1. कृषी प्रक्रिया

पौष्टिक मखाना पासून बनवा प्रक्रियायुक्त पदार्थ

KJ Maharashtra
KJ Maharashtra
makhana processing

makhana processing

 सर्वत्र उपलब्ध असणारे, तलाव, तळे अशा दलदलीच्या क्षेत्रात उगवणारे मखाना हे पोषण तत्वाने भरपूर असे एक जलीय उत्पादन आहे. मखाना जगामध्ये गोर्गोन नट ड्रायफूट म्हणून ओळखले जाते. मखाना मध्ये पोषकतत्वे असल्याकारणाने आरोग्यासाठी लाभदायक आहे. यामध्ये प्रथिने, कर्बोदके, खनिजे असल्याने प्रत्येक वयोगटातील व्यक्तीसाठी फायदेशीर आहे.

 कमळाची पुष्पथाली आणि बिया यांचा वापर खाण्यासाठी करण्यात येतो. कमळाच्या गड्डयाचा वापर भाजून, तळून किंवा लोणच्यासाठी करण्यात येतो. कमळाला गोल किंवा अंडाकार संत्रा एवढे फळ येतात. या फळात 10 ते 20 कवच युक्त काळ्या बी असतात. या बियांना भाजून याचा उपयोग गोड पदार्थ, नमकीन, खीर, बर्फी, चिक्की, ला यामध्ये केला जातो. शरीरातील कोलेस्टेरॉल, रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी तसेच स्त्रियांसाठी  मखाना उपयुक्त आहे. कमळाच्या गड्ड्यामध्ये रायबोफ्लेवीन नायासिन, विटामिन सी आणि ई जीवनसत्त्वे असतात. या लेखात आपण  मखाना  पासून विविध तयार होणाऱ्या प्रक्रियायुक्त पदार्थांविषयी माहिती घेऊ.

  • मखाना स्नॅक्स/ लाह्या:

लाह्या तयार करण्यासाठी बिया मातीच्या किंवा बिलाच्या कढईमध्ये भाजले जातात. दोन तीन दिवस सामान्य तापमानाला ठेवून पुन्हा 250 ते 330 अंश डिग्री सेल्सिअस पर्यंत भाजले जातात. लाया किंवा स्नेक्स हे वेगवेगळे मसाले वापरून अनेक प्रकारे बनवता येते. यासाठी मखाना लाह्या कढईमध्ये तेल टाकून भाजून घ्यावे. यामध्ये जिरा पावडर,, काळे मीठ, आमचूर, मिरची पावडर टाकून भाजून चविष्ट स्नॅक्स बनवता येते.

  • बर्फी:

मखाना ची बर्फी तयार करण्यासाठी मखाना कढईमध्ये तेल किंवा तूप टाकून भाजून त्याची पावडर करून घ्यावी. मखना पावडर 70 ग्रॅम, खोबरा कीस 30 ग्रॅम आणि ड्रायफूट बटर टाकून भाजून घ्यावे. नंतर यामध्ये 60 ग्रॅम साखर टाकून मिश्रण घट्ट होईपर्यंत हलवत रहावे. मिश्रण घट्ट झाले की तूप लावलेल्या ताटात मध्ये पसरून त्याच्या वड्या पाडाव्यात.

  • मखाना पावडर:

कढाई मध्ये मखाना बटर टाकून भाजून घ्यावा. त्याला मिक्सरद्वारे बारीक करून घ्यावे. ही पावडर भाज्या, सूप, लाडू व दुधामध्ये वापरता येते.

 

  • खीर:

खीर बनवण्यासाठी मखाना तूप टाकून भाजून घ्यावा. गॅस वर दुधामध्ये साखर टाकून विरघळून घ्यावी. त्यामध्ये ड्रायफ्रूट पावडर आणि मखाना टाकून पाच ते दहा मिनिटे उकळून घ्यावे.

  • चिक्की:

चिक्की साठी मखाना भाजून घ्यावा आणि त्याचे बारीक तुकडे करून घ्यावेत. कढईमध्ये 50 ग्रॅम गुळाचा एक तरी पाक बनवून त्यात 100 ग्रॅम बारीक केलेला मखाना टाकून एकजीव करून घ्यावे. हे मिश्रण बटर लावलेल्या फ्लॅटमध्ये पसरून घ्यावे आणि काप पाडावेत. चिक्की चेक अप हवाबंद करून साठवून ठेवावी अशाप्रकारे पौष्टिक  चिक्की बनवण्यासाठी यामध्ये शेंगदाणे, राजगिरा आणि जवस वापरता येते.

Like this article?

Hey! I am KJ Maharashtra. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters