शेतकरी आपल्या शेतात (agriculture) चांगले उत्पादन काढण्यासाठी पिकांचे (crop) चांगले व्यवस्थापन करत असतात. मात्र अनेक शेतकऱ्यांना आडसाली उसाचे योग्य व्यवस्थापन कसे करावे हे माहीत नसते. त्यामुळे उस उत्पादनात मोठी घट होते.
आडसाली उस (Aadsali sugarcane) कमीत कमी 16 महीने व जास्तीत जास्त 18 महीने शेतात (agriculture)असतो. त्यामुळे या वेळेत उस पिकाची योग्य काळजी घेण्याची गरज असते. इतर पिकांच्या तुलनेत ऊसाची पाण्याची गरज जास्त असते. तरीही इतर पिकांच्या तुलनेत उस पाण्याचा ताण बऱ्यापैकी सहन करतो.
उसाच्या संपूर्ण वाढीच्या अवस्थेत मुळांना पाणी, अन्न आणि हवा याचे संतुलित प्रमाण गरजेचे असते. त्यामुळे उस पिकासाठी पाणी व्यवस्थापन (water Management) कसे करावे याची सविस्तर माहिती घेऊया
१) अति पाणी हे ऊस तसेच साखरेचे उत्पादन घटवते. सौम्य प्रमाणात पाण्याचा ताण ऊस उत्पादन वाढविते.
२) फुटवे फुटण्याच्या वेळेस जर जास्त पाणी दिले तर मुळाजवळ हवेचे प्रमाण कमी होते. फुटवे कमी निघतात.
३) उसाची उंची तसेच कांड्याची लांबी वाढणे जरुरीचे आहे, कारण यामध्ये साखर साठवली जाते. उसाचे वजन वाढते.
४) तोडण्याच्या अगोदर १५ ते २० दिवस पाणी देणे थांबविल्यास उसातील साखरेचे प्रमाण वाढण्यास मदत होते.
उगवणीची अवस्था
उगवणी अवस्था तसेच कोंब स्थिर होण्याच्या कालावधीत हलके, परंतु वारंवार पाणी देणे महत्त्वाचे आहे. सुरुवातीच्या काळात जमीन फक्त ओली असणे महत्त्वाचे आहे. जमिनीत हवा खेळती असावी. सुरुवातीच्या काळात पाण्याचा ताण असेल तर जमीन कोरडी राहते.
त्यामुळे उगवण उशिरा आणि कमी प्रमाणात होते. पाण्याचा जास्त प्रमाणात वापर झाल्यास, शेतात पाणी उभे राहिल्यास उसावरील डोळे कुजतात, तसेच उगवून आलेले कोंबही मरतात. उगवणीचे प्रमाण कमी राहते. यामुळे पुढे जाऊन अपेक्षित ऊस संख्या मिळत नाही.
खत व्यवस्थापन
ऊस पिकाची अन्नद्रव्यांची गरज जास्त असते. १ टन ऊसनिर्मितीसाठी जमिनीतून १.१ किलो नत्र, ०.६ किलो स्फुरद आणि २.२५ किलो पालाश शोषून घेतले जाते.
म्हणजेच हेक्टरी १५० टन ऊस उत्पादनासाठी जमिनीतून १६५ किलो नत्र, ९० किलो स्फुरद आणि ३३७.५ किलो पालाश शोषून घेतले जाते. त्याप्रमाणात अन्नद्रव्य पुरवठा करणे जरुरीचे आहे.
Share your comments