काबुली चणा प्रक्रिया

Tuesday, 30 April 2019 07:52 AM


सँडविचमध्ये लावण्यासाठी एक अतिशय पौष्टिक ‘स्प्रेड’ म्हणून ‘काबुली चणा बटर’ म्हणजेच काबुली चण्यापासून तयार केले गेलेले बटर अतिशय लोकप्रिय होऊ लागले आहे. ब्रेड किंवा पोळीवर पसरवून बटरचे सेवन केले जाते. शहरी भागातील मार्केटमध्ये बटरला चांगली मागणी आहे. बटर अधिक पौष्टिक बनवण्यासाठी त्यामध्ये काबुली चण्याचा वापर करता येतो.

आरोग्यासाठी फायदेशीर:

 • काबुली चण्यामध्ये विरघळणारे व न विरघळणारे असे दोन्ही प्रकारचे तंतुमय घटक असल्यामुळे शरीरातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी करण्यास मदत होते.
 • लोह मोठ्या प्रमाणात असल्यामुळे रक्तक्षय, अशक्तपणा, डोकेदुखी यांसारखे आजार कमी होण्यास मदत होते.
 • तंतुमय घटक आणि प्रथिने असल्यामुळे वजन कमी करण्यास मदत होते.
 • काबुली चण्यामध्ये पोटॅशियम आणि मॅग्नेशिअम असल्यामुळे शरीरातील इलेक्‍ट्रोलाइटचे प्रमाण समतोल राखण्यास मदत होते.  
 • रक्तदाब कमी होण्यास फायदेशीर ठरते.
 • काबुली चणा हे एक प्रकारचे कडधान्य असून यामध्ये 20 टक्के प्रथिने, तसेच डाईटरी फायबर, फोलेट आणि खनिजे असतात.
 • काबुली चणा बटरच्या सेवनाने भूक लवकर शमत असून, त्यामुळे अन्नाचे सेवन आपोआपच कमी होते. याच्या सेवनाने शरीराची चयापचय शक्ती वाढत असून, त्यामुळे वजन घटण्यास मदत होते.
 • पोषक गुण: ऊर्जा 686 किलो ज्यूल, कर्बोदके 27.42 ग्रॅम, स्निग्ध पदार्थ 2.5 ग्रॅम.
 • खनिजे: लोह 2.8 मिलीग्रॅम, कॅल्शिअम 49 मिलिग्रॅम, फॉस्फरस 168 मिलिग्रॅम.

प्रक्रिया:

 • रात्रभर पाण्यामध्ये काबुली चणे (100 ग्रॅम) भिजत ठेवावेत. भिजलेले चणे शिजेपर्यंत पाण्यामध्ये उकळून घ्यावेत. शिजलेले चणे मिक्‍सरमधून बारीक करून घ्यावेत.
 • दुसऱ्या भांड्यामध्ये डार्क चॉकलेट (70 ग्रॅम) वितळून घ्यावे.
 • मिक्‍सरच्या भांड्यामध्ये बारीक केलेले काबुली चणे, पिठीसाखर (60 ग्रॅम), तेल (30 ग्रॅम), वितळलेले डार्क चॉकलेट, वॅनिला इसेन्स (2 ते 3 थेंब) एकत्रित करून घ्यावे.
 • बारीक मिश्रण तयार होईपर्यंत सर्व साहित्य एकत्र करून घ्यावे. हे मिश्रण भांड्यामध्ये काढून फ्रिजमध्ये ठेवावे.


श्री. शैलेंद्र कटके, प्रा. डॉ. अरविंद सावते आणि प्रा. हेमंत देशपांडे
अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी

chick pea kabuli chana gram हरभरा काबुली चणा चणा बटर chana butter

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय
Download Krishi Jagran Mobile App


CopyRight - 2019 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.