1. कृषी व्यवसाय

तरुणांसाठी आले प्रक्रिया उद्योग एक सुवर्णसंधी

आले आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आल्याचा उपयोग नित्य आहारात मोठा आहे. आल्यापासून लोणचे, मसाले, सौम्य पेय बनवले जातात. त्याचप्रमाणे मतदार का मध्ये सुद्धा आल्याचा उपयोग केला जातो. जर आपण महाराष्ट्राचा विचार केला तर प्रामुख्याने सातारा, ठाणे, रायगड आणि पुणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आले लागवड केली जाते.

KJ Maharashtra
KJ Maharashtra
ginger

ginger

 आले आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आल्याचा उपयोग नित्य आहारात मोठा आहे. आल्यापासून लोणचे, मसाले, सौम्य पेय  बनवले जातात. त्याचप्रमाणे मतदार का मध्ये सुद्धा आल्याचा उपयोग केला जातो. जर आपण महाराष्ट्राचा विचार केला तर प्रामुख्याने सातारा, ठाणे, रायगड आणि पुणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आले लागवड केली जाते.

आल्यापासून विविध प्रक्रियायुक्त पदार्थ तयार करण्यासाठी लागणीनंतर आठ महिन्याच्या पुढे बाजारातील मागणीप्रमाणे आल्याची काढणी करावी. या लेखात आपण आल्यापासून कोणकोणते प्रक्रियायुक्त पदार्थ बनवतात याबद्दल माहिती घेणार आहोत.

 आल्यापासून निर्मित प्रक्रियायुक्त पदार्थ

  • आल्याची पेस्ट:

पृथ्वी प्रक्रिया केलेल्या आल्याचे तुकडे 80  सेंटीग्रेड पाण्यात तीन ते चार मिनिटे ठेवावेत. हे तुकडे थंड करून पाणी मिसळून त्याची पेस्ट केली जाते. यामध्ये आम्लता नियंत्रित करण्यासाठी सायट्रिक आम्ल याचा वापर करतात. नंतर तयार झालेली पेस्ट गरम करून व नंतर थंड करून बाटलीत साठवून ठेवावी. या तयार पेस्ट ची चव आणि गुणवत्ता तसेच साठवण क्षमता सुधारण्यासाठी सोडून जाईल या संरक्षकाचा वापर करता येतो.

  • आल्याचा स्क्वॅश:

आल्याचे पूर्व प्रक्रिया केलेले तुकडे हे प्रेशर कुकर मध्ये साधारणतः पाच ते दहा मिनिटे शिजवून घ्यावेत व त्यात पाण्याचा वापर करून आल्या मधील रस काढला जातो व या रसात साखर मिसळून या रसाची विद्राव्य घटकांचे प्रमाण 40 ते 45 टक्‍क्‍यांपर्यंत त्याचे पेय बनवतात.

  • आल्याचा मुरंबा:

आले हे मिठाच्या पाण्यातून काढून थंड पाण्याने स्वच्छ धुवावे व त्या पाण्यात दहा मिनिटे उकळावे. नंतर साखरेच्या पाकात पंचेचाळीस मिनिटे उकळून सीलबंद करून साठवावे.

  • आल्याचे तेल:

वाळवलेल्या आल्याची पावडर वापरून वाफेच्या ऊर्ध्वपातन क्रियेत आल्याचे  तेल गोळा करतात. आल्यापासून जवळजवळ दीड ते साडेतीन टक्के तेल मिळते. हे फिकट हिरव्या किंवा पिवळ्या रंगाचे व विशिष्ट प्रकारचा स्वाद व मसालेदार वासाचे असते. अशा प्रकारे टिकाऊ मूल्यवर्धित विविध पदार्थ प्रक्रिया करून तयार केल्यास शेतकर्याची मुळखात निश्चितच वाढेल व नवीन रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊन बेरोजगारीचा प्रश्न ही काही अंशी सुटण्यास मदत होईलतयार केल्यास शेतकर्याची मुळखात निश्चितच वाढेल व नवीन रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊन बेरोजगारीचा प्रश्नही काही अंशी सुटण्यास मदत होईल.

 

  • आल्याच्या वड्या:

एक वाटी आल्याचा कीस, पाव वाटी नारळाचा कीस, दोन वाट्या साखर, एक कप साईसकट दूध, एक चमचा तूप, थोडी पिठीसाखर हे सर्व साहित्य घ्यावे. आल्याची साल काढून आले व नारळाचा चव मिक्सरमधून काढावा. त्या मिश्रणात दूध व साखर घालून मिश्रण एकसारखे करावे. मंद गॅसवर शिजवून गोळा होत आला की पातेले खाली उतरवून पिठीसाखर घालून घोटावे व वड्या थापाव्यात.

  • आल्याची कॅण्डी:

एक किलो आले, साखर 800 ग्राम, सायट्रिक आम्ल  दहा ग्रॅम, आल्याचे लहान-लहान तुकडे 0.5 टक्के आणि सायट्रिक ऍसिड असलेल्या पाण्यात एक तास शिजवावे व त्यानंतर छिद्रे निर्माण करावीत. आल्याचे तुकडे व 400 ग्रॅम साखर यांचे मिश्रण चोवीस तास ठेवावे. नंतर दुसऱ्या दिवशी 200 ग्रॅम व तिसऱ्या दिवशी 200 ग्रॅम साखर टाकून ठेवावे. व चौथ्या दिवशी हे मिश्रण 60 टक्के विद्राव्य घटक होईपर्यंत शिजवावे. त्यातला पाक गाळून वेगळा केला जातो.

English Summary: ginger processing is big opportunity for youngstur Published on: 23 July 2021, 05:34 IST

Like this article?

Hey! I am KJ Maharashtra. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters