नारळाचा प्रत्येक भागाचा उपयोग प्रक्रिया उद्योगासाठी अत्यंत उपयुक्त आहे.प्रक्रियेसाठी तंत्रज्ञान आणि काही प्रमाणात अनुदान नारळ विकास मंडळाकडे उपलब्ध आहे.वाढती मागणी लक्षात घेता सहकारी तत्त्वावर किंवा गाव पातळीवर नारळ प्रक्रिया उद्योग यशस्वी ठरू शकतो.
नारळ हा आरोग्यदायी अन्न तसेच पेय पुरविण्याबरोबरच निवारा,संपत्ती आणि सौंदर्य देणारा वृक्ष आहे. याच्या प्रत्येक भागाचा उपयोग खाद्य पदार्थ तसेच प्रक्रिया उद्योगात केला जातो. केरळ, कर्नाटक, तामिळनाडू,आंध्र प्रदेश या राज्यांची आर्थिक प्रगती हीनारळ प्रक्रिया उद्योग आणि पर्यटनातूनच होत आहे.त्यासाठी नारळ उत्पादन वाढविण्यावर नारळ लागवड, योग्य व्यवस्थापन आणि प्रक्रिया उद्योगावर भर दिला पाहिजे. कोकणात नारळा खालील क्षेत्र हे विखुरलेल्या स्वरूपात असल्याने सहकारी तत्त्वावर किंवा गावपातळीवर लघु उद्योग यशस्वी ठरू शकतात. त्याच बरोबर एकात्मिक कारखानदारीचाविचारकरण्याची गरज आहे.
- पुरकउद्योगांना संधी :-
- अखंड नारळ खरेदी करून त्याच्या प्रत्येक भागाचा उपयोग करून स्वतंत्र उद्योग उभारणे शक्य आहे. नारळाच्या प्रत्येक भागाचा उपयोग विविध उत्पादने तयार करण्यासाठी होऊ शकतो. यासाठी हे तंत्रज्ञान आणि काही प्रमाणात अनुदान नारळ विकास मंडळाकडे उपलब्ध आहे.
- डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठामध्ये सन 2007 मध्ये भारतातील पहिले नारळ प्रक्रिया उद्योग प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात आले.
- नारळ विकासमंडळा मार्फत महाराष्ट्रासाठीचे कार्यालय ठाणे येथे सुरू करण्यात आले आहे. त्याचा लाभ नारळ बागायतदारांनी घेतला पाहिजे.
- प्रक्रिया उद्योगांना संधी
काथ्या उद्योग :
- अखंड नारळ सोलल्यानंतर सोडणे उपलब्ध होतात. या सोडणापासून काथ्याकाढला जातो.त्यापासून अनेक वस्तू तयार केल्या जातात. त्यापैकी सुंभ, दोरखंड,पायपुसण्याला चांगली मागणी आहे.
- सोडण भुसा (क्वायर पूथ) 70 टक्के उपलब्ध होतो. याचा उपयोग जमिनीची प्रत सुधारणे. मुळे फुटण्यासाठी माध्यम आणि आच्छादनासाठी होतो. त्याचबरोबर उत्तम प्रकारचे सेंद्रिय खत तयार करता येते. त्याच्यामध्ये त्याच्या वजनाच्या 10 पट पाणी धरून ठेवण्याची क्षमता असल्याने त्याचा वापर पाणी कमतरता असलेल्या विभागात पिकासाठी चांगला होतो.
- नारळ पाण्यापासून व्हिनेगर :-
पक्व नारळ सोलून फोडल्यानंतर त्याच्यामधून जे पाणी उपलब्ध होते. त्यापासून व्हिनेगर तयार करता येते.
नारळ पाण्यापासून नाथा– डी- कोको सॉससरबत निर्मितीला वाव आहे.
- खोबरे :-
सुके खोबरे, खोबरे तेल, नारळ खोबरे, दूध,शुद्ध खोबरेल तेल, नारळ खोबरे, मलई, दूध पावडर,नारळ चिप्स खोबरे पीठ या पदार्थांना प्रक्रिया उद्योगात चांगली मागणी आहे.
- करवंटी :-
करवंटीपासून कोळसा तयार करतात. त्यापासून ऍक्टिव्हेटेड कार्बन तयार करता येतो. याचा उपयोग वनस्पती तेल शुद्ध करणे, पाण्याचे शुद्धीकरण द्रावकाचा उतारा, सोन्याचाउतारा विषारी वायूपासून संरक्षणासाठी वापरात येणारा गॅस मास्क मध्ये केला जातो.
परदेशात करवंटी कोळशाला चांगली मागणी आहे.
- शहाळे विक्री :-
- पालघर ठाणे आणि रायगड जिल्ह्यातील बागायतदार शहाळ्याची विक्री करतात. बागायतदार व्यापाऱ्यांना वार्षिक कराराने नारळाची झाडे देतात. त्यामुळे पाडपतेविक्रीचे नियोजन व्यापारी पाहतात.त्यामुळे शहाळे विक्री हा चांगला व्यवसाय आहे. पालघर मध्ये सहकारी संस्था मार्फत शहाळ्याची विक्री होते. तेथेही शहाळे पाडप ते विक्री संस्थेमार्फत केली जाते.
- कोकणात पर्यटकांची संख्या वाढत असल्याने शहाळ्याचा तुटवडा भासत असून शहाळी वेळप्रसंगी कर्नाटकातून आणावी लागतात. सध्या शहाळी काढणारे लोक उपलब्ध नसल्याने बागायतदारांच्या समोर मजुरांची अडचण आहे.
- नारळ करवंटी, काथ्यापासून शोभेच्या वस्तू :-
करवंटी तसेच काथ्यापासून विविध शोभेच्या वस्तू तयार केल्या जातात. याला देश-परदेशात चांगली मागणी आहे.
(स्रोत-अग्रोवन)
Share your comments