1. कृषी व्यवसाय

कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी कांदा न विकता त्याची पेस्ट तयार करून विकले तर..?विचार करायला काय हरकत आहे!

जर आपण कांद्याच्या बाजारभावाचा विचार केला तर सगळ्या पिकांपेक्षा बाजार भावाच्या बाबतीत अनियमितता व चढ-उतार कांदा या पिकामध्ये पाहायला मिळतात. कांद्याच्या भावात कुठल्याही प्रकारची शाश्वती नसते.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
making onion pest is profitable bussiness for farmer

making onion pest is profitable bussiness for farmer

जर आपण कांद्याच्या  बाजारभावाचा विचार केला तर सगळ्या पिकांपेक्षा बाजार भावाच्या बाबतीत अनियमितता व चढ-उतार कांदा या पिकामध्ये पाहायला मिळतात. कांद्याच्या भावात कुठल्याही प्रकारची शाश्वती नसते. 

बऱ्याचदा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना झालेला उत्पादनखर्च तर सोडाच परंतु मार्केटमध्ये न्यायचा वाहतुकीचा खर्च देखील निघत नाही व त्यामुळे कांदा उत्पादकांना खूप आर्थिक फटका सहन करावा लागतो. आता आपण  कांदा अशाचा असा मार्केट मध्ये न विकता त्याच्यावर प्रक्रिया केली तर त्याचे मूल्यवर्धनातून विविध पदार्थ तयार करून ते बाजारात विक्री केली तर चांगल्या नफा मिळू शकतो. परंतु बऱ्याचदा आपण विचार करतो की, प्रक्रिया उद्योग म्हटले म्हणजे भांडवलाची गरज वरून तयार मालाला बाजारपेठ मिळेल की नाही याबद्दल चिंता या व अशा अनेक गोष्टींमुळे बरेच शेतकरी प्रक्रिया उद्योगाकडे वळत नाहीत.

नक्की वाचा:कृषी-ड्रोनचा अवलंब जलदगतीने करण्यासाठी ड्रोन वापरासाठी केंद्र सरकारने आता 477 कीटकनाशकांना मान्यता ,वाचा सविस्तर

परंतु  धाडस केले आणि शासनाच्या विविध योजनांची माहिती घेऊन प्रयत्न केले तर त्यामध्ये नक्कीच यश मिळू शकते. म्हणून या लेखात आपण कांद्यावर प्रक्रिया करून कांद्याची पेस्ट तयार केले तर हा व्यवसाय खूपच फायदेशीर ठरू शकतो.

कारण भारतीय बाजारपेठेचा विचार केला तर कांद्याच्या पेस्ट ला खूप मागणी आहे. या लेखात या बद्दल आपण माहिती घेऊ.

 कांदा पेस्ट बनवण्याचे व्यवसायाची थोडक्यात माहिती

 हा व्यवसाय सुरू करताना तुम्ही तुमच्या आर्थिक कुवतीनुसार कांदा पेस्ट बनवण्याचा व्यवसाय सुरू करू शकतात. यासाठी खादी ग्रामोद्योग आयोगाने सहजपणे तयार केलेल्या कांद्याच्या पेस्ट चा प्रकल्प अहवाल तयार केला आहे. या अहवालानुसार, हा व्यवसाय 4.19 लाख रुपयांमध्ये सुरू करता येऊ शकतो. हा व्यवसाय  सुरु करण्यासाठी तुम्ही केंद्र सरकारच्या मुद्रा योजनेचा लाभ मिळवू शकतात. या व्यवसायामध्ये लागणाऱ्या यंत्रसामग्रीचा विचार केला तर यामध्ये तळण्याची पॅन, ऑटोक्लेव स्टीम कुकर, डिझेल भट्टी, निर्जंतुकीकरण टाकी, छोटी भांडी, मग, कप इत्यादी साहित्य लागते व यांची किंमत एक लाख ते एक लाख 75 हजार रुपयांपर्यंत आहे.

नक्की वाचा:कांदा उत्पादकांसाठी खुशखबर! महाराष्ट्रात नाफेड तर्फे कांदा खरेदी सुरू, अनिल घनवट यांनी मानले कृषिमंत्री तोमर आणि शरद पवार यांचे आभार

खादी ग्रामोद्योग आयोगाच्या अहवालानुसार आपण एका वर्षामध्ये 193 क्विंटल कांद्याची पेस्ट चे उत्पादन मिळवू शकतात. या पेस्ट ची प्रतिक्विंटल किंमत तिचा विचार केला तर तीन हजार रुपये  आहे हो या हिशोबाने बाजारात पाच लाख 79 हजार रुपयांपर्यंत पेस्ट ची किंमत असेल.

 कांद्याची पेस्ट पासून मिळणारे उत्पन्न

 कांदा पेस्ट ची जर तुम्ही व्यवस्थित मार्केटिंग केली व बाजारपेठेचा अभ्यास करून ते विकले तर एका वर्षांमध्ये साडेसात लाख रुपयांपर्यंत कांदा पेस्ट विकता येऊ शकते.

English Summary: making onion pest by processing on onion that can profitable bussiness for farmer Published on: 20 April 2022, 11:17 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters