भारतातील शेतकरी मोठ्या प्रमाणात कांदा लागवड करतात. पण सध्या कांद्याला मिळत असलेला दर शेतकऱ्यांना निराश करणारा आहे. कांदा हे रब्बी (Rabi Onion) हंगामात घेतले जाणारे पीक आहे. नवीन कांदा बाजारात यायच्या वेळी कदाचित कांद्याचे दर वाढू शकतात.
शेतकरी मित्रांनो कांद्याच्या रोपांना थंड हवा मानवते. आधिक तापमान व आर्द्रता कांदा पिकास हानिकारक आहे. रब्बी कांद्यासाठी बियांची पेरणी ऑक्टोबरमध्ये करतात. यानंतर रोपांची पुर्नलागवड (Replanting of plants) डिसेंबर-जानेवारीमध्ये केली जाते आणि हे पीक एप्रिल ते मेमध्ये पीक काढण्यास तयार होते.
परंतु चांगल्या उत्पादनासाठी रब्बी कांदा लागवड करतांना शेतकऱ्यांनी योग्य नियोजन करणे आवश्यक आहे. अन्यथा घेतलेली मेहनतीचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे आज आपन रब्बी कांदा लागवडीसाठी आवश्यक नियोजन पद्धतींची माहिती जाणून घेणार आहोत.
रेल्वे स्टेशनवर होणार आधार कार्ड संबंधित महत्वाची कामे; UIDAI ने आखली मोठी योजना
कांदा लागवड
शेतकरी मित्रांनो सर्वात पहिल्यांदा शेत नांगरुन घ्या. जमिनीची मशागत करताना 40 ते 50 बैलगाड्या शेणखत किंवा कंपोस्ट (Manure or compost) जमिनीत मिसळून घ्या. मोठ्या आकाराचा कांदा हवा असल्यास सरी वरंबा पद्धत चांगली आहे. हिवाळ्यातील लागवडीसाठी सपाट वाफे पद्धत चांगली आहे.
वाफ्याची रुंदी २ मीटर व लांबी जमिनीच्या उतारानुसार ठेवा. दोन सरीतील अंतर ३० ते ४५ सें. मी. ठेवून सर्या पाडा. एक हेक्टर क्षेत्रावर कांदा लागवडीसाठी ९ ते १० किलो बियाणे लागते व त्यासाठी १० ते १२ गुंठे रोपवाटिकेसाठी लागतात. त्यानुसार अंदाज घेऊन ठरवा. यानंतर कांद्याची रोपे गादीवाफ्यावर तयार करा.
महत्वाचे म्हणजे गादी वाफा १ ते १.५ मी. रुंद २ मी. लांब व १५ सें. मी. उंच करा. वाफे तयार करताना प्रत्येक वाफ्यात २ घमेले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट, २५० ग्रॅम सुफला (१५:१५:१५) व २० ग्रॅम कॉपर ऑक्सीक्लोराईडकची (Copper Oxychloride) पावडर मिसळा. याने कांद्याची रोपे बहरू लागतील.
शेतकऱ्यांनो पुसा तेजस गव्हाचे वाण लागवडीसाठी फायदेशीर; फक्त 125 दिवसात मिळणार भरपूर उत्पादन
रोग व कीड नियंत्रण असे करा
कांदा पिकावर प्रामुख्याने मर व करपा हे रोग आणि फुलकिडे या किडीचा प्रादुर्भाव होतो. त्यामुळे यांचे नियंत्रण करणे गरजेचे असते. मर रोगाच्या नियंत्रणासाठी पेरणीपूर्वी २ ते ३ ग्रॅम थायरम किंवा बावीस्टीन प्रति किलो बियाण्यास चोळा.
फुलकिडे व करपा रोगाच्या नियंत्रणासाठी (Disease control) पुनर्लागवडीनंतर २ ते ३ आठवड्यांनी ७५० मि. लि. फिप्रोनिल (५ एस. सी.) किंवा ५०० मि. लि. प्रोफेनोफॉस (५० ईसी) किंवा ५०० मि. लि. कार्बोसल्फान (२५ ई. सी.) अधिक कॉपर ऑक्सीक्लोराईड १२५० ग्रॅम किंवा मॅन्कोझेब (डायथेन एम-४५) १००० ग्रॅम ५०० लिटर पाण्यात स्टिकर मिसळून प्रति हेक्टरी १५ दिवसांच्या अंतराने फवारणी करा.
महत्वाच्या बातम्या
पीएम किसान योजनेत मोठा बदल; आता 'या' शेतकऱ्यांनाच मिळणार 12 वा हप्ता
सावधान! या लोकांसाठी ठरू शकतो अडचणींचा काळ; जाणून घ्या आजचे राशीभविष्य
रेशनकार्ड सुरू ठेवायचे असेल तर ताबडतोब करा 'ही' माहिती अपडेट; जाणून घ्या प्रक्रिया
Share your comments