सध्या बरेच शेतकरी ड्रॅगन शेती कडे वळले आहेत. कारण ड्रॅगन शेती साठी पाण्याची आवश्यकता कष्ट हे कमी प्रमाणात लागते परंतु यातून बक्कळ पैसा मिळत असल्यामुळे बरेच शेतकरी ड्रॅगन शेती कडे वळाले आहेत. ड्रॅगन फळाला बाजारात मोठ्या प्रमाणात मागणी आहे तसेच आंतरराष्ट्रीय बाजारात सुद्धा ड्रॅगन फळाला मोठी मागणी आहे.
ड्रॅगन फ्रुट प्रक्रिया:-
ड्रॅगन फ्रुट आपण थेट बाजारात सुद्धा विकू शकतो आणि पैसे मिळवू शकतो परंतु जर का ड्रॅगन फ्रुट वर प्रक्रिया करून प्रक्रियायुक्त पदार्थ बनवून विकल्यास बक्कळ नफा मिळेल. ड्रॅगन फ्रुट चे अनेक फायदेशीर उपाय आहेत, म्हणूनच आंतरराष्ट्रीय बाजारात ड्रॅगन ला मोठी मागणी आहे. ड्रॅगन फ्रुट वर प्रक्रिया करून त्यापासून नवनवीन पदार्थाची निर्मिती करू शकतो आणि बक्कळ फायदा मिळवू शकतो.
ड्रॅगन फ्रुट पासून बनवलेले प्रॉडक्ट:-
1) फळाचा गर:-
सुरवातीला फळ स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावे. धुवून घेतल्यानंतर फळावरील साल बाजूला काढावी. गरातील बिया वेगळ्या कराव्यात आणि मशीन च्या साह्याने गर योग्य पद्धतीने मिसळून घ्यावा. आणि त्यानंतर त्या मध्ये दही आणि साखर मिसळून त्याचा रस बनवावा. ड्रॅगन फ्रुट चा गर 7 ते 8 महिने टिकतो.
2) ड्रॅगन फ्रुट चे चॉकलेट:-
ड्रॅगन फ्रुट पासून चॉकलेट सुद्धा बनवले जाते. यासाठी ड्रॅगन फ्रुट चा एक किलो गर घ्यावा. त्या गरात जल स्वरूपाचे ग्लुकोज 70 ग्रॅम मिसळावे सोबतच सायट्रिक आम्ल दोन ते तीन ग्रॅम घालावे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे दूध पावडर 70 ते 80 ग्रॅम चा वापर करावा , वनस्पती तूप 100 ते 120 ग्रॅम एवढे वापरावे. हे सर्व मिश्रण एका तूप लावलेल्या थाळी मध्ये पसरून ठेवावे. हे सर्व थंड झाल्यावर त्याला रॅपर मध्ये पॅक गुंडळावे.
3)ड्रॅगन फ्रुट सीड पावडर:-
ड्रॅगन फ्रुट च्या बियांचा उपयोग अनेक ठिकाणी केला जातो. त्यामध्ये ड्रॅगन फ्रुट च्या बियाणांचा वापर चॉकलेट तसेच आइस्क्रीम मध्ये केला जातो.
4) फ्रुटी आणि जेली निर्मिती:-
जेली आणि टुटी फुटी बनवण्यासाठी ड्रॅगन फ्रुट च्या गरात गराच्या वजनाएवढि साखर टाकावी आणि त्यामध्ये प्रति किलो पाच ग्रॅम या प्रमाणे सायट्रिक ऍसिड मिसळावे . या सर्व मिश्रणाला कमी अग्नीवर तापवावे. हे मिश्रण तापवत असताना त्यात चार ते पाच ग्रॅम पॅक्टीन मिसळावे. पॅक्टीन चा वापर घट्टपणा येण्यासाठी केला जातो. त्यानंतर त्या मध्ये एम एस मिसळावे आणि अश्या प्रकारे फ्रुटी आणि जेली ची निर्मिती केली जाते. याचबरोबर ड्रॅगन फ्रुट वर प्रक्रिया करून वेगवेगळे फ्लेवर सुद्धा बनवले जातात.
Share your comments