आजच्या जीवनशैलीत केमिकलयुक्त अन्न पदार्थांमुळे मानवी जीवन शारीरिक व्याधींनी ग्रासले असून अल्पायुषी झाले आहे. त्यामुळे नैसर्गिक शेतविषयी जनजागृती आणि प्रसार यासाठी राज्यात कृषी केंद्रांकडून शेतीविषयक विविध उपक्रम राबवण्यात येतात. याच धर्तीवर सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ येथे शेतकरी मेळाव्याचे आयोजन कृषि विज्ञान केंद्र, मोहोळ येथे करण्यात आले.
महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी अंतर्गत कृषि विज्ञान केंद्र, मोहोळ, महाराष्ट्र शासन कृषि विभाग, आत्मा सोलापूर व एरोनिका ऍडव्हान्स टेक्नॉलोजी पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने खरीप हंगामपूर्व शेतकरी मेळावा व ड्रोन तंत्राद्वारे पीक फवारणी प्रात्यक्षिक कार्यक्रमाचे आयोजन स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव वर्षा निमित्त 'किसान भागीदारी, प्राथमिकता हमारी' या अभियानाअंतर्गत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. डी. व्ही. इंडी सहयोगी प्राध्यापक, विभागीय कोरडवाहू संशोधन केंद्र, सोलापूर हे होते. तर आजच्या काळामध्ये नैसर्गिक शेती आणी सेंद्रिय शेतीचे महत्त्व असून शेतकऱ्यांनी आधुनिक पद्धतीने शेतीविषयक मार्गदर्शन डॉ इंडी यांनी केले. या निमित्ताने कृषी विज्ञान केंद्राने ड्रोन तंत्राद्वारे पीक फवारणी प्रात्यक्षिकाचे आयोजन केले. जयंत कवडे यांनी शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी पीक बदल सुचवत पारंपारिक शेतीमध्ये आधुनिकते विषयी जागृती केली.
तांत्रिक क्षेत्रांमध्ये खरीप हंगामाची पूर्वतयारी, पौष्टिक तृणधान्य जैव समृद्ध पिकाचे वाण व प्रक्रिया उद्योगातील संधी, खरीप हंगाम रोग व व्यवस्थापन या विषयी विविध तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. जगन्नाथ मगर यांनी नैसर्गिक व सेंद्रिय शेती या विषयी अनुभव या मेळाव्यात कथन केले. शिवाय एरोनिका टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड यांनी ड्रोन तंत्राविषयी तांत्रिक बाबी शेतकऱ्यांना सांगण्यात आल्या.
यात ड्रोन तंत्राद्वारे एक एकर क्षेत्रामध्ये फार कमी वेळेत फवारणी करता येते असल्याचे प्रात्यक्षिक शेतकऱ्यांना करुन दाखवण्यात आले. यामुळे याचा येणाऱ्या काळात याचा शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. सध्या सरकारच्या अनेक योजना या शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरत आहेत.
महत्वाच्या बातम्या;
शेतकऱ्यांसाठीही भोंगा वाजवा!! भोंग्याच्या वादात हिंदुस्थान मानव पक्षाची उडी
शेतकऱ्यांनो या फुलाला परदेशातही मोठी मागणी आहे, कमी खर्चात मिळवा मोठा नफा..
धेनू अँपच्या आधुनिक तंत्रामुळे शेतकऱ्यांना लाखों रुपयांचा फायदा
Share your comments