ज्वारी एक सुपरिचित तृणधान्य आहे. भारताच्या फार मोठ्या भागातील स्थानिक लोकांच्या आहाराचे ते मुख्य पीक आहे.समुद्रकिनाऱ्याच्या पट्टा वगळून इतरत्र विशेषतः दक्षिणेकडील भागात, धान्य आणि जनावरांसाठी वैरण अशा दुहेरी हेतूने ज्वारीची लागवड केली जाते
ज्वारी ज्या भागात पिकवली जाते त्या भागातील गरीब लोकांचे आहारातील प्रमुख धान्य आहे. ज्वारीमध्ये तांदळापेक्षा प्रथिनांचे प्रमाण जास्त असते.
ज्वारीचे उद्योग क्षेत्रातील महत्त्व
कणसे काढून घेतल्यावर राहिलेली वाळलेली ताटे म्हणजेच कडबा यांचा आपण जनावरांना वैरण म्हणूनही उपयोग करतो.दान्याचे पीठ करून त्याच्या भाकरी करतात किंवा लाह्या,हुरडा व लापशी या स्वरूपातही दान्याचा वापर करतात. ज्वारी च्या दाण्यापासून मार्ट तयार करतात व त्याचा उपयोग लहान मुलांचे अन्न तयार करण्यासाठी अथवा बियर तयार करण्यासाठी करतात.
ज्वारीच्या दाण्यातील स्टार्च पासून किनवणानेम्हणजेच आंबवून एथील अल्कोहोल, सीटोंन व ब्युटील अल्कोहोल तयार करतात. ज्वारीच्या स्टार्च मक्याच्या स्टार्च प्रमाणे असून त्याचा खाद्यपदार्थांच्या उद्योगात आणि कापड धंद्यातखळीसाठी उपयोग होतो. कागद आणि पुठ्ठा तयार करण्याच्या उद्योगात ही ज्वारीच्या स्टार्चचा खळीसाठी वापर होत.ज्वारीच्याताटापासून रासायनिक कृतीने तयार केलेला लगदा आणि लाकडापासून तयार केलेला लगदा यांच्या मिश्रणापासून लिहिण्याचा, वृत्तपत्राचा आणि वेस्टनाचा कागद तयार करतात.
ज्वारीच्या आरोग्यदायी फायदे
- ज्वारीमध्ये कार्बोहायड्रेटचे प्रमाण जास्त असल्याने शरीरास पटकन ऊर्जा मिळते. कमी खाऊनही पोट भरल्याची जाणीव होते. ज्वारीमध्ये असणाऱ्या ॲमिनो ॲसिड मधून शरीरास मुबलक प्रोटिन्स मिळतात. ज्यांना किडनी स्टोनचा त्रास असेल त्यांनी नक्कीच ज्वारीची भाकरी आहारात घ्यावी
- ज्वारी मधल्या पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि मिनरल्स मुळे ब्लडप्रेशर नियंत्रणात राहते.भाकरीत लोह मोठ्या प्रमाणात असते. ॲनिमियाचा त्रास असणाऱ्या व्यक्तींनी ज्वारीची भाकरी खाल्ल्यास त्यांना फायदा होतो. लाल पेशींची वाढ होण्यास मदत होते.
- सध्या लठ्ठपणाचे प्रमाण वाढले आहे. लठ्ठपणामुळे अनेक आजारांना आमंत्रण मिळते. त्यामुळे जेवणात ज्वारीचे सेवन केल्यास लठ्ठपणा म्हणजे शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होण्यास मदत होते.
Share your comments