1. कृषी व्यवसाय

बोर प्रक्रिया: बोरांवर प्रक्रिया करून बनवा चटणी व लोणचे, होईल फायदा

बोर आपल्याला सगळ्यांना माहिती आहेत. बोर हे एक लालसर पिवळट रंगाचे आंबट-गोड चव असलेले फळ आहे. महाराष्ट्र मध्ये प्रामुख्याने मराठवाडा आणि विदर्भ या भागात बोरींची काटेरी झुडपे आढळतात. बोर हे चवीला रुचकर व पचण्यास हलके असतात. बोर हे आरोग्यासाठी देखील लाभदायक आहेत

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
bor fruit

bor fruit

बोर आपल्याला सगळ्यांना माहिती आहेत. बोर हे एक लालसर पिवळट रंगाचे आंबट-गोड चव असलेले फळ आहे. महाराष्ट्र मध्ये प्रामुख्याने मराठवाडा आणि विदर्भ या भागात बोरींची काटेरी झुडपे आढळतात. बोर हे चवीला रुचकर व पचण्यास हलके असतात. बोर हे आरोग्यासाठी देखील लाभदायक आहेत

बोरांच्या सेवनाने वातदोष कमी होतो तसेच जुलाब थांबतो, रक्तविकार, श्रम, शोषित इत्यादी त्रासहातही  बोर हितकारक असतात. या लेखाच्या माध्यमातून आपण बोरावर प्रक्रिया करून चटणी व  लोणचे कसे बनवतात ही माहिती घेऊ.

 बोरांपासून लोणचे बनवण्याची पद्धत

  • पिकलेल्या बोरांपासून उत्तम प्रकारचे लोणचे तयार करता येते. त्यासाठी अगोदर लोणच्यासाठी वापरावयाचे तेल उकळून ते थंड करून घ्या.
  • लोणचे तयार करण्यासाठी बोराच्या फोडी दीड किलो,मीट 250 ग्रॅम, मेथी ही मध्यम भरलेली असावी अडीच ग्रॅम, मोहरी  ( मध्यम भरलेली ) 100 ग्रॅम, मिरची पूड 50 ग्रॅम, हिंग 50 ग्रॅम, हळद पावडर 25 ग्रॅम, सोडियम बेंजोएट 0.1ग्रॅम  हे घटक लागतात.
  • प्रथम बोराचे तुकडे व मीठ सोडून बाकी उरलेले सर्व पदार्थ तेलात परतून घ्यावेत. मसाला व फळांचे तुकडे एकत्र मिसळून पुन्हा दोन तीन मिनिटे परतून घेऊन  मीठ  मिसळावे.
  • तयार झालेले लोणचे निर्जंतुक केलेल्या काचेच्या बाटल्यांमध्ये भरून, बाबा बंद करून झाकण लावून त्या थंड व कोरड्या जागी साठवून ठेवाव्यात.

बोरापासून बनवा चटणी

 बोरांचे चटणी  तयार करताना किंचित पिवळसर रंगाची निरोगी बोरी निवडून त्याचा केस करून घ्यावा. एक किलो बोराच्या किसापासून साधारणतः एक किलो 500 ग्रॅम ते एक किलो 750 ग्रॅम चटणी तयार होते.

 साहित्य

बोराचा किस एक किलो,साखर एक किलो, मिरची पूड 20 ग्रॅम, कांदा बारीक वाटलेला 60 ग्रॅम,मीठ 50 ग्रॅम, लसुन बारीक वाटलेला 15 ग्रॅम, वेलदोडे पावडर 15 ग्रॅम, दालचिनी पावडर 15 ग्रॅम, विने गर 180 मिली इत्यादी घटक लागतात.

 चटणी तयार करण्याची कृती

  • बोराच्या किसमध्ये साखर आणि मीठ घालून मिसळून ते मिश्रण गरम करण्यास ठेवावे. सर्व मसाल्याचे पदार्थ मलमलच्या कापडाच्या पुरचुंडी मध्ये बांधून मिश्रणात सोडावेत. अधून मधून ही पुरचुंडी थोडीशी पळीने दाबावी. म्हणजे मसाल्याचा अर्क उतरण्यास मदत होते.
  • हे मिश्रण 67 ते 69 अंश ब्रिक्‍स येईपर्यंत शिजवावे. त्यात विनेगर मिसळावे.मिश्रण पुन्हा गरम करावे. गरम असतानाच ही तयार झालेली चटणी रुंद तोंडाच्या निर्जंतुक केलेल्या काचेच्या बाटलीमध्ये भरावे. थंड झाल्यावर बाटलीत झाकणाने बंद करून कोरड्या जागी साठवून ठेवाव्यात.

( संदर्भ-www.krushisamrat.com)

English Summary: chatni and pickels making process by bor fruit that benifit to farmer Published on: 11 December 2021, 10:34 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters