1. कृषी व्यवसाय

Maize Rate: शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी; मक्याचे दर तेजीत, मिळतोय 'इतका' दर

मका उत्पादकांसाठी (maize growers) एक दिलासादायक बातमी आहे. सध्या मागणी जास्त आणि पुरवठा (supply) कमी अशी परिस्थिति असल्यामुळे मक्याला चांगला दर मिळत आहे.

रूपाली उत्तम कदम
रूपाली उत्तम कदम
Maize prices

Maize prices

मका उत्पादकांसाठी (maize growers) एक दिलासादायक बातमी आहे. सध्या मागणी जास्त आणि पुरवठा (supply) कमी अशी परिस्थिति असल्यामुळे मक्याला चांगला दर मिळत आहे.

महत्वाचे म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारात मका दर (Maize rate) तेजीत राहण्याचा अंदाज देखील व्यक्त केला जात आहे. जगातील महत्वाच्या मका उत्पादक देशांमध्ये उष्ण आणि कोरड्या (Hot and dry) हवामानाचा परिणाम होत आहे. या कारणाने मक्याचा पुरवठा आणखी कमी होण्याची शक्यता आहे.

Sanen Goat: सानेन शेळीच्या पालनाने शेतकरी कमवू शकतात लाखों रुपये; फक्त 'ही' काळजी घ्या

अमेरिकेचा कृषी विभागाचा अहवाल काय सांगतोय?

अमिरिकेच्या कृषी विभागाने नुकताच प्रसिद्ध अहवाल केला आहे. त्यामध्ये त्यांनी म्हंटले आहे की, २०२२-२३ या वर्षात जागतिक मका उत्पादनात ३९१ लाख टनांची घट येण्याचा अंदाज आहे. यावर्षी अमेरिका आणि युरोपियन युनियनमध्ये उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता आहे.

जागतिक पातळीवर मका निर्यातीत अमेरिका आघाडीवर आहे. मात्र या ठिकाणच्या पिकाचं दुष्काळामुळं नुकसान झाले आहे. त्यामुळं यंदा अमेरिकेतील मका उत्पादन १९२ लाख टनांनी कमी राहून ३ हजार ६४७ लाख टनांवरच राहील असा अंदाज युएसडीएनं व्यक्त केला आहे.

Sanen Goat: जास्त दूध उत्पादनासाठी सानेन शेळी ठरतेय अव्वल; पालनातून शेतकऱ्यांना मिळणार चांगले उत्पादन

अमेरिकेचा कृषी विभागाने यावर्षी जागतिक मक्याची मागणी स्थिर राहील, तर शिल्लक साठा ५१ लाख टनांनी घटून ६ हजार ६७ लाख टनांवर स्थिरावेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

यामुळे यावर्षी जागतिक बाजारात (Global markets) मक्याचा पुरवठा मर्यादीत असेल. त्यामुळे मका दर तेजीत राहतील, असा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे. तर देशात सध्या मक्याचा पुरवठा मागणीच्या तुलनेत कमी आहे. परिणामी देशात मका तेजीत आहे. मक्याला चांगला दर मिळत आहे त्यामुळे यावर्षी मक्याचा पेरा वाढण्याची शक्यता आहे.

रिपोर्ट नुसार, देशात केवळ दीड टक्क्यानेच मक्याची लागवड वाढली. देशात आतापर्यंत जवळपास ८० लाख हेक्टरवर मका आहे. तर बाजारात मका दर २३०० ते २८०० रुपयांपर्यंत आहेत. देशातील मागणी बघता मका दरात पुढील काळात २०० रुपयांपर्यंत सुधारणा होऊ शकते, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

महत्वाच्या बातम्या 
Kisan Vikas Patra: किसान विकास पत्र योजनेतून शेतकऱ्यांचा पैसा होणार डबल; वाचा सविस्तर
Red Kandhari: पशूपालकांचे दूध उत्पन्न वाढणार; 'लाल कंधारी' गाय 275 दिवस देते दूध
Soybean Market Price : सोयाबीन उत्पादकांसाठी महत्वाची बातमी; सोयाबीन विकला जातोय 'या' दराने

English Summary: Maize Rate News Farmers Maize prices Published on: 25 August 2022, 09:45 IST

Like this article?

Hey! I am रूपाली उत्तम कदम. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters