भारतामध्ये पशुपालन व्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जातो. आपल्याला माहित आहेच की पशुपालनाच्या माध्यमातून दूध उत्पादन हे प्रमुख आर्थिक स्त्रोत असतो. दूध विक्रीतून आर्थिक नफा हा पशुपालकांचा मोठा आधार असतो. परंतु कुठलीही वस्तू बाजारात विकल्यावर इतका नफा मिळतो त्याहून जास्त नफा हा त्या वस्तूवर प्रक्रिया करून तयार पदार्थ विकल्यानंतर मिळतो हे तेवढेच सत्य आहे.
या लेखामध्ये आपण असंच दुधापासून प्रक्रिया करून जर पनीर हा पदार्थ बनवला आणि तो विकला तर नक्कीच एक उद्योजक तर होताच येईल परंतु त्या माध्यमातून एक मोठी आर्थिक समृद्धी साधता येईल हे नक्कीच.
पनीर निर्मिती
पनीर हा पदार्थ दुधापासून बनवला जातो हे आपल्याला माहिती आहे. आपल्याला हे देखील माहिती आहे की दूध हे नाशवंत असून लवकर खराब होणारा पदार्थ आहे. त्यामुळे दूध उत्पादकांना दूध इश्चित ठिकाणी पोचवण्यासाठी खूप काटेकोरपणे नियोजन करावे लागते.
परंतु सगळी काही काळजी घेतल्यानंतर सुद्धा बऱ्याच वेळा दूध खराब होतेच. त्यामुळे दूध चांगल्या स्थितीत टिकून ठेवणे खूप अवघड जाते. ही जी काही दूध उत्पादकांना समोरील समस्या आहे त्याला पर्याय म्हणून आपण दुधापासून जर पनीर तयार करून ते विकले तर नक्कीच खूप चांगला आर्थिक फायदा मिळू शकतो.
पनीर हे सामान्य दुधापेक्षा जास्त काळ टिकते व बाजारात देखील त्याला चांगली मागणी असते. पनीर मध्ये स्निग्ध पदार्थांचे प्रमाण जास्त असून शाकाहारी लोकांना प्रथिनांचा पुरवठा साठी पनीर खूप उपयुक्त आहे. दुधापासून थेट पनीर बनवणारे मशीन बाजारात उपलब्ध असूनत्या मशिनच्या साह्याने आपण पनीर बनवू शकतो.
नक्की वाचा:Animal Related: पशुपालकांनो! दुधाची फॅट कमी लागते का? ही असतात त्यामागील कारणे
पनीर बनवण्याची पद्धत
पनीर बनवायचे असेल तर यासाठी एक स्वच्छ पातेले घेऊन त्यामध्ये स्वच्छ व ताजे दूध घ्यावे. उदाहरण म्हणून अगोदर आपण सहा ते आठ लिटर दुधापासून पनीर कसे बनवतात ते अगोदर पाहू. दूध पातेल्यात घेतल्यानंतर ते 82 अंश सेल्सिअस तापमानावर पाच ते आठ मिनिटे तापवावे.
त्यानंतर त्या दुधाचे तापमान 70 टक्क्यांपर्यंत कमी होऊ द्यावे व दुधात एक ते दोन टक्के तीव्रता असलेले सायट्रिक ऍसिड टाकावे किंवा यामध्ये तुम्ही लिंबाचा देखील उपयोग करू शकतात. त्यानंतर हे फाटलेले दूध दुसर्या भांड्यात उतरवून घेताना कपड्यातून ते व्यवस्थित गाळून घ्यावे.
त्यानंतर पहिले पातेल्यातील दूध ओतावे. त्यानंतर कापडावर पाणी वगळता जो काही घन पदार्थ जमा होतो तो पदार्थ लाकडी छोट्या पेटीत टाकायचा आहे. त्यातून पाणी बाहेर पडेल व पनीर तयार झाल्यास ते सात ते आठ अंश असलेल्या पाण्यात तीन ते चार तास ठेवावे. जर तुम्ही या साठी म्हशीच्या दुधाचा वापर केला तर त्यापासून जवळजवळ 22 टक्क्यांपर्यंत पनीर तयार होते तर गाईच्या दुधापासून 16 ते 18 टक्के पनीर मिळते.
दुधापासून पनीर निर्मिती उद्योगाचे आर्थिक गणित
1- एकूण भांडवल- त्यासाठी तुम्हाला कमीत कमी स्वरूपात जर व्यवसाय करायचा असेल तर वीस ते तीस हजार रुपये भांडवलाची आवश्यकता असते आणि जर थोड्या मोठ्या प्रमाणात हा व्यवसाय करायचा असेल तर दोन ते तीन लाख रुपये यासाठी पुरेसे ठरतात
2- लागणारा कच्चामाल- दूध पॅकिंग साठी तुम्हाला बॉक्स हा प्रमुख कच्चामाल आवश्यक आहे आणि हा कच्चामाल तुम्ही स्थानिक मार्केट व शेतकऱ्यांकडून मिळवू शकतात..
3- लागणारी यंत्रसामग्री- यासाठी तुम्हाला पनीर मेकिंग मशीन घ्यावे लागेल ते तुम्हाला दहा हजार ते एक लाख रुपयांपर्यंत यंत्राच्या क्षमतेनुसार मिळते.या उद्योगासाठी तुम्हाला दोन ते तीन मनुष्यबळाची आवश्यकता असते.
4- विक्री कुठे करावी- तुम्ही तयार केलेल्या पनीरची विक्री तुम्ही मागणीनुसार एखाद्या हॉटेल किंवा रेस्टॉरंटला पुरवठा करु शकतात किंवा केटरिंग वाल्याच्या ऑर्डर घेऊ शकतात तसेच बेकरीला देखील पनीरचा पुरवठा करता येतो.
Share your comments