1. कृषी प्रक्रिया

आरोग्यदायी शेवगा व त्याचे प्रक्रियायुक्त पदार्थ

KJ Staff
KJ Staff


शेवगा हे पीक कोरडवाहू शेतकऱ्यांसाठी वरदान ठरते. शेवग्याचे झाड अतिशय लवकर वाढते. भारतामध्ये बहुतेक सर्व उष्ण, आर्द्र हवामान असलेल्या ठिकाणी शेवग्याचे उत्पादन घेतले जाते. शेवग्याच्या शेंगा वर्षभर बाजारामध्ये उपलब्ध असतात. शेवग्यामध्ये भरपूर प्रमाणात पोषकतत्व आहेत. शेवग्याच्या पाने, शेंगा, कोवळ्या फांद्या आणि बियामध्ये पोषक घटक असतात.

जीवनसत्व अ, ब आणि क, खनिज विशेतः लोह आणि सल्फर, सिस्टेनाइन, अमिनो आम्ले असतात. त्यात भरपूर पोषक घटक आणि रोगप्रतिकार घटक असतात. त्यामुळे शेवग्यचा विविध भागांचा वापर ३०० पेक्षा अधिक आजारांच्या उपचारामध्ये केला जातो. शेवग्याच्या शेंगा, पाने, बियांपासून विविध मूल्यवर्धित पदार्थ तयार करता येतात. 

शेवग्याचे आरोग्यदायी फायदे

 • शेवग्याच्या पानाच्या रसाच्या सेवनाचे रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत होते. शेवग्यचा पानाचा रस मधाबरोबर घेतल्यास डायरिया, जुलाबावर गुणकारी आहे, या रसामुळं पोटातील कृमींचा नाश होण्यास मदत होते. 
 • शेवग्याच्या पानाचा रस मधुमेह असणाऱ्या व्यक्तीचे ग्लुकोजची मात्रा नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत होते, शेवग्याच्या पानाचा रस त्वचेसाठी एन्टीसेफ्टीक म्हणून वापरला जातो. 
 • डोकेदुखीचा त्रास उद्भवल्यास शेवग्याचे पाने कपाळावर चोळून लावल्यास डोकेदुखी कमी होते तसेच शरीराच्या भागावर सूज आली असल्यास ती कमी करण्यासाठी शेवग्याचा पाल्याचा उपयोग होतो. 
 • शेवग्याच्या शेंगांमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असल्यामुळं हाडांचे कुठलेही आजार उद्भवतं नाही. शेवग्यामुळे शरीराची रक्तशुद्धीकरण व्यवस्तीत होते. त्यामुळे त्वचेचे आरोग्य उत्तम राहण्यास मदत होते.
 • शेवग्याच्या शेंगाच्या सूप पिल्याने ब्राँकायटिसचा त्रास कमी होतो, शेवग्यामध्ये असलेले नियासिन, रायबोफ्लॅविन, फाॅलिक एसीड व बी काॅम्पलेक्स जीवनसत्वे पचनक्रिया सुधारण्यास मदत करतात.
 • शेवग्याचा पानापासून तयार केलेले सूप अस्थमा आजारामध्ये औषधचे काम करते. 
 • मुतखडा तसेच हृदयरोग, कर्करोग यासारख्या गंभीर आजारांवर शेवग्याच्या प्रभावी उपयोग होतो, तसेच शेवग्याचा प्रभावी उपयोग होतो, तसेच शेवग्याची पान, फुल, फळ, बिया, साल आणि मूळ अशा सर्वच गोष्टीचा उपयोग आयुर्वेदिक औषध तयार करण्यासाठी होतो.
 • शेवग्यांच्या पानाची भाजी सेवन केल्याने आतड्याना उत्तेजन देऊन पोट साफ करते, त्यामुळे जठराचा कर्करोग टाळण्यासाठी फायदा होतो. तसेच आतड्यातील जखमा भरून काढण्यासाठी उपयुक्त ठरते.
 • शेवग्याच्या पानाचा रस आणि मध मोतीबिंदू झालेल्या रोग्यसाठी फायदेशीर ठरतो, शेवग्याच्या पानाचे चूर्ण कॅन्सर आणि हृदय रोगांसाठी उपयुक्त औषध आहे.
 • शेवग्याच्या सेवन रक्तदाब नियंत्रणास राहते, तसेच शेवग्याचे चूर्ण पाणी निर्जंतुकिकरण करण्यासाठी वापरले जाते. 
 • शेवग्यामध्ये अ जीवनसत्व असते जे सौंदर्यवर्धक स्वरूपात काम करते, तसेच डोळ्यांसाठी लाभदायक असते. चेहऱ्यावरील पिंपल्सचे प्रमाणही कमी करण्यास मदत होते. 


शेवग्याची पाने

शेवग्याच्या पानाचा समावेश पोषक किंवा पूरक आहारामध्ये केला जातो. ही पाने भाजी स्वरूपातील खान्यासाठी उपयोग होतो, त्यानंतर पाने वाळवून त्याची भुकटी बनवून त्याचा वापर भाज्या, ब्रेड, पास्ता या खाद्यपदार्थामध्ये केला जातो. 

१) शेवग्याच्या पानाची भुकटी

 • सुरवातीला पाने झाडावरून काढून स्वच्छ धुऊन घ्यावीत. त्यानंतर पाने सावलीत २ ते ३ दिवस वाळवळीत. (उन्हामध्ये वाळवल्यास अ जीवनसत्व कमी होते). वाळलेल्या पानाची मिक्सर किंवा पल्वलाईजर मध्ये बारीक करून भुकटी तयार करून घ्यावी.
 • साधरणतः ५० किलो शेवग्याच्या पानापासून आपल्याला १२ ते १५ किलो पावडर मिळते. तयार केलेली शेवग्याची पानाची पावडर निर्जंतुक केलेल्या काचेच्या बाटलीमध्ये किंवा पाउचमध्ये कोरड्या ठिकाणी साठवणूक केल्यास सहा महिन्यापर्यंत टिकते, तयार झालेल्या पावडरीचा उपयोग बेकरी उत्पादनात केला जातो. 

२) शेवग्याच्या पानाचा रस

 • सुरवातीला शेवग्याची १० किलो ताजी पाने स्वच्छ धुऊन घ्यावीत व तिला मंद आचेवर ५ मी. गरम करावीत त्यांनतर थंड करून घ्यावीत. शेवग्याच्या १० किलो पानामध्ये १ लिटर पाणी टाकून हॅमर मिलच्या साह्याने बारीक करून (दळून) घ्यावीत. 
 • तयार झालेल्या शेवग्याचा शेंगाचा रस गाळून घ्यावा व त्यामद्धे २५० ग्रॅम  साखर व २० ग्रॅम जिरे पावडर टाकून मिसळून घ्यावीत. तयार झालेल्या रसाला ३ ते ४ अंश तापमानाला रेफ्रिजरेटर मध्ये ठेवावे. 

३) शेवग्याच्या पानाचा डिकाशींन चहा

 • सुरवातीला शेवग्याची पाने स्वच्छ धुऊन घ्यावीत व सावली मध्ये वाळवून घ्यावीत. वाळवलेली पाने चहा पुडप्रमाणे बारीक करून घ्यावीत. एका पातेल्यात पाणी गरम करून त्यामध्ये शेवग्याच्या पानाची पावडर मिसळावी व साखर टाकून मुसळून घावे.
 • तयार झालेला शेवग्याच्या पानाचा चहा काचेच्या ग्लासमध्ये ओतुन त्यामध्ये ४ ते ५ थेंब लिंबू रस मिसळून घ्यावे. तयार झालेल्या चहा अतिशय गुणकारी असून चवीला पण चांगला लागतो.

४) शेवग्याच्या शेंगाचे लोणचे

 • शेवग्याची कवळी शेंग शिजून खाता येत किंवा कढीमध्ये वापर केला जातो, तसेच शेंगा पाण्यामध्ये उकळून त्याची डाळीसोबत आमटी केली जाते, तसेच कोवळ्या शेंगाचा वापर सॅलड मध्ये केला जातो, त्याच प्रमाणे दक्षिण भारतात शेंगापासून सांबर बनवली जातात. १ किलो शेवग्याच्या शेंगा स्वच्छ धुऊन घ्यावात. त्यानंतर शेंगाची वरची साल काढून ३ सेंमी तुकडे करून घ्यावीत. ५ ते ७ मिनिटे शेंगा २० ते ३० अंश तापमानाला वाफवून घ्याव्यात.
 • त्यांनंतर मेथी ५० ग्रॅम, मोहरी ४० ग्रॅम , मिरची पावडर ३० ग्रॅम, चिंचेची पेस्ट ३० ग्रॅम तयार करावी. कढईमध्ये तेल ३५० मिली टाकून त्यामध्ये लसूण १० ग्रॅम, हिंग ५ ग्रॅम, मीठ ३५ ग्रॅम, हळद ६० ग्रॅम, साखर २० ग्रॅम व वरील तयार केलेली पेस्ट टाकून मिश्रण चांगले एकजीव करून घ्यावे, मिश्रणाला ५ ते १० मिनिट शिजून घेतल्यांनंतर त्यामध्ये वाफवलेल्या शेंगा घालून पुन्हा ५ ते ७ मिनिट मंद आचेवर शिजवावे.
 • मिश्रणाला शिजवल्यानांतर त्याला थंड करून घ्यावे, त्यानंतर यामध्ये १० मिली व्हिनेगार व १०० मिली तिळाचे तेल मिसळावे, तयार झालेले लोणचे निर्जंतुकीकरण केलेल्या काचेच्या भरनीत भरून घ्यावे.  

५) शेवग्याच्या बियांची पावडर    

 • शेवग्याच्या बिया पाण्यामध्ये घेऊन १० ते १५ मिनिट उकळून घ्याव्यात, त्यांनतर त्यावरील पारदर्शक भाग काढून घ्यावा. त्यांनतर बिया सुर्यप्रकाशात वाळवून घ्यावे.
 • बिया वाळल्यानंतर त्याला पल्वरायजर (पावडर करण्याचे यंत्र) मध्ये बारीक करून घ्यावात. बियांची पावडर बनऊन आपण त्याचा उपयोग स्वासेस, सिजनींग मध्ये केला जातो. 

लेखक:
सचिन अर्जुन शेळके
आचार्य पदवी विद्यार्थी, अन्न विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग, 
सॅम हिगिनबॉटम कृषि, प्रौद्योगिकी आणि विज्ञान विश्वविद्यालय प्रयागराज, उत्तरप्रदेश.  
8888992522

Like this article?

Hey! I am KJ Staff. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters