वर्तमान परिस्थितीचा विचार केला तर सुशिक्षित बेरोजगारांची संख्याही दिवसेंदिवस प्रचंड प्रमाणात वाढत आहे.दरवर्षी अनेक पदवीधरांचे लोंढेच्या लोंढे घेऊन बाहेर पडत आहेत.परंतु त्यामानाने नोकऱ्यांच्या उपलब्धता ही फारच कमी आहे. सरकारी नोकरी म्हटले तर एक मृगजळच म्हटले तरी वावगे ठरणार नाही. त्याशिवाय नोकरी मागे जे काही तरुण लागत नाहीत त्यांच्या डोक्यात काहीतरी व्यवसाय करण्याची जिद्द असते.
परंतु व्यवसाय तरी कुठला करावा हे काही सुचत नाही. म्हणून या लेखामध्ये आपण एका कमी गुंतवणूक असणाराआणि चांगली बाजारपेठ उपलब्ध आहे असा व्यवसाय विषयी माहिती घेणार आहोत आणि तो व्यवसाय आहे लोणचे बनवण्याचा व्यवसाय.हा व्यवसाय वर्षाचे बारा महिने तुम्ही करू शकता.तसेच हा व्यवसाय वर्षानुवर्षे चालत राहणार आहे आणि त्यातून फायदा देणार आहे. या लेखात आपण लोणचे बनवण्याचे व्यवसाय बद्दल माहिती घेऊ.
लोणचे बनवण्याचा व्यवसाय
लोणचे म्हटले म्हणजे स्वयंपाक घरातील एक आवश्यक आणि स्वयंपाकातील आवडीची असा पदार्थ आहे. जेवणाला बसले म्हणजे पानात लोणचे हे वाढलेली असतेच.तसेच लोणचे हे बाराही महिने खाल्लं जातं त्यामुळे हा व्यवसाय कायम चालू राहणार आहे. लोणचे तयार करून ते विकणे या माध्यमातून महिन्याला साधारणतः 25 हजारांपर्यंत कमाई करता येऊ शकते.यामधून 10000 तुमचा खर्च वजा केला तरी जास्त झंझट न घेता तुम्ही पंधरा हजार रुपये नफा कमवू शकतात.
दहा हजार रुपये गुंतवून सुरू करा हा व्यवसाय
हा जसा तुम्ही घरच्या घरी सुरू करू शकता.त्यासाठी तुमच्याकडे दहा हजार रुपयेगुंतवण्याचीतयारी हवी.या व्यवसायातून तुम्ही 25 ते 30 हजार रुपयांपर्यंत नफा कमवू शकता. या व्यवसायामध्ये तुम्ही बाजारात असलेली वस्तु ची मागणी,तुमची पॅकिंग आणि खप यावर नफ्याचे गणित बदलत राहते.तुम्ही आत्ता जे ऑनलाईन प्लॅटफॉर्म चा उपयोग करून देखील लोणचं विकू शकता.
यशासाठी बाजारपेठेचा अभ्यास बारकाईने करणं फार आवश्यक……….
आता आपण पाहतो की बाजारामध्ये लोणच्याचे बरेच असे ब्रँड आहेत. त्या प्रत्येक ब्रँडची पॅकिंग कशी आहे? त्यांचे मार्केटिंग ची पद्धत, त्यांच्या उत्पादनापेक्षा आपले उत्पादन किती दर्जेदार आणि परिणामकारक राहील याविषयीचा अभ्यास करणे फार महत्त्वाचे असते.त्यासाठी तुम्ही तयार केलेल्या लोणच्याची कॉलिटी,त्याची पॅकिंग आणि शक्य असेल तर विविधता राखणे फार आवश्यक आहे. त्यामुळे तुमच्याकडे पर्याय उपलब्ध होतात.अगोदर छोटेखानी व्यवसाय सुरू करून त्याचा फीडबॅक घेऊनआवश्यक तो बदल केल्याने फार फायदा होतो. यासाठी लागणारे साहित्य आणि पॅकिंग साठी आवश्यक असणाऱ्या सुविधांसाठी योग्य जागा असणे गरजेचे आहे.
कच्चामाल घेऊन त्यापासून तुम्ही व्यवसाय सुरू केल्यानंतर तयार झालेले तुमचे उत्पादन व्यवस्थित प्रकारे साठवणूक केलं तर ते जास्त काळ टिकू शकते..कारण लोणचे हे थेट खाण्याशी संबंधीत असल्यामुळे त्यामध्ये जबाबदारी ही तेवढीच आहे.हा व्यवसाय जर तुम्ही व्यवस्थित प्रकारे व्यवस्थापन आणि आणि मार्केटिंग चा अभ्यास करून व्यवस्थित पणे केला तर महिन्याला तीस ते चाळीस हजार रुपयांचा नफा आरामात काढू शकतात.परंतु त्यासाठी तुमच्या उत्पादनामध्ये सातत्य तसेच उत्पादनाची कॉलिटी आणि पॅकेजिंग चांगला असणं फार आवश्यक आहे.
Share your comments