शेतकरी आपल्या शेतीमध्ये (agriculture) चांगल्या उत्पादनासाठी नवनवीन पिकांची लागवड करत असतात. मात्र शेतीमध्ये अधिक खर्च करूनही पाहिजे तसे शेतकऱ्यांना उत्पादन मिळत नाही. त्यामुळे आज आज कमी खर्चात चांगले उत्पादन कसे काढायचे या टिप्स पाहणार आहोत.
आपण पाहणार आहोत ती भारतीय संस्कृतीचा एक अविभाज्य भाग आहे. पण ही परंपरा टिकवून ठेवण्यासाठी शेतकऱ्यांकडे योग्य आणि उत्कृष्ट माहिती असणे गरजेची आहे. आज आपण महत्वाच्या टिप्सबद्दल माहिती जाणून घेऊया.
१) खोल नांगरणी
शेतकरी मित्रांनो हे लक्षात ठेवा की तुम्हाला अधिक उत्पादन मिळवायचे असेल तर तुम्हाला प्रथम शेत नांगरणी करावी लागेल. पिकाच्या नांगरणीसाठी शेतात ट्रॅक्टर (tractor), रोटाव्हेटर, कल्टीव्हेटर इत्यादी उपकरणे वापरा. हे गरजेचे आहे. याच्या मदतीने कमी मेहनत आणि कमी वेळेत कामे सहज होतील.
आनंदाची बातमी! 'या' दोन बँका FD वरील व्याजदर वाढवणार; गुंतवणूकदारांना मिळणार भरपूर लाभ
२) वेळेवर पेरणी करा
काही दिवसांमध्ये रब्बी पिकांची (rabbi crops) पेरणी सुरू होईल. त्यामुळे चांगले उत्पादन घेण्यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची वेळेवर पेरणी करा. पेरणी योग्य वेळी न केल्यास उत्पादनावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे अशावेळी काळजी घेण्याची गरज आहे.
३) पेरणीपूर्वी बियाण्यांवर प्रक्रिया
बियाण्याची पेरणीपूर्वी प्रक्रिया करा. कारण बियांमध्ये कोणत्याही प्रकारचे रोग असल्यास झाडाची वाढ होण्यास खूप अडचण येते. याचा शेतकऱ्यांच्या उत्पादनावर परिणाम होऊ शकतो. महत्वाचे म्हणजे बियाण्यांवर प्रक्रिया केल्यावर पीक चांगले होते आणि रोगांची भीती कमी होते.
दिलासादायक! शेतकऱ्यांच्या खात्यात पीक कर्जाची रक्कम जमा; 728 कोटी रुपयांहून कर्ज वाटप
४) चांगल्या प्रतीचे बियाणे पेरा
पेरणीसाठी चांगल्या प्रतीचे बियाणे वापरा. जेणेकरून जास्तीत जास्त उत्पादन घेता येईल. याशिवाय तुमची फसवणूक होऊ नये म्हणून विश्वासू दुकानदारांकडूनच बियाणे खरेदी करण्याचा विशेष सल्ला दिला जातो. चांगल्या दर्जाच्या बियाण्यांतून २० ते २५ टक्के अधिक उत्पादन मिळते.
5) बियांमध्ये योग्य अंतर ठेवा
शेतकरी मित्रांनो पीक पेरणीच्या वेळी तुम्हाला बियांमधील योग्य अंतर आणि ते सलग पेरावे लागेल. कारण कोणत्याही बियाण्यास विशिष्ट जागा आणि पोषण आवश्यक असते. रोपापासून रोपापर्यंत योग्य अंतर असल्याने पिकाला चांगले उत्पादन मिळून अधिक उत्पादन सहज मिळू शकते.
महत्वाच्या बातम्या
चांगल्या आरोग्यासाठी मिठाचे प्रमाण किती असावे? जाणून घ्या सविस्तर
LIC ची खास योजना; 'या' योजनेतून महिलांना 4 लाख रुपयांची मिळणार आर्थिक मदत
शेतकऱ्यांनो कोरडवाहू क्षेत्रात लागवड 'अशा' पद्धतीने करा; पिके येतील जोमात
Share your comments