1. कृषी व्यवसाय

Bussiness Idea: 'आईस फॅक्टरी' उभारा आणि मिळवा उत्कृष्ट नफा, वाचा सविस्तर माहिती

जर आपण विविध प्रकारचे व्यवसायांचा विचार केला तर काही व्यवसाय हे वर्षभर मागणी असणारी असतात तर काही हंगामी मागणी असणारे व्यवसाय असतात. परंतु हंगामी मागणी असणारे व्यवसाय त्या त्या विशिष्ट हंगामामध्ये चांगला आर्थिक नफा देऊन जातात. यामध्ये बऱ्याच प्रकारचे व्यवसाय आपल्याला सांगता येतील. असाच एक हंगामी स्वरूपाचा व्यवसाय म्हणजे आईस फॅक्टरी म्हणजे बर्फ तयार करण्याचा कारखाना होय.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
ice factory bussiness

ice factory bussiness

जर आपण विविध प्रकारचे व्यवसायांचा विचार केला तर काही व्यवसाय हे वर्षभर मागणी असणारी असतात तर काही हंगामी मागणी असणारे व्यवसाय असतात. परंतु हंगामी मागणी असणारे व्यवसाय त्या त्या विशिष्ट हंगामामध्ये चांगला आर्थिक नफा देऊन जातात. यामध्ये बऱ्याच प्रकारचे व्यवसाय आपल्याला सांगता येतील. असाच एक हंगामी स्वरूपाचा व्यवसाय म्हणजे आईस फॅक्टरी म्हणजे बर्फ तयार करण्याचा कारखाना होय.

नक्की वाचा:Agri Releted Bussiness: 3 लाख रुपये गुंतवून सुरु करा 'कांदा गोणी' बनवण्याचा व्यवसाय, मिळेल चांगला नफा

या व्यवसायामध्ये तुम्हाला जम बसवायचा असेल तर तुम्हाला तुमच्या सभोवताली असणारी बाजारपेठ खूप उत्तम पद्धतीने समजून घेणे गरजेचे असून तुमच्या आजूबाजूला कुठल्या गोष्टींसाठी बर्फाचा वापर मोठ्या प्रमाणात होतो याचा अभ्यास करणे खूप गरजेचे आहे.

तुमच्या सभोवताली जर हॉटेल्स किंवा आईस्क्रीमची दुकाने जास्त प्रमाणात असतील किंवा एखादे मच्छी मार्केट असेल तर तुम्हाला वर्षभर चालणारा हा व्यवसाय आहे. भाजीपाला व फळे सप्लायरस यांनादेखील बर्फाची फार मोठ्या प्रमाणात गरज असते. या लेखात आपण या व्यवसाय विषयी थोडक्यात माहिती घेऊ.

 कारखान्यात बर्फ कसा तयार होतो?

 यामध्ये सगळ्यात आगोदर आईस कॅनमध्ये अमोनिया गॅस सोडला जातो. त्यानंतर कुलींग कॉइलच्या माध्यमातून अमोनिया गॅसला बाष्पत रूपांतरित केले जाते.

प्रत्येक आईस कॅनमध्ये तीस टक्के मीठ असते. यामध्ये अजिटेशनच्या मदतीने तापमान नियंत्रित केले जाते व यामध्ये आद्रतेचे प्रमाण 15 फेरेड असावे. ही प्रक्रिया साठी 24 तास लागतात व त्यानंतर पाणी भरले जाते व पाण्याचा उष्मांक 30 फॅरेड झाल्यास पाण्याचे बर्फात रुपांतर होते व या सर्व प्रक्रियेला अठरा तास लागतात.

नक्की वाचा:Bussiness Tips: 'बटाटा वेफर्स'उद्योग देईल आर्थिक समृद्धी, वाचा सविस्तर माहिती

या व्यवसायासाठी महत्त्वाच्या गोष्टी

हा व्यवसाय तुम्हाला सुरू करायचा असेल तर तुमच्या सभोवताली हॉटेल्स,आईस्क्रीम पार्लर किंवा बऱ्याच अशा गोष्टी आहेत की त्या ठिकाणी बर्फची गरज लागते,

अशा ठिकाणी हा व्यवसाय उभारणे फार फायद्याचे ठरते. या व्यवसायासाठी लागणाऱ्या भांडवलाचा विचार केला तर तीन ते चार लाख रुपये यामध्ये भांडवल टाकून तुम्ही चांगला व्यवसाय चालला तर महिन्याकाठी एक लाखापर्यंत कमाई करू शकतात.

 या व्यवसायासाठी लागणारी यंत्रसामग्री

 या व्यवसायासाठी तुम्हाला अमोनिया रिसिवर, फ्रीजिंग टॅंक, कोईल, लो प्रेशर एअर ब्लॉवर, कंडेन्सर वाटर करिक्युलम पंप, एअर फिटिंग, मीठ, हायड्रोमीटर, थरमोमीटर आणि टूल किट तसेच अजून काही यंत्राची आवश्‍यकता असते.

 या व्यवसायासाठी एकूण भांडवल

 तुम्हाला हा व्यवसाय उभा करायचा असेल तर यासाठी एकूण भांडवल  हे चार ते पाच लाख रुपयांपर्यंत लागू शकते.

 लागणारा कच्चामाल

व्यवसायासाठी तुम्हाला मीठ,पाणी, गॅस आणि कॅन्स इत्यादी कच्चा मालाच्या आवश्यकता असते. मला ह्या वस्तू बाजारात उपलब्ध होतात.

यंत्रांसाठी लागणारी किंमत

 या व्यवसायासाठी तुम्हाला यंत्रांवर सुमारे दोन ते तीन लाख रुपये खर्च येतो.

 लागणारे वर्कर

 हा व्यवसाय तुम्ही दोन ते तीन मनुष्यबळाच्या साह्याने सुरू करू शकता.

 बर्फ तुम्ही कुठे विकू शकतात?

 तुम्ही तुमच्या फॅक्टरीत तयार केलेला बर्फ आइस्क्रीम पार्लर, रसवंती गृह असेच ज्युस सेंटर, केटरिंग सेवा पुरवणारे तसेच हॉटेल्स व भाजीपाला व्यापारी त्यांना तुम्ही तुमचा बर्फाची विक्री करू शकता.

नक्की वाचा:Bussiness Tips: 20 ते 25 हजार रुपयांच्या गुंतवणुकीतून प्रतिमहा लाखो रुपये कमावण्याची संधी देतो 'हा'व्यवसाय

English Summary: ice factory is so important bussiness to farmer and unemployment person Published on: 16 September 2022, 08:49 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters