सध्या राज्यात मोठ्या प्रमाणावर ऊस उत्पादक शेतकरी आहेत. अनेकांना तर ऊस तोडण्यासाठी नाकीनऊ येत आहे. तसेच दरवर्षी दरासाठी रस्त्यावर उतरावे लागत आहे. यामुळे त्यांना अनेक संकटांना सामोरे जावे लागत आहे. असे असताना काहीजण वेगळा प्रयोग करून पर्याय उपलब्ध करत आहेत. यामुळे शेतकऱ्यांना याचा फायदा होत आहे.
हिंगोली (Hingoli) जिल्ह्यातील देवजना येथील शेतकरी संतोष कल्याणकर (Santosh Kalyankar) यांनी सेंद्रिय गूळ उत्पादनातून (Organic Jaggery) चांगल उत्पन्न घेतलं आहे. यामुळे त्यांची चर्चा सुरू आहे. शेतकरी संतोष कल्याणकर यांना घरी वडिलोपार्जित शेती आहे. या शेतीपैकी अडीच एकर शेतात त्यांनी सेंद्रिय पध्दतीनं ऊसाचे उत्पादन घेतले आहे.
त्यांनी उसापासून सेंद्रिय गूळ निर्मिती केली आहे. शेतातील ऊस तोडून शेतीच्याच बाजूला असलेल्या गूळ कारखान्यात गुळाचे गाळप केले जाते. अडीच एकर शेतात उत्पादन घेतलेल्या ऊसापासून 70 क्विंटल सेंद्रिय गूळ निर्मिती केली आहे. आता या गुळाला बाजारात मोठी मागणी आहे. या सेंद्रिय गूळ उत्पादनातून कल्याणकर यांना 4 लाख 50 हजाराचे उत्पन्न मिळाले आहे.
ब्रेकिंग! स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्या मुलाला पोलिसांकडून अटक
यामुळे हा एक चांगला पर्याय त्यांनी शेतकऱ्यांसमोर उभा केला आहे. सध्या त्यांना गुळाला ६० ते ७० रुपयांचा दर मिळत आहे. शेतकरी संतोष कल्याणकर यांना या सेंद्रिय गूळ उत्पादनातून 4 लाख 50 हजाराचे उत्पन्न मिळाले आहे. तयार केलेला गूळ विक्री करण्यासाठी कोणत्याही बाजारपेठेत जायची गरज नाही. लोक घरी येऊन गुळाची खरेदी करत आहेत.
यामुळे विक्रीचे देखील टेन्शन त्यांना नाही. त्यामुळे ऊस तोडणीसाठी साखर कारखान्याकडे मागणी करायची गरज नाही, शिवाय यातून चांगला आर्थिक फायदा होताना दिसून येत असल्याचे कल्याणकर म्हणाले. सध्याच्या अतिरिक्त उसाला हा एक चांगला पर्याय आहे. यामुळे शेतकऱ्यांनी असे प्रयोग करायला हवेत.
विजेला हात लावाल तर कायदा हातात घेऊ, अमरसिंह कदम यांचा महावितरणला इशारा
दरम्यान, सध्या अडीच एकर क्षेत्रावर नैसर्गिक ऊसाची लागवड केली आहे. हा ऊस बंधू दिपक कल्याणकर यांच्या गुळावर घालत असल्याचे संतोष कल्याणकर यांनी सांगितले. एका हेक्टरमध्ये 60 ते 70 क्विटंल गुळ निघतो. त्यापासून मला दरवर्षी चार ते साडेचार लाखाचे उत्पन्न मिळत असल्याचे कल्याणकर यांनी सांगितले. यामुळे हे फायदेशीर आहे.
महत्वाच्या बातम्या;
नाद करा की पण आमचा कुठं!! दूध आणि शेणातून बांधला एक कोटीचा बंगला, वर्षाला दीड कोटींचा नफा..
'आमचे 40 रेडे दर्शन घेण्यासाठी गुवाहाटीला जात आहेत'
बहुराष्ट्रीय कंपन्याच्या मुठीतूनच कृषी क्षेत्राची डिजीटलायझेशन कडे वाटचाल, राजू शेट्टी यांची एक माहिती एकदा वाचाच
Share your comments