1. कृषी व्यवसाय

महिलांच्या आर्थिक उन्नती साठी उपयुक्त आहे डाळ प्रक्रिया उद्योग, जाणून घेऊ सविस्तर त्याबद्दल

ग्रामीण भागात चालू शकेल असा डाळ प्रक्रिया उद्योग ग्रामीण भागातील महिलांसाठी फायदेशीर आहे.या उद्योगाच्या माध्यमातूनगावातच उत्पादित होणाऱ्या कडधान्यावर गावातच प्रक्रिया केल्याने वाहतुकीचा खर्च वाचून कमीत कमी किमतीत डाळ मिळू शकेल. त्या माध्यमातून छोटे उद्योग उभे राहण्यास मदत होईल

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
dal processing

dal processing

ग्रामीण भागात चालू शकेल असा डाळ प्रक्रिया उद्योग ग्रामीण भागातील महिलांसाठी फायदेशीर आहे.या उद्योगाच्या माध्यमातूनगावातच उत्पादित होणाऱ्या कडधान्यावर गावातच प्रक्रिया केल्याने वाहतुकीचा खर्च वाचून कमीत कमी किमतीत डाळ मिळू शकेल. त्या माध्यमातून छोटे उद्योग उभे राहण्यास मदत होईल

अशा प्रकारचे उद्योग उभे करण्यासाठी शासकीय योजनांद्वारे आर्थिक मदत देखील मिळते. या लेखात आपण डाळ प्रक्रिया उद्योगा विषयी सविस्तर जाणून घेणारा आहोत.

डाळ उत्पादनाचा प्रकार व त्याची व्याप्ती

 तुरीपासून जर डाळ तयार करायचे असेल तर तुरीवर प्रक्रिया करून डाळ भरडून टरफले काढून नंतर डाळ वेगळी केली जाते. जर तूर डाळ तयार करण्याचा विचार केला तर तिचे उत्पादन तीन प्रतीत होते. त्याच्या मध्ये तीन ग्रेड येतात. पहिली ग्रेड ही फटका, दुसरी ग्रेडला सव्वा नंबर आणि तिसरी ग्रेडी सर्वसाधारण अशा पद्धतीच्या या ग्रेड असतात. डाळ तयार करताना होणारी चूरी आणि भुसा हे देखील वाया जात नाही.

डाळ तयार करण्याची प्रक्रिया

  • तुरीची डाळ तयार करण्याच्या अगोदर तुरीला सहा ते आठ तास भिजवून तीन ते चार दिवस वाळवून घ्यावी लागते. याबाबतीत मोठ्या डाळ मिल असा विचार केला तर तिथे तेलाचा वापर करून तुरी उन्हात वाळवितात आणि नंतर तूरचार रोलर मधून भरडून त्याची डाळ तयार होते.
  • डाळ तयार करण्यासाठी अकोला येथील डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या मिनी डाळ मिल चा उपयोग करणे फायदेशीर ठरेल. मिनी डाळ मिल 2 अश्व शक्तीच्या विद्युत मोटारीवर देखील चालते.
  • यामध्यउद्धवाहकाच्या मदतीने तूर रोलर च्या चाडीत टाकता येते. त्यामुळे कच्चामाल पुरवण्यासाठी मजुरांची आवश्यकता भासत नाही. त्याच्या पृष्ठभागावर विशिष्ट प्रकारचे टरफले काढण्याची व्यवस्था असल्याने टरफले काढणे सोपे होते.
  • रोलर च्या मध्ये असलेल्या मोकळ्या जागेतून दाणे सुलभपणे बाहेर पडण्याकरिता रोलर सहकार कापलेल्या शंकूसारखा बनवला आहे.दाण्याचा ओघ रोलर मध्ये जाण्याचे आणि बाहेर पडण्याचे नियंत्रण करण्यासाठी विशिष्ट यंत्रणा बसवलेली आहे.
  • या मिलमध्ये रोलर मधून बाहेर आलेल्या मिश्रणातून टरफले वेगळी करण्यासाठी पंखा दिलेला आहे. हा पंखा पुढे वीघटकाला जोडला आहे. त्यातून टरफले खाली पडून हवा वरील पाईपातून बाहेर निघून जाते.
  • रोलरच्या चाळणीतून पावडर वेगळी बाहेर पडते. रोलर मधून निघणारे बाकीचे मिश्रण चाळण्याच्यासाह्याने वेगवेगळे केले जाते. वरचे लांबोळे क्षिद्रस्लॉट असलेल्या चाळणी  वरून तुरी वेगळ्या केल्या जातात.
  • त्यामध्ये असलेल्या खालच्य चाळणी वरून डाळ वेगळीहोते.तसेच खाली पडलेली चूरी वेगळे होते. हे तीनही भाग निरनिराळ्या तीन बहिरद्वारातून बाहेर येतात.
  • वाळवून रोलर मधून काढल्यानंतर मोगर मिळते. हरभरा, सोयाबीन, मसूर, चवळी  इत्यादी कडधान्यांचे डाळ तयार करायचे असल्यास त्यांचा ओलावा 12 टक्क्यांपर्यंत उरेल. त्याची एकदाच रोलर मधून काढून डाळ काढतात.

डाळ मिल उभारण्यासाठी जागेची निवड

  • या ठिकाणी पक्का माल व कच्चामाल सहज व जवळ उपलब्ध असेल अशा ठिकाणी डाळींची उभारणी करणे फायद्याचे असते.
  • जे शेतकरी दरवर्षी 10 ते 20 टनांपर्यंत तुर,  मुगाचे उत्पादन घेताना शेतकऱ्यांना डाळ करून देता येऊ शकते.
  • दोन चार मोठी गावे मिळून डाळ मिल उभारता येते . यासाठी 50 चौरस मीटर ची एक खोली तसेच 200 चौरस मीटरची जागा सर्व साधारणपणे मुख्य रस्तावरअसावी.धान्य वाळविण्यासाठी ओटाअसावा. यंत्र चालवण्यासाठी एक तांत्रिक मजूर आणि पाच किलो वॅट चाविद्युत पुरवठा लागतो.
  • पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाची मिनी डाळ मिल चालवण्यासाठी दररोज साधारण शंभर लिटर पाणी आणि अडीच ते तीन लिटर खाद्य तेलाची आवश्यकता असते
English Summary: dal prosessing is benificial bussiness for women stregthen in financially Published on: 20 November 2021, 05:02 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters