तुम्हालाही कमी खर्चात व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुम्ही आईस क्यूब व्यवसायातून कमी खर्चात जास्त नफा कमवू शकता.
आईस क्यूब व्यवसाय सुरू करण्यासाठी, सर्व प्रथम तुम्हाला तुमच्या व्यवसायाची नोंदणी जवळच्या प्रशासकीय कार्यालयात करावी लागेल.
व्यवसाय सुरू करण्यासाठी, तुम्हाला फ्रिझर आवश्यक आहे, दुसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शुद्ध पाणी आणि तुम्हाला वीज लागेल. हे फ्रिजर कोणत्याही ठिकाणी ठेवता येते.
या फ्रीजरमध्ये वेगवेगळ्या आकाराचे बर्फ फ्रीजिंग झोन असतील तुम्ही ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या आकाराचे बर्फाचे तुकडे बनवू शकता, ज्यामुळे तुमच्या बर्फांच्या तुकड्यांना बाजारात अधिक मागणी येईल.
नक्की वाचा:Low Investment bussiness: कमी खर्चात करा हा व्यवसाय आणि कमवा लाखो रुपये
1) आईस क्यूब मशीनची किंमत :
सुरुवातीला हा व्यवसाय सुरु करण्यासाठी 1 लाखापर्यंत रक्कम असणे आवश्यक आहे. यासाठी वापरल्या जाणाऱ्या डिप फ्रिझरची किंमत 50,000 रुपयांपासून सुरू होते.
2) आईस क्यूब व्यवसायातून किती नफा होईल?
हा व्यवसाय नियमित केल्यास तुम्हाला महिन्याला 20,000 ते 30,000 चा नफा मिळू शकतो. हंगामानुसार वाढत्या मागणी मध्ये तुम्ही आणखी 50,000 ते 60,000 रुपये मिळवू शकता.
बर्फाच्या तुकड्यांची मागणी फक्त उन्हाळ्यातच बाजारात राहते असे नाही तर बाकीच्या हंगामात मागणी थोडी कमी असली तरी प्रत्येक हंगामात ती कायम असते.
हा एक दीर्घकालीन व्यवसाय असल्याने तो तुम्हाला दीर्घकाळ नफा देखील देईल आणि नवीन व्यवसाय सुरू करण्यावर भारत सरकारकडून सबसिडी देखील दिली जात आहे, ज्यामुळे व्यवसायाचा खर्च कमी होईल.
Share your comments