मक्याचा औद्योगिक प्रक्रियेमध्ये वापर वाढतो आहे. मक्यापासून स्टार्च, पॉपकॉर्न, ( लाह्या ) पोहे, तेल,भरड आणि ग्लूटेन यांसारख्या पदार्थांची निर्मिती केली जाते. मक्यामध्ये कर्बोदके, प्रथिने, स्निग्ध आणि खनिज पदार्थ चांगल्या प्रमाणात असतात.
जगातील तृणधान्यांच्या एकूण उत्पादनापैकी 20 टक्के मक्याचे उत्पादन असते.जागतिक पातळीवर अन्नधान्य तसेच औद्योगिक वापरासाठी मक्याचा उपयोग सर्वात अधिक आहे.मक्याचे उत्पादन भारतातील सर्व राज्यांमध्ये होते.
पोषकतत्वे कर्बोदके 66. 2 टक्के, जलांश 14.9 टक्के, प्रथिने 11.1 टक्के, स्निग्ध पदार्थ 3.6 टक्के, तंतू 2.7 टक्के, खनिज पदार्थ 1.4 टक्के.
- भरड :
1) मका दळून त्याचे रूपांतर जाडेभरडे, मध्यम किंवा बारीक कणात केले जाते. या भाड्या चा वापर एक्सटूडेड अल्पोपहार आणि तळलेले किंवा भाजलेले नमकीन मध्ये संपूर्ण किंवा तांदळाच्या भरड्यासोबत करतात.
नक्की वाचा:अनाथांना शेतकऱ्यांचा आणि शेतकऱ्यांना अनाथांचा हात; राज्यात अनोखा करार
2) मका भरड हे अन्नाची पौष्टिकता व चव वाढवितात. याचा वापर अल्पोपहार, बेकरी पदार्थ तसेच तृणधान्यावर आधारित तयार पदार्थ बनविण्यासाठी करतात.
3) एक भाग भरडा घेऊन त्यात 2 ते 3 भाग उकळलेले पाणी मिसळून 20 ते 30 मिनिटे शिजवावे. त्यामुळे पाणी शोषून कण चिकट बनतात. उष्णतेमुळे भरड प्रसरण पावते. चिकट पांढरा पदार्थ तयार होतो. हे भरड चिज, लोणी, सॉसेस सोबत खातात.
- अंकुर :
1) मका अंकुर हा महत्त्वाचा पदार्थ असून यात तेलाचे प्रमाण 14 टक्के असते.
2) खाद्य व पशुखाद्यासाठी वापर केला जातो. मका अंकुर तेलात मुक्त फॅटी ऍसिड निर्माण होऊ नये, यासाठी जलाशांचे प्रमाण 2 ते 3 टक्के असावे लागते.
- पीठ :
1) पिठाचा वापर मका पाव, कप केक, मफिन्स तयार करण्यासाठी करतात. हे पीठ ग्लुटेन विरहित तात्काळ पाव बनवण्यासाठी उपयोगी आहे.
2) पिठाचा वापर बेकिंग उद्योग, पास्ता आणि सॉसेज बनवण्यासाठी करतात.
- कोंडा :
1) कोंड्यात न विरघळणारे तंतू असल्यामुळे ते पचनक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावतात. न विरघळणारे तंतू रक्तातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी करतात.
2)कोंड्याचा वापर पशुखाद्य, कोंबड्या पाळीव प्राणी तसेच इथेनॉल उत्पादनात केला जातो.
- ग्लूटेन :
1) प्रथिने व खनिज पदार्थांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे.याचा वापर पशुखाद्य बेकरी उद्योगात करतात.
2) पावाचा पोत सुधारण्यासाठी काही प्रमाणात मका ग्लूटेन चा वापर करतात.
- पॉपकॉर्न :
1) मक्याचे स्टार्च व प्रथिने हे ठळक अशा कवचामध्ये बंद असतात. स्टार्च पाण्याचा योग्य प्रमाणात येईपर्यंत त्याला भिजवून घेऊन कोरडे केले जातात. उच्च तापमानात ठेवले असता स्टार्च मधील पाण्याचे रूपांतर होऊन उच्च तापमानाची वाफ दाण्या बाहेर पडते.
2) पॉप कॉर्न अत्यंत कुरकुरीत, स्वादिष्ट असतात. त्यावर थोडासा मसाला मीठ टाकून त्याची चव वाढविली जाते.
नक्की वाचा:वीज तुटवडा भरून काढण्यासाठी राज्य सरकारची धडपड; ऊर्जामंत्र्यांचा छत्तीसगढ दौरा
- स्टार्च :
1) मका स्टार्च हे एक तृणधान्य स्टार्स असून त्यामध्ये प्रथिने व खनिज द्रव्याचे प्रमाण कमी असते. मका स्टार्चच्या अतिशुद्ध तेमुळे त्याचे अनेक औद्योगिक उपयोग आहेत.
2) मक्यामध्ये 66 टक्के स्टार्चचे प्रमाण असून ते अनेक प्रक्रियेद्वारे वेगळे केले जाते. त्यामध्ये भिजवणे, दळणे आणि वाळवणे आद्र दळण या पद्धतीचा समावेश होतो. विशिष्ट प्रक्रियेमुळे दाण्यावरील टरफल निघून ग्लूटेन मऊ होते. त्यानंतर स्टार्स चे विर्जन होते. यंत्राच्या साहाय्याने अंकुर व टरफले वेगळी काढली जातात.
3) शुष्क दळून स्टार्च व ग्लुटेन केंद्रोत्सारी यंत्राच्या साहाय्याने वेगळे केले जातात. स्टार्चवर संस्करण करून डेकस्ट्रोज, मका पाक व मका स्टार्च वेगळे केले जातात.
4) कागद, कापड, अन्नप्रक्रिया, औषधी उद्योगांमध्ये स्टार्चचा वापर करतात.
- पोहे ( कॉर्न फ्लेक्स ):
1) मका पोहे हा लोकप्रिय न्याहारीचा पदार्थ आहे.मक्यापासून चिवडा तयार केला जातो.
2) योग्य आद्रता पाण्याचे प्रमाण व उष्णता या बाबींचे संतुलन राखून स्टीलच्या रोलर मिल मधून उच्चदाब प्रक्रियेद्वारे पोहे तयार केले जातात.
- तेल:
1) मका तेल हे मक्याच्या अंकुरा पासून रासायनिक किंवा यांत्रिक पद्धतीने काढले जाते. साधारणत: प्रति 100 किलो मक्यापासून 2.2 किलो तेल मिळते.
2) मका तेलात अनसॅच्युरेटेड चरबीचे प्रमाण असल्यामुळे याचा वापर सॅलड ड्रेसिंग शिजवण्यासाठी व तळण्यासाठी वापरतात. तेलाचा वापर मार्गारीन उत्पादनात जीवनसत्व वाहक म्हणून करतात.
3) तेलाचा वापर कृत्रिम रबर, सौंदर्यप्रसाधने, साबण, रंग उद्योग, कापड उद्योग, शाई व कीटकनाशक उद्योगांमध्ये केला जातो. (source-agrowon)
Share your comments