प्रमाण 65 ते 70 टक्के असते. सिरप मध्ये अन्न संरक्षक मिसळण्याची आवश्यकता नसते. परंतु अधिक काळ टिकवण्यासाठी सहाशे ते सातशे पीपीएम सोडिअम बेन्झोएट मिसळावे.
- डाळिंबाच्या सालीपासून पावडर- डाळिंब फळाच्या सालीमध्ये औषधी गुणधर्म असतात. अनारदाना, ज्यूस आणि स्क्वॅशनिर्मितीतील शिल्लक सालीचा उपयोग पावडर तयार करण्यासाठी होऊ शकतो. सालीचे प्रमाण 20 टक्के असते तसेच सालि 30 टक्के टॅनिन असते. याला वाळवून पावडर बनवता येते.
Share your comments